उपग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा ग्रह" म्हणजेचं उपग्रह. उपग्रह दोन प्रकारचे असू शकतात -

  • नैसर्गिक
उदाहरण - चंद्र, टायटन (शनीचा उपग्रह)
  • कृत्रिम (किंवा मानवनिर्मित)
उदाहरण - स्पुटनिक १, इन्सॅट, वगैरे.

आपला स्थल कालिक तोल सांभाळलेल्या उपग्रहाची गती ही पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरायच्या गतीला मिळवलेली असते. म्हणजेच ते उपग्रह सुद्धा चोवीस तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यांना भूस्थिर उपग्रह (जीओ-स्टेशनरी सॅटेलाईट्स) म्हणतात. त्यांची गरज दूरसंचारासाठी, डीटीएच सिग्नलमधे वगैरे असते म्हणूनच भारताचे इनसॅट श्रेणीचे सगळे उपग्रह (जीओ-स्टेशनरी सॅटेलाईट्स) हे भूस्थिर कक्षेत स्थापन केले जातात. ह्या कक्षेमधे पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाने व त्याच दिशेने जात राहतात ज्यामुळे ते कायम आपल्या डोक्यावर आहेत असे वाटते.