साम्राज्य
Jump to navigation
Jump to search
साम्राज्य (लॅटिन: Imperium, इंग्लिश: Empire) हा शब्द एखाद्या सम्राट अथवा बलाढ्य सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्राचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. साम्राज्य प्रस्थापित करणे ह्याला साम्राज्यवाद असे संबोधले जाते. जगाच्या इतिहासात रोमन साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, फ्रेंच साम्राज्य, रशियन साम्राज्य इत्यादी साम्राज्यांनी जगामधील मोठ्या भूभागावर अनेक दशके राज्य केले होते. भारतीय उपखंडामध्ये मौर्य साम्राज्य, मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य ह्या साम्राज्यांचे प्राबल्य होते.
साम्राज्य साधारणपणे आकाराने राजतंत्रापेक्षा मोठे व बलाढ्य असते. इतिहासामध्ये अनेकदा काही राजतंत्रांनी एकत्र येऊन साम्राज्याची स्थापना केल्याचे देखील आढळते. उदा: जर्मन साम्राज्य.