Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१६-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१६-१७
पाकिस्तान
वेस्ट इंडीज
तारीख २० सप्टेंबर – ३ नोव्हेंबर २०१६
संघनायक मिस्बाह-उल-हक (कसोटी)
अझहर अली (ए.दि.)
सरफराज अहमद (टी२०)
जेसन होल्डर (कसोटी व ए.दि.)
कार्लोस ब्रेथवेट (टी२०)
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा अझहर अली (४७४) क्रेग ब्रेथवेट (३२८)
सर्वाधिक बळी यासिर शाह (२१) देवेंद्र बिशू (१८)
मालिकावीर यासिर शाह (पा)
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा बाबर आझम (३६०) मार्लोन सॅम्यूएल्स (११६)
सर्वाधिक बळी मोहम्मद नवाझ (७) अल्झारी जोसेफ (४)
जासन होल्डर (४)
मालिकावीर बाबर आझम (पा)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा बाबर आझम (१०१) ड्वेन ब्राव्हो (८४)
सर्वाधिक बळी इमाद वसिम (९) केस्रिक विल्यम्स (२)
सॅम्युएल बद्री (२)
मालिकावीर इमाद वसिम (पा)

सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. सदर दौऱ्यावर तीन टी२०, तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली.[] कसोटी मालिकेमधील एक कसोटी सामना दिवस/रात्र खेळवण्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने तत्त्वतः मान्यता दिली होती.[]

सुरुवातीला, वेळापत्रकानुसार २-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामने आयोजित करण्यात आले होते.[] मे २०१६ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड श्रीलंकेच्या दौऱ्याबाबत शक्यता पडताळून पाहत होते.[] परंतु श्रीलंकेत पावसाचा मोसम असल्याने सदर कल्पना बाद करण्यात आली.[] मालिकेमध्ये, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई येथे होणाऱ्या एका दिवस/रात्र कसोटी सामन्याचा समावेश असल्याच्या वृत्ताला पीसीबी ने ऑगस्ट २०१६ मध्ये पुष्टी दिली.[][][]

दुबई येथील पहिली कसोटी ही पाकिस्तानची ४००वी कसोटी आणि दुसरी दिवस-रात्र कसोटी.[][] दिवस/रात्र कसोटी सुरू होण्यापुर्वी दोन्ही कर्णधारांनी ह्या स्वरूपासाठी पाठिंबा दाखवला होता. पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह-उल-हक म्हणाला "ह्या क्षणी, कसोटी क्रिकेट पाहणाऱ्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेता हेच कसोटी क्रिकेटचे भविष्य आहे. ".[] वेस्ट इंडीजचा कर्णधार जासन होल्डरला ही संकल्पना आवडली, तो म्हणाला की "आपण नवीन गोष्टीला संधी दिली पाहिजे".[१०] परंतू, कसोटीच्या पहिल्या दिवशी, मैदानावर फक्त ६८ चाहते होते आणि खेळ संपेपर्यंत हा आकडा फक्त ६०० पर्यंत वाढला होता.[११] कसोटी संपल्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी नमूद केले की "गुलाबी चेंडूवरती आणखी काम करणे गरजेचे आहे. अजूनतरी तो आवश्यक मापदंडापर्यंत नाहीये आणि मला वाटतं दिवस/रात्र कसोटीसाठी तो एकच अडथळा आहे."[१२]

पाकिस्तानने एकदिवसीय आणि टी२० मालिका ३-० ने जिंकल्या. कसोटी मालिका सुद्धा पाकिस्तानने २-१ ने जिंकली. शेवटच्या कसोटी वेस्ट इंडीजने विजय मिळवला. जासन होल्डरच्या नेतृत्वाखाली हा त्यांचा पहिलाच कसोटी विजय.[१३][१४] विजयानंतर, होल्डर म्हणाला "आम्ही लढाऊपणा दाखवला. विजयाचे श्रेय क्रेग ब्रेथवेटला दिले पाहिजे. तो पहिल्या डावात खूपच चांगला खेळला आणि दुसऱ्या डावात पाठलागाची जबाबदारी घेतली".[१५]

कसोटी एकदिवसीय टी२०
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[१६] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[१७] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[१८][१९] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[२०] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[२१] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[२०]

दौरा सामने

[संपादन]

टी२०: अमिरात क्रिकेट बोर्ड एकादश वि. वेस्ट इंडीज

[संपादन]
२० सप्टेंबर २०१६
१९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६६/७ (२० षटके)
वि
अमिरात क्रिकेट बोर्ड एकादश
१४४/६ (२० षटके)
निकोलस पूरन ४७* (२३)
मोहम्मद नवीद ३/२० (४ षटके)
अहमद रझा ३/२० (४ षटके)
वेस्ट इंडीज २२ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी, दुबई
पंच: अहसान रझा (पा) आणि शोझाब रझा (पा)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • प्रत्यकी १६ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)

दोन-दिवसीयः अमिरात क्रिकेट बोर्ड एकादश वि. वेस्ट इंडीज

[संपादन]
३-४ ऑक्टोबर २०१६
१०:१५
धावफलक
वि
अमिरात क्रिकेट बोर्ड एकादश
२४९/६घो (७० षटके)
शाय होप ५९ (८९)
रोहन मुस्तफा १/२६ (९ षटके)
११७ (३९.१ षटके)
रोहन मुस्तफा ४४* (१०३)
जोनाथन कार्टर ४/३० (१० षटके)
१७३/७घो (५१ षटके)
शेन डॉवरिक ५२* (१०८)
अहमद रझा ३/६९ (२१ षटके)
४३/१ (१५ षटके)
मोहम्मद कासीम २१* (४१)
रॉस्टन चेस १/१७ (६ षटके)
सामना अनिर्णित
आयसीसी अकादमी, दुबई
पंच: रझ्झाक अली (पा) आणि शिजू सॅम (पा)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • प्रत्येकी १५ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक).


तीन-दिवसीयः पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पॅट्रन वि वेस्ट इंडीज

[संपादन]
७-९ ऑक्टोबर २०१६
१५:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पॅट्रन
वि
३०८ (१०३.४ षटके)
अदनान अकमल ६९ (६७)
देवेंद्र बिशू ५/१०७ (३६ षटके)
२९७ (१३२.५ षटके)
ड्वेन ब्राव्हो ९१ (२६७)
शाहझैब अहमद ५/८५ (३५ षटके)
२६/३ (१६ षटके)
मोहम्म हफीज ९ (१८)
क्रेग ब्रेथवेट २/३ (४ षटके)
सामना अनिर्णित
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: अहसान रझा (पा) आणि शोझाब रझा (पा)
  • नाणेफेक: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पॅट्रन, फलंदाजी


टी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२३ सप्टेंबर २०१६
२०:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११५ (१९.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११६/१ (१४.२ षटके)
ड्वेन ब्राव्हो ५५ (५४)
इमाद वसिम ५/१४ (४ षटके)
बाबर आझम ५५* (३७)
सॅम्युएल बद्री १/२७ (४ षटके)
पाकिस्तान ९ गडी व ३४ चेंडू राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: अहसान रझा (पा) आणि शोझाब रझा (पा)
सामनावीर: इमाद वसिम (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: निकोलस पूरन (पा)
  • इमाद वसिम हा पाकिस्तानतर्फे आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५ गडी घेणारा पहिलाच पाकिस्तानी गोलंदाज.[२४]


२रा सामना

[संपादन]
२४ सप्टेंबर २०१६
२०:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६०/४ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४४/९ (२० षटके)
सुनिल नारायण ३० (१७)
सोहेल तन्वीर ३/१३ (४ षटके)
पाकिस्तान १६ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: अहमद शाहब (पा) आणि शोझाब रझा (पा)
सामनावीर: सरफराज अहमद (पा)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १,५०० धावा करणारा शोएब मलिक हा तिसरा पाकिस्तानी फलंदाज.[२५]
  • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० बळी घेणारा करणारा सोहेल तन्वीर हा चवथा पाकिस्तानी गोलंदाज.[२६]


३रा सामना

[संपादन]
२७ सप्टेंबर २०१६
२०:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०३/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०८/२ (१५.१ षटके)
शोएब मलिक ४३* (३४)
केस्रिक विल्यम्स २/१५ (४ षटके)
पाकिस्तान ८ गडी व २९ चेंडू राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: अहसान रझा (पा) आणि शोझाब रझा (पा)
सामनावीर: इमाद वसिम (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय टी २० पदार्पण: रुमान रईस (पा) आणि केस्रिक विल्यम्स (वे).
  • तीन-सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाकिस्तानचा हा पहिलाच व्हाईट वॉश.[२७]


एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
३० सप्टेंबर २०१६
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८४/९ (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७५ (३८.४ षटके)
बाबर आझम १२० (१३१)
कार्लोस ब्रेथवेट ३/५४ (१० षटके)
पाकिस्तान १११ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: अहसान रझा (पा) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: बाबर आझम (पा)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • पाकिस्तानच्या डावादरम्यान प्रकाशदिव्यांमध्ये झालेल्या बिघाडामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांपर्यंत कमी करण्यात आला, आणि वेस्ट इंडीजसमोर २८७ दावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • एकदिवसीय पदार्पण: क्रेग ब्रेथवेट (वे)
  • बाबर आझमचे (पा) पहिले एकदिवसीय शतक.


२रा सामना

[संपादन]
२ ऑक्टोबर २०१६
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३३७/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२७८/७ (५० षटके)
बाबर आझम १२३ (१२६)
जासन होल्डर २/५१ (८ षटके)
डॅरेन ब्राव्हो ६१ (७४)
वहाब रियाझ २/४८ (१० षटके)
पाकिस्तान ५९ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: एस. रवी (भा) आणि शोएब रझा (पा)
सामनावीर: बाबर आझम (पा)


३रा सामना

[संपादन]
५ ऑक्टोबर २०१६
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३०८/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७२ (४४ षटके)
बाबर आझम ११७ (१०६)
अल्झारी जोसेफ २/६२ (८ षटके)
दिनेश रामदिन ३७ (१० षटके)
मोहम्मद नवाझ ३/४० (९ षटके)
पाकिस्तान १३६ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: अहसान रझा (पा) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: बाबर आझम (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: एव्हिन लुईस (वे).
  • पाकिस्तानतर्फे लागोपाठ तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक करणारा बाबर आझम हा तिसरा फलंदाज[२८]
  • बाबर आझम (पा) हा तीन-सामन्यांच्या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला (३६०).[२९]
  • अझर अली हा तीन एकदिवसीय शतके करणारा पहिलाच पाकिस्तानी कर्णधार[३०]
  • वहाब रियाझचे (पा) १०० एकदिवसीय बळी पूर्ण.[२९]


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१३-१७ ऑक्टोबर २०१६
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
५७९/३घो (१५५.३ षटके)
अझहर अली ३०२* (४६९)
देवेंद्र बिशू २/१२५ (३५ षटके)
३५७ (१२३.५ षटके)
डॅरेन ब्राव्हो ८७ (२५८)
यासिर शाह ५/१२१ (४३ षटके)
१२३ (३१.५ षटके)
सामी अस्लम ४४ (६१)
देवेंद्र बिशू ८/४९ (१३.५ षटके)
२८९ (१०९ षटके)
डॅरेन ब्राव्हो ११६ (२४९)
मोहम्मद आमिर ३/६३ (२३ षटके)
पाकिस्तान ५६ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि पॉल राफेल (ऑ)
सामनावीर: अझहर अली (पा)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: बाबर आझम आणि मोहम्मद नवाझ (पा)
  • पाकिस्तानचा ४०० वा कसोटी सामना.[]
  • अझहर अली (पा) हा दिवस/रात्र कसोटी मध्ये शतक, द्विशतक आणि त्रिशतक करणारा पहिला फलंदाज. त्याच्या ४,००० कसोटी धावा पूर्ण.[३१][३२]
  • यासिर शाह (पा) हा कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद १०० गडी बाद करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू.[३३]
  • देवेंद्र बिशूची वेस्ट इंडियन गोलंदाजातर्फे परदेशातील सर्वोत्कृष्ट तसेच संयुक्त अरब अमिरातीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३४]
  • देवेंद्र बिशूची परदेशातील गोलंदाजातर्फे आशियातील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३५]


२री कसोटी

[संपादन]
२१-२५ ऑक्टोबर २०१६
१०:००
धावफलक
वि
४५२ (११९.१ षटके)
यूनिस खान १२७ (२०५)
शॅनन गॅब्रिएल ५/९६ (२३.१ षटके)
२२४ (९४.४ षटके)
डॅरेन ब्राव्हो ४३ (८५)
यासिर शाह ४/८६ (२८.४ षटके)
२२७/२घो (६७ षटके)
अझर अली ७९ (१३७)
मिग्वेल कमिन्स १/२६ (७ षटके)
३२२ (१०८ षटके)
जेर्मईने ब्लॅकवुड ९५ (१२७)
यासिर शाह ६/१२४ (३९ षटके)
पाकिस्तान १३३ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: यासिर शाह (पा)


३री कसोटी

[संपादन]
३० ऑक्टोबर – ३ नोव्हेंबर २०१६
१०:००
धावफलक
वि
२८१ (९०.५ षटके)
सामी अस्लम ७४ (१७२)
देवेंद्र बिशू ४/७७ (२१ षटके)
३३७ (११५.४ षटके)
क्रेग ब्रेथवेट १४२* (३१८)
वहाब रियाझ ५/८८ (२६.४ षटके)
२०८ (८१.३ षटके)
अझहर अली ९१ (२३४)
जासन होल्डर ५/३० (१७.३ षटके)
१५४/५ (४३.५ षटके)
शेन डॉरिच ६०* (८७)
यासिर शाह ३/४० (१५ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट मैदान, शारजा
पंच: मायकल गॉफ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: क्रेग ब्रेथवेट (वे)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
  • मिस्बाह-उल-हकने सर्वात जास्त कसोट्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले (४९).[४१]
  • क्रेग ब्रेथवेट हा कसोटीमधील पूर्ण झालेल्या डावाच्या शेवटपर्यंत नाबाद राहणारा वेस्ट इंडीजचा पाचवा फलंदाज.[४२]
  • जासन होल्डरचे (वे) कसोटीमध्ये पहिल्यांदाच डावात पाच बळी.[४३]
  • जासन होल्डरचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी विजय.[१३]
  • कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात नाबाद राहणारा क्रेग ब्रेथवेट हा पहिलाच सलामीवीर ठरला.[४४]
  • वेस्ट इंडीजचा पाकिस्तान विरुद्ध परदेशातील १९९० नंतरचा पहिलाच कसोटी विजय.[४४]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c "वेस्ट इंडीज, पाकिस्तान युएई मधील दिवस-रात्र कसोटीसाठी तयार" (इंग्रजी भाषेत). १९ जून २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "भविष्यातील दौरे" (PDF) (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "वेस्ट इंडीज मालिकेसाठी श्रीलंकेच्या मैदानांचा विचार" (इंग्रजी भाषेत). १६ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "पाकिस्तानची पहिला दिवस-रात्र कसोटी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध" (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "वेस्ट इंडीजच्या पाकिस्तान दौर्‍याची योजना घोषित" (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज दरम्यान दुबईमध्ये दिवस-रात्र कसोटी सामना" (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ a b "चौसष्ट वर्षे, ४०० कसोटी, अनेक यशोशिखरे" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "पाकिस्तानची फलंदाजी; आझम, नवाझचे पदार्पण" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "डे-नाईट टेस्टस् 'लुक्स लाईक द फ्युचर' - मिस्बाह". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "दिवस-रात्र कसोटीला संधी द्या - होल्डर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "दुसर्‍या दिवस-रात्र कसोटीच्या सुरवातीला हजारो रिकाम्या खुर्च्या". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "पाकिस्तान वि वेस्ट इंडीज: डॅरेन ब्राव्होच्या शतकाने यजमानांचा विजय जवळजवळ अशक्य केला". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ a b "ब्रेथवेटच्या खेळीने वेस्ट इंडीजचा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ "कसोटीत २६ वर्षांनंतर विंडीजने पाकला हरवलं". महाराष्ट्र टाइम्स. 2016-11-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ "'माय बेस्ट एफर्ट, बट डोन्ट वाँट टू गेट कॅरिड अवे' - क्रेग ब्रेथवेट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "पाकिस्तान कसोटी संघात बाबर आझम, नवाझची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ "युएई कसोटीसाठी वेस्ट इंडीज संघात फिरकी गोलंदाज वॉरिकॅन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  18. ^ "आफ्रिदीच्या निरोपाच्या मालिकेची हालचाल बासनात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  19. ^ "वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी उमर अकमल, असद शफिकचे पाकिस्तानी संघात पुनरागमन". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  20. ^ a b "एकदिवसीय संघात क्रेग ब्रेथवेटचा समावेश, रोव्हमन पॉवेल, पूरनला बोलावले" (इंग्रजी भाषेत). ५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  21. ^ "पाकिस्तानच्या टी२० संघात अकमलचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत). ९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  22. ^ "वेस्ट इंडीज टी२० संघात रसेल ऐवजी विल्यम्स". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  23. ^ "युनिस खानची दुसर्‍या कसोटीसाठी पाकिस्तानी संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  24. ^ "इमाद वसीमच्या १४ धावांतील ५ बळींमुळे वेस्ट इंडीजची वातहत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  25. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १,५०० धावा करणारा [[शोएब मलिक]] हा तिसरा पाकिस्तानी फलंदाज". स्पोर्ट्स कीडा (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  26. ^ "पाकिस्तानच्या वेस्ट इंडीजवरील टी२० मालिका विजयात सोहेल तन्वीर, हसन अली चमकले". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  27. ^ "इमादच्या तीन बळींमुळे पाकिस्तानचा ३-० ने सहज मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  28. ^ "लागोपाठच्या डावांमध्ये शतके". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  29. ^ a b "बाबर आझम इन एलिट कंपनी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  30. ^ "पाकिस्तानी कर्णधारांची शतके". इएसपीएन क्रिकइन्फो. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  31. ^ "अझहरचे शतक - पाकिस्तानच्या ४०० व्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा मथळा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  32. ^ "अझहरच्या नाबाद ३०२ धावांनंतर पाकिस्तानचा डाव ५७९ धावांवर घोषित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  33. ^ "यासिरचा १००वा बळी, वेस्ट इंडीज सर्वबाद ३५७". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  34. ^ "बिशूच्या ८ बळींनी पाकिस्तानचा १२३ धावांत खुर्दा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  35. ^ "बिशूचे आठ बळी ही परदेशी गोलंदाजाची आशियातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  36. ^ "उशीरा मिळालेल्या दोन बळींमुळे पाकिस्तान वरचढ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  37. ^ "पाकिस्तानची सर्वात यशस्वी जोडी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  38. ^ "वूब्ली विंडीज विल्ट". त्रिनिदाद अँड टोबॅगो गार्डियन (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  39. ^ "यासिरच्या सहा बळींमुळे पाकिस्तानचा मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  40. ^ "यासिरचे १० बळी, मिस्बाहचे १० मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  41. ^ "मिस्बाह: पाकिस्तानचा सर्वात जास्त यशस्वी कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  42. ^ "ब्रेथवेट शेवटपर्यंत नाबाद राहिल्याने वेस्ट इंडीजला दुर्मिळ आघाडी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  43. ^ "होल्डरच्या पाच बळींमुळे वेस्ट इंडीजला विजयासाठी १५३ धावांची गरज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.}
  44. ^ a b "क्रेग ब्रेथवेटने केला नवा कसोटी विक्रम". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]

मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो