Jump to content

साउथ पोल - ऐटकेन बेसिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंद्राची पृथ्वीअपरोक्ष बाजू. ऐटकेन बेसिन खालच्या भागात काळसर दिसते आहे.

साउथ पोल - ऐटकेन बेसिन हे चंद्रावरील प्रचंड विवर आहे. उल्कापाताने तयार झालेले हे विवर चंद्राच्या पृथ्वीअपरोक्ष अर्धात असून याचा व्यास अंदाजे २,५०० किमी तर खोली १३ किमी आहे. हे विवर असल्याची कल्पना लुना ३ आणि झाँड ३ या अंतराळयानांनी घेतलेल्या प्रकाशचित्रातून आली होती. १९६० च्या दशकाच्या मध्यात चंद्र परिक्रमा कार्यक्रमातून काढलेल्या इतर चित्रांतून याच्याबद्दल अधिक माहिती मिळाली. अपोलो १५ आणि अपोलो १६ मोहिमांतून लेसर अल्टिमीटर द्वारे मिळवलेल्या माहितीवरूनन लक्षात आले की याचा उत्तर भाग जास्त खोल होता. १९७८मध्ये युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेने याच्या रचनेचा नकाशा तयार केला तरीसुद्धा १९९०पर्यंत पूर्ण माहिती संकलित झालेली नव्हती. १९९० च्या दशकात गॅलेलियो क्लेमेंटाइन अंतराळयानांनी केलेल्या शोधात आझळून आले की या विवरात व त्याभोवतीच्या डोंगरांमध्ये फेरस ऑक्साइड (FeO) आणि टायटेनियम ऑक्साइडचे (TiO2) मोठे प्रमाण आहे. याशिवाय या यानांनी या विवराची त्रिमितीय चित्रेही घेतली.