नत्रवायू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नायट्रोजन या पानावरून पुनर्निर्देशित)कार्बननत्रप्राणवायू
-

N

P
N-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक नत्र, N, ७
दृश्यरूप रंगहीन वायू, द्रव आणि घनरूप
रंगहीन वायू, द्रव आणि घनरूप
रासायनिक श्रेणी अधातू
अणुभार १४ ग्रॅ·मोल−१
घनता (० °से, १०१.३२५ कि.पा.)
1.251 ग्रॅ/लि
विलयबिंदू 63.15 के
(-210.00 °से, {{{विलयबिंदू फारनहाइट}}} °फा)
उत्कलनबिंदू (क्वथनबिंदू) 77.36 के
(-195.79 °से, {{{उत्कलनबिंदू फारनहाइट}}} °फा)


नत्रवायू किंवा नत्र:नत्रवायू हा वातावरणात कोणत्याही वायूच्या तुलनेत सर्वात जास्त प्रमाणात पसरलेला आहे.नत्राचा उपयोग हा सजीवांना थेट नसला,तरी सजीवांच्या वाढीसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण वायू आहे. नत्र (N, अणुक्रमांक ७) हे वायुरुप अधातू मूलद्रव्य आहे. कक्ष तापमानाला ह्या वायूचे रेणू हे विस्कळीत असतात आणि हा वायू रंगहीन व गंधहीन असतो.नत्र हे विश्वात सर्वसामान्यपणे आढळणारे एक मूलद्रव्य आहे,तसेच आपली आकाशगंगा आणि सूर्यमालेतील अंदाजे सातवा भाग नत्राने व्यापलेला आहे.पृथ्वीवर हे वायूरुपात आढळते;याने पृथ्वीच्या वातावरणाचा सुमारे ७८% भाग व्यापलेला आहे.हवेतील संयुगांना विघटीत करण्यासाठी स्कॉटीश भौतिकतज्ञ डॅनियल रुदरफॉर्ड यांनी इ.स.१७६२ साली नत्राचा शोध लावला.