Jump to content

नकाशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्याख्या

[संपादन]

भुपृष्ठाचे किंवा त्यावरील एखाद्या भागाचे सपाट कागदावर प्रमाणानुसार केलेले आरेखन म्हणजे नकाशा होय. नकाशा हा एखाद्या जागेचे वा प्रांताचे दृश्य सादरीकरण असते. ज्यात,त्या प्रांतातली ठिकाणे व नैसर्गिक खुणांचा एकमेकांशी संबंध दाखविलेला असतो. बहुतेक नकाशे हे तिन मिती जागेचे स्थिर दोन मिती, भौमितिकरित्या अचूक (वा जवळजवळ अचूक) असे प्रदर्शन करतात. पण आजकालच्या संगणकीय युगात नकाशे हे अंतक्रियाशील (interactive) व तिन मितीही असू शकतात. नकाशे मुख्यत: भुगोलासाठी वापरले जातात पण इतरही प्रदेशांचे उदाहरणार्थ मेंदु, आंतरिक्ष यांचेही नकाशे असू शकतात.

सर्वात जुने सापडलेले नकाशे आकाशाचे (त्यातील तारे व ग्रह यांचे) असले तरी, भुगोलासाठी प्रदेशाचा नकाशा वापरण्याची प्रथा प्राचीनकाळापासून चालत आलेली आहे. नकाशासाठी इंग्रजी शब्द मॅप हा मुळ लॅटिन मधल्या मॅप्पा मुंडी म्हणजे कागदावर किंवा कपड्यावर साकारलेले जग ह्यावरून आलेला आहे. जाधवनगर बलवडी ता.खाणापूर जि. सांगली जगु आण्णा

भौगोलिक नकाशे

[संपादन]

चित्र नकाशाची दिशा

[संपादन]

दिशा ही नकाशाची दुसरी महत्त्वाची बाब आहे. पूर्वीच्या काळी या बाबीला फारसे महत्त्व नसे. अंशतः याच कारणामुळे इसवीसनाच्या तेराव्या शतकापर्यंत नकाशात अचूक दिशा दाखविण्याचा प्रयत्‍न झाला नाही. पुढे होकायंत्राचा शोध लागला, तेव्हा नकाशात अचूक दिशा दाखविणे शक्य झाले.

मापनश्रेणी व अचूकता

[संपादन]
  • उद्देशात्मक नकाशे
    • टिंब पद्धत
    • क्षेत्रघनी पद्धती
    • समघनी पद्धती

इलेक्ट्रॉनिक नकाशे

[संपादन]

संकेतमान्य खुणा

[संपादन]

चिन्हे

[संपादन]

अभौतिक नकाशे

[संपादन]

अवकाश नसलेले नकाशे

[संपादन]

नेहमीच्या वापरातले नकाशे

[संपादन]

नकाशाचे प्रकार

[संपादन]

१.वितरणात्मक नकाशे- एखाद्या भौगोलिक घटकाचे वितरण दाखवण्यासाठी जे नकाशे तयार केले जातात त्यांना वितरणात्मक नकाशे असे म्हणतात. वितरणात्मक नकाशांचे दोन प्रकार पडतात. १) गुणात्मक नकाशे २) संख्यात्मक नकाशे १)गुणात्मक नकाशात माहिती केवळ गुणधर्मावर आधारित असते त्यात अचूकता नसते शिवाय अंदाजे ही माहिती वर्तवलेली असू शकते, त्यामुळे या नकाशांच्या आकृत्या काढणे अवघड जाते शिवाय यात जरी माहिती दर्शवली तरी ती अचूक नसते, उदा, एखाद्या गावातील पावसाचा अंदाज....

यात अचूकता नसल्याने सरासरी रंगछटा वापराव्या लागतात.

२) संख्यात्मक नकाशे- या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची घनता लक्षात घेऊन त्याचे क्षेत्रीय वितरण दर्शविलेले असते, त्या मुळे या नकाशात चढ उतार किंवा बदल हे चांगल्या प्रकारे दाखवता येतात. ही माहिती अचूक असते म्हणून याचे नकाशे काढने सोपे जाते. संख्यात्मक नकाशांचे तीन प्रकार पडतात. १) क्षेत्रमूल्य नकाशे. २) सममुल्य नकाशे. ३) टिंब पद्धती नकाशे.

याशिवाय प्रवाहरेशा नकाशा,रंग पद्धती नकाशा हे ही प्रकार वापरले जातात.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]