Jump to content

लॉस एंजेलस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लॉस एंजेलेस या पानावरून पुनर्निर्देशित)
लॉस एंजेलस
Los Angeles
अमेरिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
लॉस एंजेलस is located in कॅलिफोर्निया
लॉस एंजेलस
लॉस एंजेलस
लॉस एंजेलसचे कॅलिफोर्नियामधील स्थान

गुणक: 34°03′N 118°15′W / 34.050°N 118.250°W / 34.050; -118.250

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८५०
महापौर अँटोनिओ व्हिलारायगारोसा
क्षेत्रफळ १,२९०.६ चौ. किमी (४९८.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३३ फूट (७१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३७,९२,६२१
  - घनता ३,१६८ /चौ. किमी (८,२१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.lacity.org


लॉस एंजेलस (इंग्लिश: Los Angeles; En-us-los-angeles.ogg उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए. (LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे.[] कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस एंजेलस महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात.

दक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस एंजेलस महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस एंजेलसचा जगात न्यू यॉर्क महानगरतोक्यो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो.[][] लॉस एंजेलस जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते.[][] येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस एंजेलसला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो.

शहर रचना

[संपादन]
मलहॉलंड रस्त्यावरून टिपलेले लॉस एंजेलसचे विस्तृत छायाचित्र. डावीकडून: सांता अ‍ॅना डोंगर, लॉस एंजेलस शहरकेंद्र, हॉलिवूड, लॉस एंजेलस बंदर, पालोस व्हर्देस द्वीपकल्प, सांता कातालिना बेट व लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ.

लॉस एंजेलस महानगर १,२९०.६ किमी इतक्या विस्तारात पसरलेले आहे[]

हवामान

[संपादन]

लॉस एंजेलसमधील हवामान रुक्ष व उष्ण आहे. येथे वर्षातून सरासरी केवळ ३५ दिवस पाऊस पडतो. उन्हाळ्यादरम्यान येथील कमाल तापमान बरेच वेळा ४० से पेक्षा अधिक असते. आजवरचे विक्रमी कमाल तापमान ४५ से. २७ सप्टेंबर २०१० रोजी नोंदविले गेले.[]

लॉस एंजेलस (दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ परिसर) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °फॅ (°से) 68.1
(20.1)
69.6
(20.9)
69.8
(21)
73.1
(22.8)
74.5
(23.6)
79.5
(26.4)
83.8
(28.8)
84.8
(29.3)
83.3
(28.5)
79.0
(26.1)
73.2
(22.9)
68.7
(20.4)
75.6
(24.2)
दैनंदिन °फॅ (°से) 58.3
(14.6)
60.0
(15.6)
60.7
(15.9)
63.8
(17.7)
66.2
(19)
70.5
(21.4)
74.2
(23.4)
75.2
(24)
74.0
(23.3)
69.5
(20.8)
62.9
(17.2)
58.5
(14.7)
66.2
(19)
सरासरी किमान °फॅ (°से) 48.5
(9.2)
50.3
(10.2)
51.6
(10.9)
54.4
(12.4)
57.9
(14.4)
61.4
(16.3)
64.6
(18.1)
65.6
(18.7)
64.6
(18.1)
59.9
(15.5)
52.6
(11.4)
48.3
(9.1)
56.6
(13.7)
सरासरी पर्जन्य इंच (मिमी) 3.33
(84.6)
3.68
(93.5)
3.14
(79.8)
0.83
(21.1)
0.31
(7.9)
0.06
(1.5)
0.01
(0.3)
0.13
(3.3)
0.32
(8.1)
0.37
(9.4)
1.05
(26.7)
1.91
(48.5)
15.14
(384.7)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 0.01 inch) 6.5 6.0 6.4 3.0 1.3 0.6 0.3 0.5 1.2 2.0 3.1 4.3 35.2
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 225.3 222.5 267.0 303.5 276.2 275.8 364.1 349.5 278.5 255.1 217.3 219.4 ३,२५४.२
स्रोत: NOAA[][]

लॉस एंजेलस शहराने १९३२१९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच १९९४ फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना येथील पसाडिना शहरात खेळवण्यात आला होता. खालील चार व्यावसायिक संघ लॉस एंजेलस महानगरामध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
लॉस एंजेलस लेकर्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन स्टेपल्स सेंटर १९४९
लॉस एंजेलस क्लिपर्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन स्टेपल्स सेंटर १९८४
अ‍ॅनाहाइम डक्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग होंडा सेंटर १९९३
लॉस एंजेलस किंग्ज आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग स्टेपल्स सेंटर १९६७
लॉस एंजेलस डॉजर्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल डॉजर पार्क १९५८
लॉस एंजेलस एंजल्स ऑफ अ‍ॅनाहाइम बेसबॉल मेजर लीग बेसबॉल एंजल्स स्टेडियम ऑफ अ‍ॅनाहाइम १९६१

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Table 1: Annual Estimates of the Population for Incorporated Places Over 100,000, Ranked by July 1, 2005 Population: April 1, 2000 to July 1, 2005" (CSV). 2005 Population Estimates. युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो, Population Division. June 20, 2006. 2011-04-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 26, 2007 रोजी पाहिले.
  2. ^ The 150 richest cities in the world by GDP in 2005, dated March 11, 2007. The list fails to include Taipei. Retrieved July 3, 2007.
  3. ^ Bureau of Economic Analysis, 2009; GDP by Metropolitan Area Archived 2011-01-11 at the Wayback Machine., September 24, 2009.
  4. ^ "Revealed: Cities that rule the world". CNN. April 10, 2010. December 27, 2010 रोजी पाहिले.
  5. ^ "The Global Cities Index 2010". Foreign Policy. 2010. 2011-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 4, 2011 रोजी पाहिले.
  6. ^ U.S. Census[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  7. ^ Pool, Bob; Lin II, Rong-Gong. "L.A.'s hottest day ever". लॉस एंजेल्स टाइम्स. April 21, 2010 रोजी पाहिले.
  8. ^ "Climatography of the United States No. 20 (1971–2000) - Los Angeles Downtown USC, CA" (PDF). National Oceanic and Atmospheric Administration. 2004. 2010-07-25 रोजी पाहिले.[permanent dead link]
  9. ^ "NOAA". NOAA.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: