Jump to content

वाळवंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.

प्रकार

[संपादन]

वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते.

उष्ण वाळवंटे

[संपादन]

वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण ते शीत या पट्ट्यात येते.

वैशिष्ट्ये

[संपादन]

सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.

  • भौगोलिक वैशिष्ट्ये
  1. वाळूने व्यापलेला प्रदेश. वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
  2. हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण
  3. वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी
  4. विषम तापमान (कमाल आणि किमान पातळीमधील फरक ३० ते ६० अंश सेल्सियस पर्यंत)
  5. अत्यंत कमी वेळात निर्माण होणारी आणि नष्ट होणारी वाळूची प्रचंड वादळे
  6. दिवसा अत्यंत उष्ण अशी हवा आणि त्यामुळे होणारे परिणाम उदा. मृगजळ
  7. क्वचितच दिसणारे मरूस्थल किंवा ओऍसिस (Oasis)
  • जैविक वैशिष्ट्ये

अत्यंत विषम आणि प्रतिकूल वातावरणातही टिकून राहणाऱ्या वनस्पती आणि प्राणी हे वाळवंटाचे एक जैविक वैशिष्ट्य.

  1. निवडुंग कुटुंबातील व ताड कुटुंबातील (उदा. खजूर) तसेच काही खुरटी व काटेरी झुडुपे वाळवंटात सर्वत्र आढळतात.
  2. सरडासाप या सारखे सरपटणारे प्राणी.
  3. उंदीरखार या सारखे कृदंत वर्गातील प्राणी.
  4. गिधाडेगरुड यांच्यासारखे उड्डाणाचा लांब पल्ला असणारे पक्षी.
  5. काही वैशिष्ट्यपूर्ण कीटकदेखील मरूस्थलापासून काही अंतरापर्यंत दिसतात.
  6. मरूस्थलाजवळील जैवसंपदा मात्र अनेक प्रकारे वेगळी असू शकते, उदा. बदकासारखे पक्षी.

प्रमुख वाळवंटे

[संपादन]
जगातील प्रमुख वाळवंटे
क्रमनावप्रकारचित्रक्षेत्रफळ
(किमी²)
क्षेत्रफळ
(मैल²)
स्थान
1अंटार्क्टिक वाळवंटध्रुवीय13,829,430[]5,339,573अंटार्क्टिका
2आर्क्टिकध्रुवीय13,726,937[]5,300,000अलास्का (अमेरिका), कॅनडा, फिनलंड, ग्रीनलँड (डेन्मार्क), आइसलंड, नॉर्वे, रशियास्वीडन
3सहाराउष्ण कटिबंधीय9,100,000+3,320,000+अल्जिरिया, चाड, इजिप्त, इरिट्रिया, लिबिया, माली, मॉरिटानिया, मोरोक्को, नायजर, सुदान, ट्युनिसियापश्चिम सहारा
4अरबी वाळवंटउष्ण कटिबंधीय2,330,000[]900,000इराक, जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीयेमेन
5गोबी वाळवंटशीत कटिबंधीय1,300,000500,000चीनमंगोलिया
6कालाहारी वाळवंटउष्ण कटिबंधीय900,000[]360,000अँगोला, बोत्स्वाना, नामिबिया and दक्षिण आफ्रिका
7पांतागोनिया वाळवंटशीत कटिबंधीय670,000260,000आर्जेन्टिनाचिली
8भव्य व्हिक्टोरिया वाळवंटउष्ण कटिबंधीय647,000[]250,000ऑस्ट्रेलिया
9सीरियन वाळवंटउष्ण कटिबंधीय520,000[]200,000इराक, जॉर्डनसिरिया
10Great Basin Desertशीत कटिबंधीय492,000[]190,000अमेरिका
  1. Ward, Paul (2001). Antarctica Fact File Archived 2013-04-13 at the वेबॅक मशीन./
  2. 1 2 3 4 "Largest Desert in the World". 2011-12-27 रोजी पाहिले.
  3. "Arabian Desert". 2007-12-28 रोजी पाहिले.
  4. Bass, Karen (2009-02-01). "Nature's Great Events:The Okavango Delta, Kalahari Desert" (PDF). press.uchicago.edu. 2012-04-26 रोजी पाहिले.