शनी ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शनीचे उपग्रह प्रचंड आहेत, १ किमी व्यासाच्या उल्कांपासून ते प्रचंड टायटनपर्यंत. टायटन आकाराने बुधाहूनही मोठा आहे. शनीला ६२ निश्चित कक्षा असलेले उपग्रह, नावे असलेले ५३ आणि ५० किमीपेक्षा जास्त व्यास असलेले फक्त १३ उपग्रह आहेत.

शोध व नावे[संपादन]

ज्या काळात दुर्बिणीतून फोटो काढता येत नसत, त्याकाळीही शनीच्या आठ उपग्रहांचा शोध लागला होता. १६५५ साली टायटनचा शोध, टेथिस, डायोन, र्‍हिआ यांचा १६७१-७२ साली लागलेला शोध, मिमास-एन्सेलाडस यांचा १७८९ साली शोध.