Jump to content

"लेणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५५: ओळ ५५:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भसूची}}
{{संदर्भसूची}}
* [[त्रिरश्मी (बुद्ध लेणी)]] - (अतुल भोसेकर)
*भारतीय संस्कृती कोश खंड आठवा
* भारतीय संस्कृती कोश ८वा खंड
* लेणी महाराष्ट्राची (सु,ह, जोशी)





१२:२७, ८ जुलै २०१७ ची आवृत्ती

डोंगरातील खडक खोदून तयार केलेले गुहागृह म्हणजे लेणे होय. प्रारंभी या लेणी अनलंकृत असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा.

लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्खु हे धम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धम्मप्रसारार्थ फिरणार्‍या भिक्खुंची ध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी अशी लेणी खोदून घेतली. अशी लेणी लेण्याद्री, जुन्नर परिसर, कार्ले, भाजे, नाशिक येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यात, ते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख सापडतो.

सबंध भारतात आज माहिती असलेली सुमारे एक हजार लेणी असून त्यापैकी शंभर लेणी ही ब्राह्मणी म्हणजे वैदिक व जैन आहेत. उरलेली ९०० ही बौद्धांची आहेत असे मानले जाते. सातवाहन काल व त्यानंतर परदेशी व्यापार्‍यांशी होणार्‍या व्यापारामुळे आलेली भरभराट ही या लेण्यांच्या निर्मितीला मदत करणारी ठरली असे मानले जाते.

कालानुसार लेण्यांचे तीन विभाग मानले गेले आहेत-

१. इ.स. पू. २ ते इ.स. चे दुसरे शतक

२. इ.स. ५ ते इ.स ७ चा मध्य

३. इ.स. ७ ते इ.स. १० ची अखेर

लेण्यांच्या अभ्यासातून त्या त्या प्रांताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला माहिती होतो..[]


लेण्यांचे दोन प्रकार आहेत.

१) ऐहिक लेणी - नाणेघाटात सातवाहनांचे देवकुळ म्हणजे कीर्तिमंदिर - पूर्वजांच्या प्रतिमांचे मंदिर. हे एकमेव लेणे ऐहिक लेणे म्हणून ज्ञात आहे.

२) धार्मिक लेणी - बौद्ध, जैन, हिंदू (ब्राह्मणी)

महाराष्ट्रातील लेणी

१. लोणावळे- कार्ले, कोंडाणे, बेडसे, भाजे, शेलारवाडी. इ.

२. जुन्नर- जुन्नर, नाणेघाट, पुलू सोनाळे, हरिश्चंद्रगड इ.

३. मुंबई- कान्हेरी, कोंदीवटे (कोंडाणे?), घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर, लोनाड (कल्याण-नाशिक रोडवर) इ.

४. नाशिक- अंकाई-तंकाई, चांभारलेणी, पांडवलेणी. इ.

५. देवगिरी- अजिंठा, औरंगाबाद, खडकी, घटोत्कच, पायण, पितळखोरे, वेरूळ, अंबाजोगाई इ.

६. कर्‍हाड- कर्‍हाड, कुंडल, पोहाळे, पन्हाळा किल्ला, लोहारी, शिरवळ इ.

७. कोकण- करसंबले, कुडे-मांदाड, खेड, चिपळूण,चौल, नाडसूर, महाड, वाडा-विमलेश्वर, पन्हाळे इ.

८. इतर- माहूर, धाराशिव, खरोसा, पाले, पुणे शहरातील लेणी
[]

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ महाराष्ट्रातील लेणी - प्रा. सु.ह जोशी
  2. ^ प्रा.जोशी सु.ह. महाराष्ट्रातील लेणी