Jump to content

सजीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जिवंत, श्वसन करणारा व जिवंतपणाची इतर लक्षणे दाखवणारा प्राणी. सजीव ही व्याख्या सर्व सजीवाना लागू आहे.फक्त प्राण्याना नाही. जीव म्हणजे काय हा प्रश्न सुद्धा तसा जटिल आहे. सजीव सृष्टीमधील सर्वात लहान घटक म्हणजे पेशी. एकदा पेशी नष्ट झाली म्हणजे सजीवाचे आस्तित्व संपले. या पृथ्वीवर पेशी सजीव आहे. पेशीची व्याख्या- पेशी पटलाने बद्ध. पेशी अंतर्गत चयापचय श्वसन, अन्न ग्रहण, उत्सर्जन अशा क्रिया चालू आहेत. पेशीची वाढ होते,पेशी विभाजन होते. पेशी विघटन म्हणजे पेशीचा मृत्यू. सर्वसजीवाना मृत्यू आहे.पेशीचे कार्य ऊर्जा विनिमयाच्या नियमानुसार चालते. पेशीपटलामधून आलेल्या अन्न रेणूंच्या चयापचयामधून पेशी आवश्यक ऊर्जा निर्माण करते. थोडक्यात पृथ्वीवर पेशीबाहेर सजीव कोठेही नाही.

सजीवांची लक्षण

[संपादन]
  • श्वसन
  • वाढ
  • स्थलांतरण क्षमता
  • प्रजनन क्षमता
  • पेशीमय रचना
  • उत्सर्जन
  • चेतनाक्षमता
  • मृत्यू

संशोधकांनी सजीवांच्या संख्येचा अंदाज बांधण्यासाठी काही गणिती सिद्धांताचाही आधार घेतला. त्याच्या आधारे सजीवांची संख्या १०१२ एवढी असल्याचा म्हणजे '१०० अब्जांच्या' घरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.