शुक्र ग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


शुक्र
Venuspioneeruv.jpg
शुक्र
कक्षीय गुणधर्म
कक्षेचा कल: सूर्याच्या विषुववृत्ताशी
कोणाचा उपग्रह: सूर्य
उपग्रह: 0
वातावरण


सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर, आणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबगोलाकार असल्यातरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील अंतर्वर्ती ग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो. या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमाणात परावर्तित होतो. म्हणून शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.


शुक्र पृथ्वीहून जास्त सूर्याजवळ असल्यामुळे आकाशात नेहमी सूर्याच्या दिशेकडे दिसतो. त्यामुळेच तो पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसू शकतो. जर तो जास्त प्रखर बनला तर दिवसाही दिसू शकतो. शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची तेजस्विता -४,६ आहे. तो अंत्यर्वर्ती ग्रह असल्याने तो सूर्यापासून कधीच दूर दिसत नाही. तो जास्तीत जास्त तो ४७.८ अंशापर्यंत दूर जाऊ शकतो. त्याची तेजस्विता ही सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी सर्वांत जास्त असते त्यामुळेच त्याला पहाटेचा तारा किंवा सायंतारा असेही म्हणतात.

रचना[संपादन]

शुक्र हा ग्रह घन पृष्ठभाग असणारा ग्रह आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहे. आकार व वस्तुमानाच्या बाबतीत तो पृथ्वीशी कमालीचा मिळताजुळता आहे इतका की कित्येकदा त्याला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. शुक्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा फ़क्त ६६० कि.मी.ने कमी आहे तर त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ८१.५% इतके आहे. मात्र त्याचे वातावरण मात्र अत्यंत दाट कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीपेक्षा अत्यंत वेगळे आहे.

परिभ्रमण कक्षा व परिवलन[संपादन]

शुक्राला स्वत:भोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. त्यामुळे शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८,२०८,९३० कि.मी. एवढे आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिम दिशेला उगवतो व पूर्व दिशेला मावळतो. शुक्र हा देखील अंतर्वर्ती ग्रह असल्यामुळे याचेसुद्धा सूर्यावरील अधिक्रमण आपणास पहावयास मिळते. शुक्राला एकही चंद्र नाही. शुक्र सूर्यापासून १०६ दशलक्ष कि.मी. आहे. बाकीच्या ग्रहांची कक्षा जरी लंबवर्तुळाकार असली तरी शुक्राची कक्षा मात्र जवळपास वर्तुळाकार आहे. त्याचा पृष्ठभाग ताशी ६.५ कि.मी. वेगाने फिरतो, तर पृथ्वीच्या विषुववृत्ताजवळचा पृष्ठभाग हा ताशी १६०० कि.मी या वेगाने फिरतो.

निरीक्षण[संपादन]

संशोधन[संपादन]

मानवनिर्मित उपग्रहांच्य़ा मदतीने केलेले संशोधन[संपादन]

मानवी संस्कृतीमध्ये शुक्र[संपादन]

संदर्भ व आभार[संपादन]

हेही पहा[संपादन]