"मंगळ ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ १२०: | ओळ १२०: | ||
'''मंगळ''' हा [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] चौथा [[ग्रह]] आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला ''तांबडा ग्रह'' असेसुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला [[आयर्न ऑक्साइड]]मुळे मिळाला आहे. |
'''मंगळ''' हा [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] चौथा [[ग्रह]] आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला ''तांबडा ग्रह'' असेसुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला [[आयर्न ऑक्साइड]]मुळे मिळाला आहे. |
||
हा एक [[खडकाळ ग्रह]] (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग [[चंद्र|चंद्राप्रमाणे]] अनेक [[विवर|विवरे]] तसेच [[पृथ्वी]]प्रमाणे अनेक [[ज्वालामुखी]], [[दरी|दऱ्या]], [[वाळवंट]] व ध्रुवीय [[बर्फ]] यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच [[पर्वत]] [[ऑलिम्पस मॉन्स]] तसेच सर्वांत मोठी दरी [[व्हॅलेस मरिनेरिस]] मंगळावरच आहे. तसेच [[जून]] २००८ मध्ये [[नेचर (मासिक)|नेचर मासिकात]] प्रकाशित झालेल्या तीन लेखांनुसार मंगळावर एक प्रचंड मोठे विवर असल्याचा पुरावा मिळाला आहे. हे विवर १०,६०० X ८,५०० किमी अकाराचे असून ते [[साउथ पोल - ऐटकेन बेसिन]] या |
हा एक [[खडकाळ ग्रह]] (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग [[चंद्र|चंद्राप्रमाणे]] अनेक [[विवर|विवरे]] तसेच [[पृथ्वी]]प्रमाणे अनेक [[ज्वालामुखी]], [[दरी|दऱ्या]], [[वाळवंट]] व ध्रुवीय [[बर्फ]] यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच [[पर्वत]] [[ऑलिम्पस मॉन्स]] तसेच सर्वांत मोठी दरी [[व्हॅलेस मरिनेरिस]] मंगळावरच आहे. तसेच [[जून]] २००८ मध्ये [[नेचर (मासिक)|नेचर मासिकात]] प्रकाशित झालेल्या तीन लेखांनुसार मंगळावर एक प्रचंड मोठे विवर असल्याचा पुरावा मिळाला आहे. हे विवर १०,६०० X ८,५०० किमी अकाराचे असून ते [[साउथ पोल - ऐटकेन बेसिन]] या सध्याच्या ज्ञात सर्वांत मोठ्या विवरापेक्षा चारपट मोठे आहे.<ref name=northcratersn>{{संकेतस्थळ स्रोत |
||
|दिनांक=२००८-०७-१९ |
|दिनांक=२००८-०७-१९ |
||
|शीर्षक=Impact May Have Transformed Mars |
|शीर्षक=Impact May Have Transformed Mars |
||
ओळ १५०: | ओळ १५०: | ||
सध्या मंगळाभोवती तीन कृत्रिम [[उपग्रह]] परिक्रमा करत आहेत. हे उपग्रह म्हणजे [[मार्स ओडेसी]], [[मार्स एक्सप्रेस]] व [[मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर]] होत. [[पृथ्वी]] वगळता इतर ग्रहांमध्ये हा आकडा मंगळासाठी सर्वांत जास्त आहे. तसेच मंगळाच्या पृष्ठभागावर [[स्पिरिट (रोव्हर)|स्पिरिट]] व [[ऑपॉर्च्युनिटी (रोव्हर)|ऑपॉर्च्युनिटी]] ही दोन कार्यरत स्वयंचलित परीक्षण याने (रोव्हर){{मराठी शब्द सुचवा}} व अनेक मृत यशस्वी तसेच अयशस्वी रोव्हर व अवतरक (लँडर) आहेत. [[फीनिक्स अवकाशयान|फीनिक्स]] या यानाने नुकतीच मंगळाच्या पृष्ठभागावरील आपली मोहीम पूर्ण केली. या यानांनी जमा केलेले भूशास्त्रीय पुरावे असे सुचवितात की मंगळावर पूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी होते आणि केवळ एका दशकापूर्वी छोट्या [[गरम पाण्याचे फवारे|गरम पाण्याच्या फवार्यांच्या]] स्वरूपात पाणी अस्तित्वात होते.<ref name="marswater">{{संकेतस्थळ स्रोत | प्रकाशक=NASA/JPL | दिनांक=December 6, 2006 | दुवा = http://www.nasa.gov/mission_pages/mars/news/mgs-20061206.html | शीर्षक=NASA Images Suggest Water Still Flows in Brief Spurts on Mars | अॅक्सेसदिनांक = 2007-01-04}}</ref> [[नासा|नासाच्या]] [[मार्स ग्लोबल सर्व्हेयर|मार्स ग्लोबल सर्व्हेयरने]] केलेल्या निरिक्षणांतून मंगळाच्या [[दक्षिण ध्रुव]]ावरील [[बर्फ]] कमी होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| प्रकाशक = NASA | दिनांक = September 20, 2005 | लेखक=Webster, G.; Beasley, D. | शीर्षक = Orbiter's Long Life Helps Scientists Track Changes on Mars| दुवा=http://mpfwww.jpl.nasa.gov/mgs/newsroom/20050920a.html | अॅक्सेसदिनांक = २००७-०२-२६}}</ref> |
सध्या मंगळाभोवती तीन कृत्रिम [[उपग्रह]] परिक्रमा करत आहेत. हे उपग्रह म्हणजे [[मार्स ओडेसी]], [[मार्स एक्सप्रेस]] व [[मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर]] होत. [[पृथ्वी]] वगळता इतर ग्रहांमध्ये हा आकडा मंगळासाठी सर्वांत जास्त आहे. तसेच मंगळाच्या पृष्ठभागावर [[स्पिरिट (रोव्हर)|स्पिरिट]] व [[ऑपॉर्च्युनिटी (रोव्हर)|ऑपॉर्च्युनिटी]] ही दोन कार्यरत स्वयंचलित परीक्षण याने (रोव्हर){{मराठी शब्द सुचवा}} व अनेक मृत यशस्वी तसेच अयशस्वी रोव्हर व अवतरक (लँडर) आहेत. [[फीनिक्स अवकाशयान|फीनिक्स]] या यानाने नुकतीच मंगळाच्या पृष्ठभागावरील आपली मोहीम पूर्ण केली. या यानांनी जमा केलेले भूशास्त्रीय पुरावे असे सुचवितात की मंगळावर पूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी होते आणि केवळ एका दशकापूर्वी छोट्या [[गरम पाण्याचे फवारे|गरम पाण्याच्या फवार्यांच्या]] स्वरूपात पाणी अस्तित्वात होते.<ref name="marswater">{{संकेतस्थळ स्रोत | प्रकाशक=NASA/JPL | दिनांक=December 6, 2006 | दुवा = http://www.nasa.gov/mission_pages/mars/news/mgs-20061206.html | शीर्षक=NASA Images Suggest Water Still Flows in Brief Spurts on Mars | अॅक्सेसदिनांक = 2007-01-04}}</ref> [[नासा|नासाच्या]] [[मार्स ग्लोबल सर्व्हेयर|मार्स ग्लोबल सर्व्हेयरने]] केलेल्या निरिक्षणांतून मंगळाच्या [[दक्षिण ध्रुव]]ावरील [[बर्फ]] कमी होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| प्रकाशक = NASA | दिनांक = September 20, 2005 | लेखक=Webster, G.; Beasley, D. | शीर्षक = Orbiter's Long Life Helps Scientists Track Changes on Mars| दुवा=http://mpfwww.jpl.nasa.gov/mgs/newsroom/20050920a.html | अॅक्सेसदिनांक = २००७-०२-२६}}</ref> |
||
हा ग्रह लालसर तांबडा रंगाचा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी [[ज्वालामुखी]] आढळले आहेत. यापैकी कित्येक ज्वालामुखी अजूनही जिवंत आहेत. [[ऑलिम्पस मॉन्स]] ही मंगळावर असलेली ज्वालामुखी आपल्या [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] सर्वात उंच ज्वालामुखी आहे. तिची उंची तब्बल २६.४ [[किमी]]. आहे. मंगळावर निरीक्षणाद्वारे कालव्याच्या खुणा आढळल्या आहेत, यावरून पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे. तसेच या ग्रहावर एक प्रचंड मोठी [[दरी]] आहे ती आपल्याला पृथ्वीवरुन |
हा ग्रह लालसर तांबडा रंगाचा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी [[ज्वालामुखी]] आढळले आहेत. यापैकी कित्येक ज्वालामुखी अजूनही जिवंत आहेत. [[ऑलिम्पस मॉन्स]] ही मंगळावर असलेली ज्वालामुखी आपल्या [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] सर्वात उंच ज्वालामुखी आहे. तिची उंची तब्बल २६.४ [[किमी]]. आहे. मंगळावर निरीक्षणाद्वारे कालव्याच्या खुणा आढळल्या आहेत, यावरून पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे. तसेच या ग्रहावर एक प्रचंड मोठी [[दरी]] आहे ती आपल्याला पृथ्वीवरुन शक्तिशाली [[दुर्बीण|दुर्बिणीतून]]सुद्धा दिसते. या दरीला ''मरीना दरी'' असे म्हणतात. मंगळावर [[सूर्य|सूर्याच्या]] बाजूवरील भागाचे [[तापमान]] साधारणत: २० अंश सेल्सियस तर विरुद्ध भागाचे तापमान १८० अंश सेल्सियस असते. |
||
मंगळाला [[फोबॉस]] व [[डिमाॅस (उपग्रह)]] हे दोन अनियमित आकाराचे [[नैसर्गिक उपग्रह]] आहेत. यापैकी फोबाॅस मंगळापासून ५,८८० मैल आणि डिमॉस १४,६०० मैल अंतरावरून मंगळाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. हे [[५१६१ युरेका]] या मंगळाच्या [[ट्रोजन उपग्रह|ट्रोजन उपग्रहाप्रमाणे]] मंगळाच्या |
मंगळाला [[फोबॉस]] व [[डिमाॅस (उपग्रह)]] हे दोन अनियमित आकाराचे [[नैसर्गिक उपग्रह]] आहेत. यापैकी फोबाॅस मंगळापासून ५,८८० मैल आणि डिमॉस १४,६०० मैल अंतरावरून मंगळाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. हे [[५१६१ युरेका]] या मंगळाच्या [[ट्रोजन उपग्रह|ट्रोजन उपग्रहाप्रमाणे]] मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेले लघुग्रह असावेत. मंगळ पृथ्वीवरून डोळ्यांनी दिसू शकतो. त्याची दृश्यता -२.९ असून फक्त [[शुक्र ग्रह|शुक्र]], [[चंद्र]] व [[सूर्य]] यांची दृश्य परावर्तितता मंगळापेक्षा जास्त आहे. मात्र, बराच काळ [[गुरू (ग्रह)|गुरू]] डोळ्यांना मंगळापेक्षा तेजस्वी दिसतो.<ref name="nssdc" /> |
||
== भौतिक गुणधर्म == |
== भौतिक गुणधर्म == |
||
ओळ १८२: | ओळ १८२: | ||
फोबॉसची कक्षा भूस्थिर कक्षेपेक्षा कमी असल्यामुळे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याची कक्षा कमी-कमी होत जात आहे. जवळपास ५ कोटी वर्षांनंतर फोबॉस एकतर मंगळावर आदळेल किंवा त्याचे तुकडे होऊन तो मंगळाभोवती कड्याच्या रूपात फिरत राहील.<ref name="phobos.html" /> |
फोबॉसची कक्षा भूस्थिर कक्षेपेक्षा कमी असल्यामुळे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याची कक्षा कमी-कमी होत जात आहे. जवळपास ५ कोटी वर्षांनंतर फोबॉस एकतर मंगळावर आदळेल किंवा त्याचे तुकडे होऊन तो मंगळाभोवती कड्याच्या रूपात फिरत राहील.<ref name="phobos.html" /> |
||
मंगळाने या उपग्रहांना आपल्याभोवतीच्या कक्षेत कसे अडकवले हे अजून पूर्णपणे ज्ञात नाही आहे. दोन्ही उपग्रहांची कक्षा जवळपास वर्तुळाकार आहे, हे अशा अडकलेल्या उपग्रहांमध्ये बहुधा आढळत नाही. फोबॉसची अस्थिर कक्षा असे सुचविते की तो |
मंगळाने या उपग्रहांना आपल्याभोवतीच्या कक्षेत कसे अडकवले हे अजून पूर्णपणे ज्ञात नाही आहे. दोन्ही उपग्रहांची कक्षा जवळपास वर्तुळाकार आहे, हे अशा अडकलेल्या उपग्रहांमध्ये बहुधा आढळत नाही. फोबॉसची अस्थिर कक्षा असे सुचविते की तो नजीकच्या भूतकाळातच मंगळाभोवतीच्या कक्षेत अडकला असावा. पण सध्या तरी अशी पद्धत ज्ञात नाही आहे, की ज्याद्वारे वातावरणरहित मंगळ एका लघुग्रहाला गुरुत्वाकर्षणात अडकवू शकेल. यामुळे यामध्ये अजून एक खगोलीय वस्तू गुंतली असावा असा कयास मांडला जातो. तसेच [[लघुग्रहांचा पट्टा|लघुग्रहांच्या पट्ट्याबाहेर]] फोबॉस व डीमॉसइतके मोठे लघुग्रह असणे दुर्मीळ आहे आणि जुळे लघुग्रह तर अजूनच दुर्मीळ.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://calspace.ucsd.edu/Mars99/docs/library/science/geological_history/moons1.html |शीर्षक=Geological History: Moons of Mars |प्रकाशक=CalSpace |पहिलेनाव=Scott |आडनाव=Ellis |अॅक्सेसदिनांक=2007-08-02}}*{{वेबॅक आर्किव्ह|दुवा=http://calspace.ucsd.edu/Mars99/docs/library/science/geological_history/moons1.html |date=20050316220010}}</ref> |
||
== मंगळावरील जीवसृष्टी == |
== मंगळावरील जीवसृष्टी == |
||
ओळ २८६: | ओळ २८६: | ||
===कालव्यांचा शोध?=== |
===कालव्यांचा शोध?=== |
||
मंगळाच्या १८७७ च्या |
मंगळाच्या १८७७ च्या प्रतियुतीवेळी जीओव्हानी शापरेली नावाच्या इटालियन खगोल निरीक्षकाने मंगळाची निरीक्षणे साडेआठ इंची दुर्बिणीतून घेऊन त्याचा छानसा नकाशा प्रसिद्ध केला. मंगळावरच्या रेघोट्यांना त्याने 'कॅनली' म्हटले. या इटालियन शब्दाचे भाषांतर इंग्रज लोकांनी 'कॅनॉल' असे करून एकच गोंधळ उडवून दिला. मंगळावर कॅनॉल असल्याची समजून काही लोकांनी करून घेतली. अमेरिकी हौशी आकाश निरीक्षक पर्सिव्हल लॉवेल याने तर स्वतःचे पैसे खर्च करून मंगळ निरीक्षणासाठी वेधशाळा बांधली. त्याचे त्याची निरीक्षणे 'मार्स' नावाच्या पुस्तकात मांडली. लॉवेलच्या मते मंगळावर प्रगत जीवसृष्टी असून, तेथील लोकांनी शेतीसाठी मंगळावर कॅनॉलचे जाळे बांधले आहे. याचमुळे मंगळाविषयीचे अनेक गैरसमज सर्वसामान्यांमध्ये पसरत गेले. मात्र, कालांतराने मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षणे घेतल्यावर मंगळावर कालवे नसल्याचे सिद्ध झाले. |
||
== मानवी संस्कृतीमध्ये मंगळाचे स्थान == |
== मानवी संस्कृतीमध्ये मंगळाचे स्थान == |
||
ओळ २९३: | ओळ २९३: | ||
:कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् II |
:कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् II |
||
याचा अर्थ असा की, "मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून निर्माण झाला, त्याला विजेसारखी अंगकांती आहे, त्याने हातात शक्ती हे शस्त्र धारण केले आहे, अशा कुमार स्वरुप मंगळाला मी नमस्कार करतो.". |
याचा अर्थ असा की, "मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून निर्माण झाला, त्याला विजेसारखी अंगकांती आहे, त्याने हातात शक्ती हे शस्त्र धारण केले आहे, अशा कुमार स्वरुप मंगळाला मी नमस्कार करतो.". |
||
==जन्म पत्रिकेतील मंगळ दो़ष== |
|||
पत्रिकेत मंगळ ग्रह हा प्रथम स्थानी (तनु स्थानी), चतुर्थ स्थानी (सुख स्थानी), सप्तम स्थानी (विवाह स्थानी ), अष्टम स्थानी (मृत्यू स्थानी ) किंवा द्वादश स्थानात (शैय्या सुख स्थानी ) असेल तर ती पत्रिका मंगळी असते. ज्या लोकांना मंगळदोष असतो अशा लोकांचा स्वभाव हा तापट, हट्टी, भांडकुदळ असतो, असे फलज्योतिष सांगते. ज्याच्या जन्मपत्रिकेतील मंगळ अशुभ स्थानी असेल त्यांनी पत्रिकेत असाच दोष असणारा जोडीदार शोधून लग्न करावे असा ज्योतिष्यांचा सल्ला असतो. |
|||
==वक्री मंगळ== |
|||
इतर ग्रहांप्रमाणे मंगळही कधीकधी वक्री होतो,. म्हणजे आकाशातून फिरताना मागे सरकल्यासारखा भासतो. हा सूर्यापासून १३५<sup>0</sup> दूर गेल्यावर वक्री होतो. मंगल ज्या राशीत वक्री होतो, तेथे तो ६० ते ८० दिवस राहून पुढल्या राशीत जातो व ती पुढली रास १५ दिवसात पार करतो. |
|||
२०१३, २०१५, २०१७ व २०१९ साली मंगळ वक्री नव्हता/नसेल. २०१८ साली तो ६२ दिवस (२७ जून ते २७ ऑगस्ट) वक्री होता. २०२० साली तो १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर (६६ दिवस) या काळात वक्री असेल. |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
१२:२४, ७ जून २०१९ ची आवृत्ती
हबल दुर्बिणीतून दिसणारा मंगळ ग्रह | ||||||||||
कक्षीय गुणधर्म | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
इपॉक J2000 | ||||||||||
अपसूर्य बिंदू | २४,९२,०९,३०० कि.मी. (१.६६५८६१ ख.ए.) | |||||||||
उपसूर्य बिंदू: | २०,६६,६९,००० कि.मी. (१.३८१४९७ ख.ए.) | |||||||||
अर्धदीर्घ अक्ष: | २२,७९,३९,१०० कि.मी. १.५२३६७९ (ख.ए.) | |||||||||
वक्रता निर्देशांक: | ०.०९३३१५ | |||||||||
परिभ्रमण काळ: | ६८६.९७१ दिवस | |||||||||
सिनॉडिक परिभ्रमण काळ: | ७७९.९६ दिवस | |||||||||
सरासरी कक्षीय वेग: | २४.०७७ कि.मी./सेकंद | |||||||||
कक्षेचा कल: | १.८५०° ५.६५°(सूर्याच्या विषुववत्तासापेक्ष) | |||||||||
कोणाचा उपग्रह: | सूर्य | |||||||||
उपग्रह: | २ | |||||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||||
विषुववृत्तीय त्रिज्या: | ३,३९६.२ ± ०.१ कि.मी.[a][१] पृथ्वीच्या ०.५३३ पट | |||||||||
धृवीय त्रिज्या: | ३,३७६.२ ± ०.१ कि.मी.[a][१] पृथ्वीच्या ०.५३१ पट | |||||||||
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: | १४,४७,९८,५०० वर्ग किमी² पृथ्वीच्या ०.२८४ पट | |||||||||
घनफळ: | १.६३१८ ×10११ किमी³ पृथ्वीच्या ०.१५१ पट | |||||||||
वस्तुमान: | ६.४१८५ ×10२३ किलोग्रॅम पृथ्वीच्या ०.१०७ पट | |||||||||
सरासरी घनता: | ३,९३४ कि.ग्रॅ प्रति घनसेंटिमीटर | |||||||||
पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण (विषुववृत्ताजवळ): | ३.६९ मी. प्रति वर्ग सेकंद ०.३७६ g | |||||||||
मुक्तिवेग: | ५.०२७ किमी/सेकंद | |||||||||
विषुववृत्तावरील परिवलनवेग: | ८६८.२२ किमी/तास | |||||||||
आसाचा कल: | २५.१९° | |||||||||
पृष्ठभागाचे तापमान: केल्व्हिन सेल्सियस |
| |||||||||
वातावरण | ||||||||||
पृष्ठभागावरील दाब: | ०.७ - ०.९ पास्कल | |||||||||
संरचना: | ९५.७२% कार्बन डायॉक्साईड २.७% नायट्रोजन |
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असेसुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे.
हा एक खडकाळ ग्रह (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे. तसेच जून २००८ मध्ये नेचर मासिकात प्रकाशित झालेल्या तीन लेखांनुसार मंगळावर एक प्रचंड मोठे विवर असल्याचा पुरावा मिळाला आहे. हे विवर १०,६०० X ८,५०० किमी अकाराचे असून ते साउथ पोल - ऐटकेन बेसिन या सध्याच्या ज्ञात सर्वांत मोठ्या विवरापेक्षा चारपट मोठे आहे.[३][४] भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.
१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळायान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. याचे मुख्य कारण म्हणजे मंगळाच्या ध्रुवीय भागाचे निरिक्षण करतांना आढळलेले बदलत जाणारे फिके व गडद पट्टे, जे संशोधकांना महासागर व खंड असावेत असे वाटले. तसेच मंगळावरील काही निमूळते व गडद पट्टे सिंचनासाठीचे पाण्याचे कालवे असल्याचाही काहींचा समज होता. नंतर हे पट्टे मंगळावर अस्तित्वातच नाही आहेत व केवळ दृष्टीभ्रमामुळे ते दिसतात असे स्पष्टीकरण देण्यात आले. पण तरीही, इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा असून, जर सूर्यमालेत इतरत्र कुठे पाणी व जीवन असेल तर ते मंगळावरच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे.[५] बर्फाच्या स्वरूपातील पाणी जुलै ३१, २००८ रोजी फीनिक्स मार्स लँडरला मंगळावर आढळले होते.[६]
सध्या मंगळाभोवती तीन कृत्रिम उपग्रह परिक्रमा करत आहेत. हे उपग्रह म्हणजे मार्स ओडेसी, मार्स एक्सप्रेस व मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर होत. पृथ्वी वगळता इतर ग्रहांमध्ये हा आकडा मंगळासाठी सर्वांत जास्त आहे. तसेच मंगळाच्या पृष्ठभागावर स्पिरिट व ऑपॉर्च्युनिटी ही दोन कार्यरत स्वयंचलित परीक्षण याने (रोव्हर)[मराठी शब्द सुचवा] व अनेक मृत यशस्वी तसेच अयशस्वी रोव्हर व अवतरक (लँडर) आहेत. फीनिक्स या यानाने नुकतीच मंगळाच्या पृष्ठभागावरील आपली मोहीम पूर्ण केली. या यानांनी जमा केलेले भूशास्त्रीय पुरावे असे सुचवितात की मंगळावर पूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी होते आणि केवळ एका दशकापूर्वी छोट्या गरम पाण्याच्या फवार्यांच्या स्वरूपात पाणी अस्तित्वात होते.[७] नासाच्या मार्स ग्लोबल सर्व्हेयरने केलेल्या निरिक्षणांतून मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फ कमी होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.[८]
हा ग्रह लालसर तांबडा रंगाचा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. यापैकी कित्येक ज्वालामुखी अजूनही जिवंत आहेत. ऑलिम्पस मॉन्स ही मंगळावर असलेली ज्वालामुखी आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. तिची उंची तब्बल २६.४ किमी. आहे. मंगळावर निरीक्षणाद्वारे कालव्याच्या खुणा आढळल्या आहेत, यावरून पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे. तसेच या ग्रहावर एक प्रचंड मोठी दरी आहे ती आपल्याला पृथ्वीवरुन शक्तिशाली दुर्बिणीतूनसुद्धा दिसते. या दरीला मरीना दरी असे म्हणतात. मंगळावर सूर्याच्या बाजूवरील भागाचे तापमान साधारणत: २० अंश सेल्सियस तर विरुद्ध भागाचे तापमान १८० अंश सेल्सियस असते.
मंगळाला फोबॉस व डिमाॅस (उपग्रह) हे दोन अनियमित आकाराचे नैसर्गिक उपग्रह आहेत. यापैकी फोबाॅस मंगळापासून ५,८८० मैल आणि डिमॉस १४,६०० मैल अंतरावरून मंगळाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. हे ५१६१ युरेका या मंगळाच्या ट्रोजन उपग्रहाप्रमाणे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेले लघुग्रह असावेत. मंगळ पृथ्वीवरून डोळ्यांनी दिसू शकतो. त्याची दृश्यता -२.९ असून फक्त शुक्र, चंद्र व सूर्य यांची दृश्य परावर्तितता मंगळापेक्षा जास्त आहे. मात्र, बराच काळ गुरू डोळ्यांना मंगळापेक्षा तेजस्वी दिसतो.[९]
भौतिक गुणधर्म
मंगळाची त्रिज्या पृथ्वीच्या अर्धी आहे व त्याची घनता पृथ्वीपेक्षा कमी आहे. मंगळाचे आकारमान पृथ्वीच्या १५% असून वस्तुमान ११% आहे. पृथ्वीवरील एकूण खंडीय प्रदेशापेक्षा मंगळाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ थोडेसे कमी आहे.[९] जरी मंगळ बुधापेक्षा आकाराने व वस्तुमानाने मोठा असला तरी त्याची घनता बुधापेक्षा कमी आहे. यामुळे पृष्ठभागावर बुधाचे गुरुत्त्वाकर्षण मंगळापेक्षा जास्त आहे. मंगळाचे वस्तुमान,आकारमान व गुरुत्त्वाकर्षण हे पृथ्वी व चंद्राच्या जवळपास मध्ये आहे. (चंद्राचा व्यास मंगळाच्या अर्धा आहे तर पृथ्वीचा मंगळाच्या दुप्पट, पृथ्वीचे वस्तुमान मंगळाच्या दहापट आहे तर मंगळाचे वस्तुमान चंद्राच्या दहापट आहे). मंगळाच्या पृष्ठभागाचा केशरी-तांबडा रंग त्याच्यातील आयर्न (III) ऑक्साईड (लोखंडावरील गंज व हेमटाईट ते हेच.) [१०]
परिवलन व परिभ्रमण
मंगळाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर २३ कोटी किमी (१.५ खगोलशास्त्रीय एकक) असून त्याचा परिभ्रमण काळ पृथ्वीवरील सुमारे ६८७ दिवस इतका आहे. मंगळावरील एक सौर दिवस पृथ्वीपेक्षा थोडासाच मोठा असून तो २४ तास, ३९ मिनिटे व ३५.२४४ सेकंद इतका भरतो.
मंगळाच्या अक्षाचा कल २५.१९ डिग्री इतका आहे, जो जवळपास पृथ्वीच्या अक्षाच्या कलाइतकाच आहे. यामुळे मंगळावर पृथ्वीसारखेच ऋतू असतात, फक्त मंगळावरील दीर्घ वर्षामुळे तिथले ऋतू पृथ्वीवरील ऋतूंच्या दुप्पट काळ चालतात. मंगळाने त्याचा उपनाभी बिंदू जून २००७ मध्ये ओलांडला तर अपनाभी बिंदू मे २००८ मध्ये.
मंगळाच्या कक्षेची उत्केंद्रता सुमारे ०.०९ इतकी असून ती बुध सोडून इतर सर्व ग्रहांपेक्षा जास्त आहे. पण जुन्या काळात मंगळाची उत्केंद्रता आत्ताच्यापेक्षा बरीच कमी असल्याचे ज्ञात आहे. सुमारे १३.५ लक्ष वर्षांपूर्वी (पृथ्वीवरील) मंगळाची उत्केंद्रता केवळ ०.००२ इतकी होती, जी पृथ्वीच्या आत्ताच्या उत्केंद्रतेपेक्षापण बरीच कमी आहे.[११]
नैसर्गिक उपग्रह
मंगळाला फोबॉस आणि डीमॉस नावांचे दोन छोटे नैसर्गिक उपग्रह आहेत. हे चंद्र मंगळाच्या खूप जवळून परिक्रमा करतात, म्हणून ते मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेले लघुग्रह असावेत असा समज आहे.[१२]
या दोन्ही उपग्रहांचा शोध १८७७ मध्ये असाफ हॉल याने लावला व त्यांना फोबॉस व डीमॉस या ग्रीक देवांवरून नावे दिली. फोबॉस हा भीतीचे मूर्तरूप मानला जातो तर डीमॉस हा दहशतीचे मूर्तरूप मानला जातो. ग्रीक पुराणांनुसार या जुळी भावंडे त्यांचे वडील अॅरिस (ग्रीकांचा युद्धदेव) याच्यासोबत युद्धात उतरली होती. अॅरिस रोमन पुराणांत मार्स या नावाने ओळखला जातो. (ज्यावरून मंगळाचे इंग्रजीतील नाव मार्स पडले.)[१३]
मंगळाच्या पृष्ठभागावरून फोबॉस आणि डीमॉसची आकाशातील वाटचाल पृथ्वीच्या चंद्राच्या वाटचालीपेक्षा खूप वेगळी दिसते. फोबॉसचा उदय पश्चिमेला होऊन तो पूर्वेला मावळतो आणि पुन्हा फ्क्त ११ तासांनी तो परत उगवतो. डीमॉस मंगळसापेक्ष भूस्थिर कक्षेच्या थोडासाच बाहेर आहे. (भूस्थिर कक्षेमध्ये उपग्रहाचा परिभ्रमण काळ ग्रहाच्या परिवलन काळाइतका असतो.) डीमॉसचा उदय पूर्वेकडेच होतो आणि जरी त्याचा परिभ्रमण काळ ३० तासांचा असला तरी तो हळुहळू आकाशात प्रवास करून २.७ दिवसानंतर पश्विमेकडे मावळतो. परत इतक्याच वेळेनंतर तो परत पूर्वेकडे उगवतो.[१४]
फोबॉसची कक्षा भूस्थिर कक्षेपेक्षा कमी असल्यामुळे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याची कक्षा कमी-कमी होत जात आहे. जवळपास ५ कोटी वर्षांनंतर फोबॉस एकतर मंगळावर आदळेल किंवा त्याचे तुकडे होऊन तो मंगळाभोवती कड्याच्या रूपात फिरत राहील.[१४]
मंगळाने या उपग्रहांना आपल्याभोवतीच्या कक्षेत कसे अडकवले हे अजून पूर्णपणे ज्ञात नाही आहे. दोन्ही उपग्रहांची कक्षा जवळपास वर्तुळाकार आहे, हे अशा अडकलेल्या उपग्रहांमध्ये बहुधा आढळत नाही. फोबॉसची अस्थिर कक्षा असे सुचविते की तो नजीकच्या भूतकाळातच मंगळाभोवतीच्या कक्षेत अडकला असावा. पण सध्या तरी अशी पद्धत ज्ञात नाही आहे, की ज्याद्वारे वातावरणरहित मंगळ एका लघुग्रहाला गुरुत्वाकर्षणात अडकवू शकेल. यामुळे यामध्ये अजून एक खगोलीय वस्तू गुंतली असावा असा कयास मांडला जातो. तसेच लघुग्रहांच्या पट्ट्याबाहेर फोबॉस व डीमॉसइतके मोठे लघुग्रह असणे दुर्मीळ आहे आणि जुळे लघुग्रह तर अजूनच दुर्मीळ.[१५]
मंगळावरील जीवसृष्टी
सध्याच्या वैज्ञानिक ज्ञानानुसार, पृष्ठभागावर द्रवरूप पाणी असणाऱ्या ग्रहांवर जीवन विकसित होणे, तसेच ते चालू राहणे याची शक्यता जास्त मानली जाते. यासाठी ग्रहाची कक्षा हॅबिटेबल झोन (राहण्यायोग्य क्षेत्रा)मध्ये असणे आवश्यक आहे. सूर्यासाठी ही कक्षा पृथ्वीने व्यापली आहे. मंगळ या कक्षेच्या अर्धा खगोलीय एकक पलीकडे आहे. यामुळे तसेच मंगळावरील विरळ वातावरणामुळे मंगळाच्या पृष्ठभागावरील पाणी गोठते. मात्र भूतकाळातील वाहते पाणी मंगळाची जीवन धारण करण्याची क्षमता दर्शविते. नजीकच्या काळात मिळालेल्या पुराव्यांनुसार मंगळावर जरी पाणी असते तरी ते खूप खारट आणि आम्लधर्मी असले पाहिजे, त्यामुळे जीवसृष्टीला आधार देऊ शकले नसते.[१६]
मॅग्नेटोस्फिअरचा[मराठी शब्द सुचवा] अभाव आणि विरळ वातावरण ही जीवसृष्टीच्या संभावनेसमोर मोठी आव्हाने उभी करतात. ही आव्हाने म्हणजे मंगळाच्या पृष्ठभागावरील अल्प ऊष्मा स्थानांतरण, सौर वारे, तसेच इतर खगोलीय वस्तूंच्या आघातापासून मिळणारा कमी बचाव व पाणी द्रवरूपात राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य वातावरणीय दाबाचा अभाव (या दाबामुळे पाण्याचे ऊर्ध्वपतन होऊन पाण्याची वाफ बनते.). तसेच मंगळ हा भूरचनाशास्त्रीयदृष्ट्या जवळपास (बहुदा पूर्णपणे) मृतप्राय आहे. मंगळावरील ज्वालामुखींच्या अंतामुळे जमिनीच्या आतील रसायने व खनिजे पृष्ठभागावर येणे व पृष्ठभागावरील रसायने व खनिजे पृष्ठभागाखाली जाणे थांबले आहे.[१७]
उपलब्ध पुरावे असे सुचवितात की मंगळ सध्यापेक्षा भूतकाळात जीवसृष्टीला अनुकूल होता. पण मंगळावर खरेच सजीव होते की नव्हते हे अजून स्पष्ट झालेले नाही.
१९७०च्या मध्यातील वायकिंग मोहिमेमधील यानांनी मंगळावरील मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे अस्तित्व तपासण्यासाठी काही प्रयोग केले. त्यातील काही प्रयोगांतून सूक्ष्मजीवांचे अस्तित्व आहे असे वरकरणी निष्पन्न देखील झाले होते. या यशस्वी प्रयोगांमध्ये पाणी व पौष्टिक पदार्थांच्या सानिध्यात कार्बन डाय ऑक्साईड (CO2) तयार होण्याचे प्रमाण वाढलेले आढळून आले होते. पण जीवसृष्टी सिद्ध करणारे हे चिन्ह नंतर अनेक शास्त्रज्ञांकडून नाकारण्यात आले आहे व याबाबत सतत वाद चालू असतात. नासामधील शास्त्रज्ञ गिल्बर्ट लेव्हिन यांच्या मते वायकिंगला मंगळावर खरोखरीच जीवन सापडले असावे. तीस वर्षांपूर्वीच्या वायकिंग यानांनी गोळा केलेल्या माहितीच्या पुनःपृथक्करणाने व एक्स्ट्रिमोफाइल (बिकट वातावरणात वाढणारे सजीव) जीवांबद्दल मिळालेल्या नवीन माहितीने असे सुचविले आहे की या यानांनी केलेले प्रयोग अशा प्रकारची जीवसृष्टी हुडकण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत नव्हते. आणि या प्रयोगांनी कदाचित अशा जीवांना (जर ते मंगळावर असतील तर) मारलेच असेल.[१८] फीनिक्स मार्स लँडरने केलेल्या प्रयोगातून असे आढळले आहे की, मंगळावरील माती अल्कधर्मी असून त्यामध्ये मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड आहेत.[१९] ही मातीतील पोषकतत्त्वे जीवसंवर्धन करू शकतात पण अतिनील किरणांपासून त्यांचे संरक्षण करणेसुद्धा आवश्यक आहे. जॉन्सन स्पेस सेंटरच्या प्रयोगशाळेत एएलएच८४००१ या उल्केमध्ये सेंद्रिय घटक आढळून आले आहेत. ही उल्का मंगळावरून आली असल्याचे मानले जाते. त्यांनी असा निष्कर्ष काढला की ही घटके मंगळावरील तेव्हाच्या विद्यमान आदीम जीवांनी या उल्केत टाकली होती. व नंतर मंगळावरील इतर उल्का-आघातामुळे ही उल्का आकाशात फेकली गेली व १.५ कोटी वर्षांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर आदळली. तसेच मंगळाभोवती फिरणाऱ्या यानांना नजीकच्या काळात लहान प्रमाणात मिळालेले मिथेन व फॉर्मल्डिहाईड जीवसृष्टीच्या शक्यतेकडे बोट दाखवतात, कारण अन्यथा ही रासायनिक संयुगे मंगळावरील वातावरणात त्वरित विघटित होतील.[२०][२१] काही प्रकारच्या भूगर्भीय वा ज्वालामुखीय कारणांनीसुद्धा ही संयुगे तयार होणे शक्य आहे. (उदा. सर्पेंटिनायझेशन प्रक्रिया).
मानवनिर्मित यानांनी केलेले निरीक्षण
आतापर्यंत मंगळाचे वातावरण, त्याचा पृष्ठभाग, आणि भूरचना यांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका, सोवियेत रशिया, युरोप व जपान यांनी डझनाहून अधिक ऑर्बिटर (ग्रहाभोवती परिक्रमा करणारे अवकाशयान), लँडर (ग्रहावर उतरणारे अवकाशयान) आणि रोव्हर (स्वयंचलित निरिक्षण यान) प्रक्षेपित केले आहेत.
यापैकी जवळपास दोन तृतीयांश अंतराळयाने या न त्या कारणाने अयशस्वी झाली आहेत. यातील काही मोहिमेदरम्यान अयशस्वी झाले तर काहींमध्ये मोहीम सुरू करण्याआधीच बिघाड झाला. यातील काहींचा बिघाड तांत्रिक कारणांमुळे झाल्याचे लक्षात आले असले तरी बऱ्याच यानांचा अज्ञात कारणांमुळे संपर्क तुटला होता किंवा त्यामध्ये बिघाड झाले होते. यामुळे काही लोकांनी यासाठी इतर कारणे हुडकण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही सुचविलेली कारणे म्हणजे, पृथ्वी-मंगळामधील बर्म्युडा ट्रायँगल, मंगळाचा शाप अथवा "प्रचंड अंतराळ राक्षस" (Great Galactic Ghoul) जो ही अवकाशयाने खाऊन जिवंत राहतो (हा विनोद नासामध्ये बहुचर्चित आहे).[२२]
भूतकाळातील मोहिमा
मंगळाजवळून जाणारे पहिले यशस्वी अवकाशयान म्हणजे नासाचे मरिनर ४, जे १९६४ मध्ये प्रक्षेपित केले गेले. मंगळावर यशस्वीरित्या उतरणार्या पहिल्या दोन वस्तूंचा मान सोवियत संघाने मार्स प्रोब मोहिमेअंतर्गत १९७१ मध्ये प्रक्षेपित केलेल्या मार्स २ व मार्स ३ या प्रोबना[मराठी शब्द सुचवा] मिळतो. पण उतरल्यावर काही सेकंदातच या दोघांचाही पृथ्वीशी संपर्क तुटला. यानंतर १९७५ मध्ये नासाने वायकिंग मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेदरम्यान दोन ऑर्बिटर प्रक्षेपित करण्यात आले ज्यांच्यासोबत प्रत्येकी एक लँडर होते. हे दोन्ही लँडर १९७६ मध्ये यशस्वीरित्या मंगळावर उतरले. वायकिंग १ सहा वर्षे कार्यरत होता तर वायकिंग २ तीन वर्षे. या वायकिंग लँडरनी सर्वप्रथम मंगळाची रंगीत चित्रे पृथ्वीवर पाठविली [२३] तसेच त्यांनी मंगळाच्या पृष्ठभागाचे उत्कृष्ट नकाशे बनविले जे आजमितीसही उपयोगात आणले जातात.
सोवियत संघाने फोबॉस १ व २ ही याने १९८८ साली मंगळ व त्याचे दोन उपग्रह यांचे निरिक्षण करण्यासाठी प्रक्षेपित केली. मंगळाच्या वाटेवर असतानाच "फोबॉस १"चा पृथ्वीशी संपर्क तुटला. "फोबॉस २"ने मंगळाची व फोबॉसची यशस्वीरित्या छायाचित्रे काढली मात्र तोपण फोबॉसवर लँडर सोडण्याच्या थोड्याच वेळाआधी निकामी झाला.
१९९२ मधील मार्स ऑब्झर्वरच्या अपयशानंतर नासाने १९९६ मध्ये मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे यान प्रक्षेपित केले. हे यान पूर्णपणे यशस्वी ठरले. या यानाने निर्धारित मंगळाचा नकाशा बनविण्याचे आपले काम २००१ मध्ये पूर्ण केले. त्यानंतर दोनवेळा यानाचा कार्यकाल यशस्वीरित्या लांबविण्यात आला होता. तिसऱ्या वेळी नोव्हेंबर २००६ मध्ये मंगळावर दहा वर्षे काढलेल्या या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला. मार्स ग्लोबल सर्व्हेयरच्या प्रक्षेपणानंतर केवळ एका महिन्यानंतर नासाने मार्स पाथफाइंडर प्रक्षेपित केले होते. हे यान सोजनर (Sojourner Rover) हे स्वयंचलित निरिक्षण वाहन स्वतःसोबत वाहून नेत होते. सोजनर १९९७च्या उन्हाळ्यात मंगळावरील ऍरीस व्हलिस येथे उतरले. ही मोहीमसुद्धा यशस्वी ठरली. तसेच मोहिमेस प्रसारमाध्यमांद्वारे बरीच प्रसिद्धीसुद्धा मिळाली होती, जी मुख्यत्वेकरून यानाने पृथ्वीवर पाठविलेल्या अनेक छायाचित्रांमुळे होती.[२४]
मंगळावरची सर्वांत अलिकडील मोहीम म्हणजे नासाचे फीनिक्स लँडर ही होय, जे नासाने ऑगस्ट ४,२००७ रोजी प्रक्षेपित केले. फीनिक्स लँडर मंगळाच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशात मे २५, २००८ रोजी उतरले.[२५] या लँडरला २.५ मीटर लांबीची यांत्रिक भुजा होती, जी मंगळाच्या मातीत मीटरभर खोल खणू शकत असे. यासोबतच लँडरवर सुक्ष्मदर्शी कॅमेरा होता जो मानवी केसाच्या एक हजारांश लहान वस्तूंची छायाचित्रे काढू शकत असे. या यानास उतरण्याच्या जागेवर जून १५,२००८ रोजी एक पदार्थ मिळाला, जो जून २० रोजी बर्फ आहे असे प्रयोगांती सिद्ध झाले.[२६][२७] यानाशी संपर्क करण्यात नासाच्या तंत्रज्ञांना अपयश आल्यावर नोव्हेंबर १०, २००८ रोजी नासाद्वारे मोहिमेच्या समाप्तीची घोषणा करण्यात आली.[२८]
वर्तमान मोहिमा
२००१ मध्ये नासाने मार्स ओडेसी हे यान प्रक्षेपित केले. नोव्हेंबर २००८ पर्यंत प्राप्त माहितीनुसार हे यान अजूनही मंगळाभोवतीच्या कक्षेत परिक्रमा करत आहे. त्याचा कार्यकाळ सप्टेंबर २०१० पर्यंत वाढविण्यात आला होता े.[२९] ओडेसीवरील गॅमा रे स्पेक्ट्रोमिटरने मंगळाच्या पृष्ठभागाच्या एक मीटर उंचीच्या थरात मोठ्या प्रमाणात हायड्रोजन वायू आढळला आहे. हा बर्फातील हायड्रोजन असावा असा कयास आहे.[३०]
२००३ मध्ये युरोपियन स्पेस एजेंसी (इसा) ने मार्स एक्सप्रेस यान प्रक्षेपित केले होते. यामध्ये मार्स एक्सप्रेस ऑर्बिटर व बीगल २ नावाचे एक लँडर यांचा समावेश होता. यापैकी बीगल २ मंगळावर उतरतांना निकामी झाले व फेब्रुवारी २००४ मध्ये बीगल २ गमावल्याची घोषणा करण्यात आली.[३१] २००४ मध्ये प्लॅनेटरी फुरिए स्पेक्ट्रॉमिटर गटाने त्यांना मंगळाच्या वातावरणात मिथेन सापडल्याचे घोषित केले तर जून २००६ मध्ये इसाने मंगळावर अरोरा (ध्रुवीय प्रकाश) दिसून आल्याचे घोषित केले.[३२]
२००३ पर्यंतच्या ज्ञात माहितीनुसार नासाने मार्स एक्स्प्लोरेशन रोव्हर मोहीमेअंतर्गत स्पिरिट (MER-A) व ऑपॉर्च्युनिटी (MER-B) हे दोन जुळे रोव्हर प्रक्षेपित केले आहेत. दोन्ही याने जानेवारी २००४ मध्ये यशस्वीरित्या मंगळावरील निर्धारित स्थळी उतरली. या यानांकडून मिळालेल्या शास्त्रीय ज्ञानामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मंगळावर त्यांच्या दोघांच्याही उतरण्याच्या जागेवर पूर्वी पाणी होते याचा त्यांना मिळालेला निर्णायक पुरावा हा होय. तसेच मंगळावरील धूळ पिशाच्च (dust devils) (तुलनेने जास्त काळ टिकणारे चक्रिवादळ) व वावटळांमुळे दोन्ही रोव्हरच्या सौर तावदाने साफ झाल्यामुळे त्याची आयुर्मर्यादादेखील वाढली आहे.[३३]
यासोबतच ऑगस्ट १२, २००५ रोजी नासाने मार्स रिकनायसन्स ऑर्बिटर हे यान प्रक्षेपित केले, जे मार्च १०, २००६ रोजी मंगळाभोवतीच्या कक्षेत पोहोचले. हे यान दोन वर्षे चालणाऱ्या सर्वेक्षणाच्या मोहिमेवर पाठविण्यात आले आहे. भविष्यातील लँडर यानांना उतरण्यासाठी योग्य जागा हुडकण्यासाठी मंगळाच्या भूप्रदेशाचा व हवामानाचा अभ्यास हे यान करेल. तसेच यानावर पृथ्वीसोबत माहिती-देवाणघेवाणीसाठी विकसित दूरसंचार यंत्रणा आहे व त्याची बँडविड्थ (प्रतिसेकंद माहिती वाहून नेण्याची क्षमता) पूर्वीच्या सर्व यानांच्या एकूण बँडविड्थपेक्षा अधिक आहे. मार्च ३, २००८ रोजी या यानाने मंगळाच्या उत्तर ध्रुवाजवळ बर्फाच्या वादळाचे (ऍव्हलांच) छायाचित्र घेतल्याचे शास्त्रज्ञांनी घोषित केले आहे.[३४]
डॉन अवकाशयान फेब्रुवारी २००९ मध्ये मंगळाजवळून जाईल व मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून ते ४ व्हेस्टा व नंतर सेरेसचे निरिक्षण करण्याच्या आपल्या मोहिमेवर निघेल.
भविष्यातील मोहिमा
फीनिक्सनंतर २०११ मध्ये मार्स सायन्स लॅबोरेटरी ही मोहीम हाती घेतली जाईल. यामध्ये अधिक मोठे, अधिक गतिमान (९० मी/तास वेगाचे) आणि अधिक बुद्धीमान रोव्हर समाविष्ट असतील. तसेच यामधील लेझरद्वारा रासायनिक पृथक्करण करणाऱ्या यंत्रामुळे १३ मी. अंतरावरूनही खडकामधील घडकांची माहिती मिळविता येईल.[३५]
२००९ मध्ये रशिया व चीन यांची संयुक्त मोहीम फोबॉस-ग्रंट नियोजित करण्यात आली आहे, जी मंगळाचा उपग्रह फोबॉसवरून परिक्षणासाठी नमुने घेऊन येईल आणि २०१३ मध्ये इसाने एक्झोमार्स नावाचे आपले पहिले रोव्हर मंगळावर पाठविण्याचे योजिले आहे. हा रोव्हर सेंद्रीय घटकांच्या शोधात मंगळावरील मातीत २ मी. खोलीपर्यंत खणू शकेल.[३६]
सप्टेंबर १५,२००८ रोजी नासाने मेव्हन या २०१३ मधील मंगळाच्या वातावरणाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी नियोजित केल्याची घोषणा केली. [३७]
मेटनेट या फिनिश-रशियन मोहिमेदरम्यान मंगळाच्या पृष्ठभागावर दहाहून अधिक छोटी-छोटी स्वयंचलित वाहने उतरविण्यात येतील. याद्वारे मंगळाचे वातावरण, भौतिकशास्त्र व हवामानशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी दूरवर पसरलेले एक जाळे तयार करण्यात येईल.[३८] या मोहिमेची नांदी म्हणून २००९ किंवा २०११ मध्ये एक किंवा काही थोडे लँडर प्रक्षेपित करण्यात येतील.[३९] हे लँडर रशियाच्या फोबॉस-ग्रंट यानाच्या पाठीवर वाहून नेले जाण्याची शक्यता आहे.[३९] या मोहिमेतील इतर प्रक्षेपणे २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्यात करण्यात येतील.
२००४ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी "व्हिजन फॉर स्पेस एक्स्प्लोरेशन" (अंतराळ संशोधनाचे ध्येय)[मराठी शब्द सुचवा] याची घोषणा केली. यामध्ये मंगळावरील मानवी मोहीम हे प्रमुख ध्येय म्हणून नमुद केले होते.[४०] नासा आणि लॉकहीड मार्टिन संस्थेने ओरायन या अवकाशयानाची (ज्याला पूर्वी क्र्यू एक्स्प्लोरेशन वेहिकल म्हटले जात असे) बांधणी सुरू केली आहे. याद्वारे २०२० पर्यंत चंद्रावर मानवी मोहीम पाठविण्याचे नियोजित करण्यात आले आहे. ओरायनची चंद्रावरील मोहीम त्याच्या पुढील मंगळावरील मोहिमेचा एक टप्पा असेल. सप्टेंबर २८, २००७ रोजी नासाचे व्यवस्थापक मायकल डी. ग्रिफिन यांनी सांगितले की २०३७ पर्यंत मंगळावर माणूस उतरवण्याचे नासाचे ध्येय आहे..[४१]
इसाची अपेक्षा आहे की ते २०३० ते २०३५ दरम्यान मंगळावर माणसास उतरवू शकतील.[४२] तत्पूर्वी मंगळावर अधिकाधिक मोठी याने पाठविण्यात येतील, ज्यांची सुरुवात एक्झोमार्स व मार्स सँपल रिटर्न मोहीम यांच्यापासून होईल.
मंगळावरून खगोलीय निरीक्षणे
मंगळावर पाठविण्यात आलेल्या अनेक ऑर्बिटर, लँडर व रोव्हर यामुळे आता मंगळाच्या आकाशातील खगोलशास्त्राचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मंगळावरून पृथ्वी व चंद्र विनासायास दिसतात. मंगळाचा उपग्रह फोबॉस पृथ्वीवरून दिसणार्या पूर्ण-चंद्राच्या कोनीय व्यासाच्या एक तृतीयांश आकाराचा दिसतो. याविरूद्ध डिमॉस तार्यासारखा दिसतो व पृथ्वीवरून दिसणार्या शुक्रापेक्षा थोडा अधिक तेजस्वी दिसतो.[४३]
तसेच उल्का व अरोरा यासारखे सुपरिचित आकाशातील घटना मंगळावरही बघण्यात आल्या आहेत.[३२] मंगळावर नोव्हेंबर १०, २०८४ रोजी पृथ्वीचे संकम्रण (सूर्यबिंबासमोरून पृथ्वी जाणे) दिसून येईल. यासोबतच मंगळावर बुधाचे संक्रमण व शुक्राचे संक्रमण दिसून येतात तसेच मंगळाचा उपग्रह डिमॉस खूप लहान असल्यामुळे त्याच्यामुळे होणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणास संक्रमण म्हणणेच योग्य ठरेल. (बघा मंगळावरून दिसणारे डिमॉसचे संक्रमण)
पृथ्वीवरून निरीक्षणाच्या संधी
मंगळ दर २७ महिन्यांनी पृथ्वीजवळ येतो. मात्र, दरवेळी तो कमी जास्त अंतरावर असतो. याला कारण मंगळ व पृथ्वी यांच्या सूर्याभोवतालच्या कक्षा पूर्ण गोलाकार नसून, किंचित लंबवर्तुळाकार आहेत. यामुळे मंगळ जवळ येताना पृथ्वीपासून ५.५७ कोटी ते १०.१ कोटी किलोमीटरपर्यंत येत असतो. त्याच्या या जवळ येण्याचे १५-१७ वर्षांचे चक्र असते. यापूर्वी २००३ मध्ये तो पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे अवघ्या ५.५७ कोटी किमी अंतरावर आला होता.
२२ मे २०१६ रोजी आणि त्यानंतर ३० मे २०१६ रोजी मंगळ पृथ्वाच्या अगदी जवळ आला होता. इतका जवळ तोया पूर्वी साठ हजार वर्षांपूर्वी आला होता. आता यानंतर ऑगस्ट २२८७ मध्ये पुन्हा मंगळ पृथ्वीलगत येईल.
मंगळाची प्रतियुती
मंगळ, पृथ्वी व सूर्य जेव्हा एका ओळीत येतात त्या स्थितीस मंगळाची प्रतियुती (अपोझिशन) म्हणून ओळखले जाते. २२ मे २०१६ रोजी अशी प्रतियुती झाली.
अशाच एका प्रतियुतीच्या वेळी म्हणजे १८७७ मध्ये मंगळाभोवती दोन चंद्र असल्याचा शोध लावला गेला. मुळातच मंगळ छोटा व तेजस्वी दिसत असल्याने त्याभोवतालचे चंद्र शोधणे अवघड होते. मात्र, वॉशिंग्टनच्या नेव्हल ऑब्झरव्हेटरीच्या 'अस्फ्हॉल' नावाच्या निरीक्षकाने मंगळाभोवतालचे अवघ्या १५-२० किमी आकाराचे बटाट्यासारखे दिसणारे चंद्र शोधले.
कालव्यांचा शोध?
मंगळाच्या १८७७ च्या प्रतियुतीवेळी जीओव्हानी शापरेली नावाच्या इटालियन खगोल निरीक्षकाने मंगळाची निरीक्षणे साडेआठ इंची दुर्बिणीतून घेऊन त्याचा छानसा नकाशा प्रसिद्ध केला. मंगळावरच्या रेघोट्यांना त्याने 'कॅनली' म्हटले. या इटालियन शब्दाचे भाषांतर इंग्रज लोकांनी 'कॅनॉल' असे करून एकच गोंधळ उडवून दिला. मंगळावर कॅनॉल असल्याची समजून काही लोकांनी करून घेतली. अमेरिकी हौशी आकाश निरीक्षक पर्सिव्हल लॉवेल याने तर स्वतःचे पैसे खर्च करून मंगळ निरीक्षणासाठी वेधशाळा बांधली. त्याचे त्याची निरीक्षणे 'मार्स' नावाच्या पुस्तकात मांडली. लॉवेलच्या मते मंगळावर प्रगत जीवसृष्टी असून, तेथील लोकांनी शेतीसाठी मंगळावर कॅनॉलचे जाळे बांधले आहे. याचमुळे मंगळाविषयीचे अनेक गैरसमज सर्वसामान्यांमध्ये पसरत गेले. मात्र, कालांतराने मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षणे घेतल्यावर मंगळावर कालवे नसल्याचे सिद्ध झाले.
मानवी संस्कृतीमध्ये मंगळाचे स्थान
हिंदू धर्मातील नवग्रह स्तोत्रात असा श्लोक आहे की,
- धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् I
- कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् II
याचा अर्थ असा की, "मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून निर्माण झाला, त्याला विजेसारखी अंगकांती आहे, त्याने हातात शक्ती हे शस्त्र धारण केले आहे, अशा कुमार स्वरुप मंगळाला मी नमस्कार करतो.".
जन्म पत्रिकेतील मंगळ दो़ष
पत्रिकेत मंगळ ग्रह हा प्रथम स्थानी (तनु स्थानी), चतुर्थ स्थानी (सुख स्थानी), सप्तम स्थानी (विवाह स्थानी ), अष्टम स्थानी (मृत्यू स्थानी ) किंवा द्वादश स्थानात (शैय्या सुख स्थानी ) असेल तर ती पत्रिका मंगळी असते. ज्या लोकांना मंगळदोष असतो अशा लोकांचा स्वभाव हा तापट, हट्टी, भांडकुदळ असतो, असे फलज्योतिष सांगते. ज्याच्या जन्मपत्रिकेतील मंगळ अशुभ स्थानी असेल त्यांनी पत्रिकेत असाच दोष असणारा जोडीदार शोधून लग्न करावे असा ज्योतिष्यांचा सल्ला असतो.
वक्री मंगळ
इतर ग्रहांप्रमाणे मंगळही कधीकधी वक्री होतो,. म्हणजे आकाशातून फिरताना मागे सरकल्यासारखा भासतो. हा सूर्यापासून १३५0 दूर गेल्यावर वक्री होतो. मंगल ज्या राशीत वक्री होतो, तेथे तो ६० ते ८० दिवस राहून पुढल्या राशीत जातो व ती पुढली रास १५ दिवसात पार करतो.
२०१३, २०१५, २०१७ व २०१९ साली मंगळ वक्री नव्हता/नसेल. २०१८ साली तो ६२ दिवस (२७ जून ते २७ ऑगस्ट) वक्री होता. २०२० साली तो १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर (६६ दिवस) या काळात वक्री असेल.
संदर्भ
- ^ a b Seidelmann, P. Kenneth (2007). Celestial Mechanics and Dynamical Astronomy. 98 (3): 155–180. doi:10.1007/s10569-007-9072-y http://adsabs.harvard.edu/doi/10.1007/s10569-007-9072-y. 2007-08-28 रोजी पाहिले. Unknown parameter
|coauthors=
ignored (|author=
suggested) (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://solarsystem.jpl.nasa.gov/planets/profile.cfm?Object=Mars&Display=Facts&System=Metric. 2007-03-06 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)*वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च २०, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.) - ^ ॲशली यीगर. http://www.sciencenews.org/view/generic/id/33622/शीर्षक/Impact_may_have_transformed_Mars_. २००८-०८-१२ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Ian Sample. http://www.guardian.co.uk/science/2008/jun/26/mars.asteroid?gusrc=rss&feed=science. 2008-08-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Trudy E. Bell and Tony Phillips. http://science.nasa.gov/headlines/y2002/12mar%5Fwaterplanet.htm. 2008-06-21 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ नासा. http://www.nasa.gov/mission_pages/phoenix/news/phoenix-20080731.html. 2008-08-01 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.nasa.gov/mission_pages/mars/news/mgs-20061206.html. 2007-01-04 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Webster, G.; Beasley, D. http://mpfwww.jpl.nasa.gov/mgs/newsroom/20050920a.html. २००७-०२-२६ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b David R. Williams. National Space Science Data Center http://nssdc.gsfc.nasa.gov/planetary/factsheet/marsfact.html. 2006-06-24 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ पेप्लो, मार्क. http://www.bioedonline.org/news/news-print.cfm?art=953. २००७-०३-१० रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Solex http://main.chemistry.unina.it/~alvitagl/solex/MarsDist.html. 2007-07-20 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ ESA website http://sci.esa.int/science-e/www/object/index.cfm?fobjectid=31031. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Greek Mythology http://www.theoi.com/Olympios/AresAttendants.html. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b Arnett, Bill. nineplanets http://www.nineplanets.org/phobos.html. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Ellis, Scott. http://calspace.ucsd.edu/Mars99/docs/library/science/geological_history/moons1.html. 2007-08-02 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)*वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च १६, २००५ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.) - ^ Helen Briggs (BBC science reporter, Boston). http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/7248062.stm. 2008-02-16 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^
Hannsson, Anders. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ . January 7, 2007 http://www.physorg.com/news87401064.html. 2007-03-02 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.nasa.gov/mission_pages/phoenix/news/phoenix-20080626.html. 2008-06-27 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Vladimir A. Krasnopolsky, Jean-Pierre Maillard, Tobias C. Owen (2004). Icarus. 172: 537–547. doi:10.1016/j.icarus.2004.07.004. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link) - ^ . February 25, 2005. doi:10.1038/news050221-15 http://www.nature.com/news/2005/050221/full/050221-15.html. 2006-03-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Dinerman, Taylor. The space review http://www.thespacereview.com/article/232/1. २००७-०३-२७ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Journey through the galaxy http://burro.astr.cwru.edu/stu/20th_far_mars.html. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ CNN- Destination Mars http://www.cnn.com/TECH/9706/pathfinder/surveyor/. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ University of Arizona Phoenix mission Website http://phoenix.lpl.arizona.edu/05_25_pr.php. 2008-05-25 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ NASA website http://www.nasa.gov/missions/solarsystem/phoenix_water.html. 2007-03-03 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://uanews.org/node/20276. 2008-08-24 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/7721032.stm. 2008-11-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ nasa.com http://mars.jpl.nasa.gov/odyssey/newsroom/pressreleases/20081009a.html. 2008-11-15 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Britt, Robert. Space.com http://www.space.com/missionlaunches/odyssey_update_030314.html. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Wardell, Jane. Space.com http://www.space.com/missionlaunches/beagle_update_040126.html. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b Bertaux, Jean-Loup. Nature Magazine http://www.nature.com/nature/journal/v435/n7043/abs/nature03603.html. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ NASA MER website http://marsrovers.jpl.nasa.gov/science/. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ CNN http://edition.cnn.com/2008/TECH/space/03/03/mars.avalanche.ap/index.html. 2008-03-04 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ NASA's MSL website http://mars.jpl.nasa.gov/msl/overview/. 2007-03-03 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Rincon, Paul. http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/6133712.stm. 2006-10-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ NASA Selects 'MAVEN' Mission to Study Mars Atmosphere
- ^ http://www.ava.fmi.fi/metnet-portal/?sivu=mainpage. 2008-08-28 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b http://www.ava.fmi.fi/metnet-portal/precursor/?sivu=launch. 2008-08-28 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)*वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती ऑगस्ट ३१, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.) - ^ Britt, Robert. Space.com FAQ: Bush's New Space Vision http://www.space.com/news/bush_plan_faq_040115.html#whenmars. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://news.yahoo.com/s/afp/20070924/ts_alt_afp/spaceconferenceindiausmars_070924135921. Missing or empty
|title=
(सहाय्य) (Bad link) - ^ http://www.esa.int/SPECIALS/Aurora/ESAONKTHN6D_0.html. 2007-03-03 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Planetary Societies's Explore the Cosmos http://www.planetary.org/explore/topics/mars/deimos.html. 2006-06-13 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)*वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै २८, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)