व्हॅलेस मरिनेरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हॅलेस मरिनेरिस ही मंगळ ग्रहावरील अतिप्रचंड दरी आहे. याची लांबी अंदाजे ४,००० किमी, रुंदी २०० किमी तर सगळ्यात खोल ठिकाण पृष्ठभागाखाली ७ किमी इतके आहे[१][२]. सूर्यमालेतील सगळ्यात मोठ्या दऱ्यांपैकी एक असलेली ही दरी मंगळाच्या विषुववृत्तावर ग्रहाच्या २०% परिघावर आहे. थार्सिस फुगवट्याच्या पूर्वेस असलेली ही दरी नॉक्टिस लॅबिरिंथस पासून सुरू होते. हिच्या पूर्व भागात टिथोनियम कॅझम आणि आयुस कॅझम, मेलास कॅझमा, कँडर कॅझमा, कोप्रेट्स कॅझमा तसेच ओफिर कॅझमा आहेत. यानंतर गंगा कॅझमा, कॅप्री कॅझमाइऑस कॅझमा असून शेवट क्राइझी प्लॅनिटियामध्ये होते. नवीन संशोधनातून असेही सूचित होते की ही दरी खंड विघटन प्रक्रियेदरम्यान तयार झालेली असावी.[३][४] बहुतांश संशोधकांचे मत आहे की या दरीची रचना थार्सिस प्रदेशातील भूभाग घट्ट होत असताना झाली. याच्या पश्चिम भागात पाणी किंवा कार्बन डायॉक्साइड वाहून छोट्या नद्यांची पात्रे असल्यासारखे दिसून येते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. नासा - व्हेलेस मरिनेरिस
  2. नासा
  3. स्टुअर्ट वोल्पर्ट (२०१२-०८-०९). UCLA scientist discovers plate tectonics on Mars. युसीएलए.
  4. (2012-06-04) "{{{title}}}". Lithosphere 4 (4): 286–330. दुवा:10.1130/L192.1. Retrieved on 2012-10-02.