वैकुंठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
File:Brooklyn Museum - A Vision of Vishnu (Vaikuntha Darshana)

वैकुंठ वा वैकुंठ धाम (IAST: Vaikuṇṭha ,संस्कृत: वैकुण्ठ ) श्रीलक्ष्मीनारायणाचे वास्तविक निवासस्थान आहे.सुखदायक दिव्य नैसर्गिक स्वर्गासारखे निवासस्थान आहे ,सर्वोत्तम निवासस्थान मानले जाते.ज्या स्वर्गीय जगामध्ये पालनकर्ता श्रीविष्णु क्षीरमहासागर शेषनागावर लक्ष्मीसह निवास करतात.

शांति, प्रेम,पुण्य,शुद्धता,संयम, दान, परिश्रम, धैर्य, दया आणि नम्रता व आनंदाचे स्थान आहे.

पुण्याद्वारे माणसाला या जगात स्थान मिळते. जो येथे पोचतो तो गर्भात परत येणार नाही कारण त्याला तारण प्राप्त झाले आहे.अध्यात्माच्या दृष्टीने वैकुंठलोक मन वा चेतनाची स्थान आहे.

मोक्ष,पुण्य करणारे लोक वैकुंठातच राहतात.एक शाश्वत दैवीय अविनाशी प्रकाशमान जग आहे.सर्व काही फलझाड,फुल,प्राणी,पक्षी,गाय,जलचर, समुद्र अनंत आहे.

भागवत पुराण वा ऋग्वेदः सूक्तं १.२२| अथर्ववेदसंहिता भाग २ मध्ये वर्णन, तद् विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः।[१][२]

अर्थ आणि नाव[संपादन]

वैकुण्ठ शब्दाचा अर्थ जहा कुंठा न हो , दुःख,निराशा, आळस आणि दारिद्र्य नाहीत.[३]

साकेत, गोलोका, परमधाम, परमस्थान, परमपद, परमवायम, सनातन आकाश, सत्व-पद, ब्रह्मपूर. नावे आहे.

हिंदू धार्मिक पौराणिक कथेनुसार वर्णन[संपादन]

देवी लक्ष्मी प्रभूच्या विष्णुच्या कमलशरणाजवळ प्रेमळ सेवा करत असते ,तर कधी स्वयंपाक गृहात असते

वैकुंठ लोक संबंधित धार्मिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक पैलूंबद्दल सांगणार आहोत -

धार्मिक दृष्टिकोन - साध्या शब्दांत सांगायचे झाले तर वैकुंठ धाम हे विष्णूचे निवासस्थान आहे. जसे कैलासवरील महादेव आणि ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये राहतात. विष्णूंचे निवासस्थान असलेले वैकुंठ अत्यंत दिव्य आहेत. वैकुंठ धाम जागरूक, आत्म-प्रकाशमय आहे. याची अनेक नावे आहेत- साकेत, गोलोका, परमधाम, परमस्थान, परमपद, परमवायम, सनातन आकाश, सत्व-पद, ब्रह्मपूर. धार्मिक विश्वास असा आहे की पृथ्वीवरील सर्वात मोठे आनंद म्हणजे वैकुंठातील सर्वात कमी आनंद होय. यातून आपण वैकुंठधामचे सर्वात मोठे आनंद कोणते असेल याचा विचार करू शकतो. अशा प्रकारे वैकुंठ हे परम आनंदाचे माहेरघर आहे.[४]


संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ "ऋग्वेदः सूक्तं १.२२ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-04 रोजी पाहिले. 
  2. ^ "पृष्ठम्:अथर्ववेदसंहिता-भागः २.pdf/३७१ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-04 रोजी पाहिले. 
  3. ^ "बैकुण्ठ". विकिपीडिया (hi मजकूर). 2018-06-28. 
  4. ^ "Vaikuntha". Wikipedia (en मजकूर). 2019-08-20. 


हे सुद्धा पहा[संपादन]