मार्गिका १ (मुंबई मेट्रो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्गिका १
माहिती
सेवा प्रकार मुंबई मेट्रो
सद्यस्थिती चालू
प्रदेश मुंबई
चालक कंपनी मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सरासरी प्रवासी ४,००,०००[१]
मार्ग
सुरुवात वर्सोवा
थांबे १२
शेवट घाटकोपर
अंतर १०.८१ किमी
प्रवासीसेवा
तांत्रिक माहिती
गेज १,४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज
विद्युतीकरण २५ केव्हीए एसी
वेग ८० km/h (५० mph)

मार्गिका १ ही मुंबई मेट्रो ह्या मुंबई शहरातील जलद परिवहन प्रणालीची एक मार्गिका आहे. ११.४ किमी लांबीची ही मार्गिका संपूर्णपणे उन्नत स्वरूपाची असून त्यावर एकूण १२ स्थानके आहेत. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणारी मार्गिका १ मुंबईच्या पूर्व उपनगरांना पश्चिम उपनगरांसोबत जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ₹४,३२१ कोटी इतका खर्च करून बांधण्यात आलेल्या ह्या मार्गिकेचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी करण्यात आले. आजच्या घडील रोज सुमारे २.३ लाख प्रवासी ह्या सेवेचा वापर करतात. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ही ह्या मार्गिकेची चालक कंपनी आहे.

स्थानके[संपादन]

मेट्रोच्या ह्या मार्गावर १२ स्थानके असून ती सर्व उन्नत स्वरूपाची आहेत.

# स्थानक अंतर (किमी) स्तिथी वाहतूक दुवे
दोन स्थानकांदरम्यान वर्सोवा पासून घाटकोपर पासून
वर्सोवा १०.८२१ उंचीवर काहीही नाही
डी.एन. नगर ०.९५५ ०.९५५ ९.८६६ उंचीवर मार्ग २ (नियोजित)
आझाद नगर ०.७९६ १.७५१ ९.०७ उंचीवर काहीही नाही
अंधेरी १.३६ ३.१११ ७.७१ उंचीवर अंधेरी रेल्वे स्थानक

(पश्चिम मार्ग, हार्बर मार्ग, भारतीय रेल्वे)

पश्चिम द्रुतगती महामार्ग १.००७ ४.११८ ६.७०३ उंचीवर मार्ग ७ (नियोजित)
चकाला (जे.बी. नगर) १.२६४ ५.३८२ ५.४३९ उंचीवर काहीही नाही
एअरपोर्ट रोड ०.७२५ ६.१०७ ४.७१४ उंचीवर काहीही नाही
मरोळ नाका ०.५९८ ६.७०५ ४.११६ उंचीवर मार्ग ३ (नियोजित)
साकी नाका १.०७५ ७.७८ ३.०४१ उंचीवर काहीही नाही
१० असल्फा १.१२३ ८.९०३ १.९१८ उंचीवर काहीही नाही
११ जागृती नगर ०.८६२ ९.७६५ १.०५६ उंचीवर काहीही नाही
१२ घाटकोपर १.०५६ १०.८२१ उंचीवर घाटकोपर रेल्वे स्थानक (मध्य मार्ग)
  1. ^ http://www.dnaindia.com/mumbai/report-mumbai-metro-one-proposes-to-install-platform-screen-doors-at-andheri-metro-station-2577602