पितळखोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पितळखोरे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावाजवळ पितळखोरे लेणी आहेत.

इतिहास[संपादन]

ही भारतातील सर्वात जुनी लेणी आहेत असे मानले जाते. लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन मानली जातात.या लेण्यांच्या कलावैभवाचा सविस्तर अभ्यास डॉ.म.न. देशपांडे यांनी केला आहे.

कलात्मक अविष्कार[संपादन]

या लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत.वर जाण्यास भुया-यातून पाय-या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे.मधल्या भागात ३५ स्तंभ आहेत.या स्तंभांवर धवल, कृष्ण,रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संतांची चित्र आहेत.भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत नि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चितारलेले,सजवलेले आहे.मुंडन केलली मुले व बुटक्या मूर्ती गुढघे टेकून वंदन करताना दिसतात.स्त्री-पुरुष आकृतीही दिसतात.या चित्रांचा काल गुहेपेक्षा अर्वाचीन दिसतो. चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत.विहार लेणे क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथ-यावर दाखविलेला पहिला गजथर आहे.हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दिसतात.या लेण्याच्या प्रवेश द्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प.या राजदंपतीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळेच महत्व प्राप्त करून घेतले आहे.[१]

चित्रदालन[संपादन]


निर्माण[संपादन]

हेही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. जोशी, सु.ह.-महाराष्ट्रातील लेणी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.