आकाश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आकाश ढगांच्या वर आकाश

आकाश किंवा आकाशीय कळस (इंग्रजी -skype )‌हा वातावरण आणि बाह्य जागेसह पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरच्या बाजूस जे काही आहे ते सर्व आहे.खगोलशास्त्राच्या क्षेत्रामध्ये आकाशास आकाशाचे क्षेत्र देखील म्हणतात. हे पृथ्वीवर केंद्रीत असलेला एक गोलाकार गोल आहे, ज्यावर सूर्य, तारे, ग्रह आणि चंद्र प्रवास करत आहेत. आकाशीय क्षेत्र पारंपारिकपणे नक्षत्र असे नामित भागात विभागले गेले आहे. सहसा, आकाश शब्द हा अनौपचारिकरित्या पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दृष्टिकोनात म्हणून वापरला जातो; तथापि, अर्थ आणि वापर भिन्न असू शकतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर निरीक्षक आकाशातील एक छोटासा भाग पाहू शकतो, जो एक घुमट असल्याचे दिसते, ज्यास आकाशातील वाडगा असेही म्हणतात, रात्रीपेक्षा दिवसा चापळ. हवामानाविषयी चर्चा करण्यासारख्या काही प्रकरणांमध्ये, आकाश वातावरणाच्या फक्त खालच्या आणि अधिक दाट भागाचा संदर्भ घेतो.दिवसाकाळाच्या दरम्यान, आकाश निळे दिसत आहे कारण हवा लालसररंगापेक्षा जास्त निळे सूर्यप्रकाश पसरवते. रात्री, आकाश मुख्यतः गडद पृष्ठभाग किंवा ताऱ्यांनी मिसळलेला प्रदेश असल्याचे दिसते. दिवसा ढगांनी अस्पष्ट केल्याशिवाय सूर्य आणि काहीवेळा चंद्र आकाशात दिसू शकतो. रात्रीच्या आकाशात चंद्र, ग्रह आणि तारे आकाशात एकसारखेच दिसू शकतात. आकाशात दिसणारी काही नैसर्गिक घटना म्हणजे ढग, इंद्रधनुष्य आणि ऑरो. आकाशात वीज व पाऊस देखील दिसू शकतो. पक्षी, कीटक, विमान आणि पतंग आकाशात उडतात. मानवी क्रियाकलापांमुळे, दिवसा धुके आणि रात्री प्रकाशाचे प्रदूषण मोठ्या शहरांपेक्षा वरचेवर दिसून येते.[१]

आकाशाचा रंग निळा का आहे ?[संपादन]

पृथ्वीचे वातावरण हे वायू, पाण्याची वाफ, धूळ कण इत्यादीने बनले आहे. हे वातावरण पृथिवीच्या सभोवताल आहे. जेव्हा या मधून सूर्याचा प्रकाश प्रसार पावतो तेव्हा निळा रंग हा सर्वोतोपरी पसरतो कारण निळा रंग हा प्रसारण पावलेल्या सर्व रंगात जास्त असतो. म्हणून आकाश हे निळ्या रंगाचे दिसते. दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीच्या तुलनेत हवेतील वायूंचे रेणू आणि वातावरणातील इतर सूक्ष्म कणांचे आकार खूपच लहान असतात. ज्या वेळी सूर्यप्रकाश वातावरणातून जातो त्या वेळी या सूक्ष्म कणांमुळे कमी तरंगलांबीच्या निळ्या रंगाचे जास्तीतजास्त प्रमाणात विकिरण होते. विकिरण झालेला हा प्रकाश आपल्याला दिसत असल्याने आकाश निळे भासते [२]

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ "Sky". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-06.
  2. ^ http://vsonagre.blogspot.com/2009/09/why-sky-is-blue.html , २३/११/२०११ हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=11472 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.अवकाशयुगामुळे बरेचसे विज्ञानीय शब्द प्रचारात आले आहेत. आकाश, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश आणि दूरस्थ अवकाश या पाच शब्दांचा अर्थछटा समजून घेणे किंवा त्यांचे अर्थ संकेताने निश्चित करणे आवश्यक वाटते.

आकाश : पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्यपकाशाचे विकीरण होअून निळ्या रंगाची पोकळी दिसते ते आकाश. आकाशात ढग असतात, इंद्रधनुष्य दिसते, आकाशातून पाअुसही पडतो. आकाशात पक्षी अुडतात, विमाने अुडतात (हिंदीतील हवाआी जहाज असा शब्द मराठीत न वापरता, रामायणातला विमान हा शब्द आपण वापरतो हे फार चांगले आहे). आकाशाला निळी छत्री असेही म्हणतात.

अंतराळ : पृथ्वीच्या वातावरणापलीकडील आणि पृथ्वीपासून चंद्राच्या कक्षेपर्यंतची पोकळी आहे तिला अंतराळ म्हणू या. म्हणजे चंद्रावर अंतराळवीर अुतरले, किंवा अंतराळवीरांनी हबल दुर्बिणीची दुरूस्ती केली किंवा मीर या अंतराळ स्थानकावरून अंतराळशास्त्रज्ञ पृथ्वीवर परतले, हे शब्दप्रयोग सार्थ वाटतील.

अंतराळात, पृथ्वीभोवती अुपग्रह फिरतात, संदेश दळणवळणासाठी भूस्थिर अुपग्रह असतात. भूस्थिर अुपग्रहांचे वैशिष्ट्य म्हणजे, पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा कोनीय वेग आणि या अुपग्रहांचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा कोनीय वेग अगदी सारखा असतो. त्यामुळे पृथ्वीवरून त्या अुपग्रहाचे वेध घेतांना तो स्थिर असल्यासारखा वाटतो. अेकाच दिशेने जाणाऱ्या दोन लोकल गाड्यांचा वेग सारखाच झाला की त्या फलाटावर अुभ्या असल्यासारख्या स्थिर वाटतात तसे. या अंतराळ पोकळीत वातावरणाचा अवरोध नसल्यामुळे यानांचा आणि अुपग्रहांचा वेग आणि कक्षा बऱ्याच काळापर्यंत स्थिर राहतात.

पृथ्वीपासून चंद्राच्या कक्षेपर्यंत किंवा चंद्रावर झेप घेणाऱ्या यानांना अंतराळयाने म्हणता येआील. 'यान' हा शब्दप्रयोग फारच चांगला आहे. वातावरणात अुडू शकते ते विमान आणि वातावरणाच्या पलिकडील पोकळीत प्रवास करू शकते ते यान. चंद्राच्या कक्षेपर्यंत प्रवास करतात ती अंतराळयाने. ज्यावर अंतराळवीर नसतो, फक्त अुपकरणेच असतात आणि जो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घाल त राहतो तो अुपग्रह. अमेरिकेच्या, डिस्कव्हरी, अटलांटिस आणि अेन्डेव्हर या अंतराळ शटल्सना अंतराळ वाहने म्हणणे

संयुक्तिक होआील कारण त्यात अंतराळवीर असतात आणि ती याने पुन्हा पुन्हा वापरता येतात. चॅलेन्जर आणि कोलंबिया ही अंतराळवाहने अपघाताने नष्ट झाली आहेत.

अंतरिक्ष : चंद्रकक्षेपलीकडील, सूर्यमालेतील पोकळी म्हणजे चंद्रकक्षेपासून आपल्या सूर्यमालेच्या शेवटच्या ग्रहाच्या कक्षेपर्यंतच्या पोकळीस अंतरिक्ष म्हणू या. सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा केन्द्र आहे, म्हणून त्याच्या पृष्ठभागापासून ते सूर्यमालेच्या परीघापर्यंत अंतरिक्षाची मर्यादा होते. शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून वगैरे ग्रहांचे, ज्या यानांतून वेध घेतले गेले ती अंतरिक्ष याने, अंतराळ याने नव्हेत. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह आणि त्यांचे अुपग्रह, प्लुटोसारखे बटुग्रह, लघुग्रहांचा पट्टा आणि त्यातील लघुग्रह, अशनी वगैरे वस्तू अंतरिक्षात भ्रमण करतात. पृथ्वीही अंतरिक्षातच भ्रमण करते. परंतु वातावरणापलीकडल्या आणि चंद्रकक्षेपर्यंतच्या भागाला आपण अंतराळ म्हटले आहे. म्हणून अंतराळ हा अंतरिक्षाचाच भाग होतो.

अवकाश : आपल्या सूर्यमालेच्या शेवटच्या ग्रहाच्या कक्षेपलीकडील पोकळी म्हणजे अवकाश, स्पेस. ज्यात फक्त अुपकरणेच असतात आणि जे आपल्या सूर्यमालेतील अेखाद्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालून नंतर अवकाशात प्रवासही करते ते अवकाशयान. आपली आकाशगंगा १ लाख प्रकाशवर्षे अीतक्या व्यासाची आणि मध्यभागी 10 हजार ते 12 हजार प्रकाशवर्षे जाडी असलेली चकती आहे. आकशगंगेत २०० अब्ज तारे आहेत. आपल्या आकाशगंगेचा विस्तार म्हणजे अवकाश. सूर्यमालिकेपलीकडे प्रवास करणाऱ्या पायोनियर सारख्या यानांना अंतराळ किंवा अंतरिक्ष याने न म्हणता अवकाशयाने म्हणणे जास्त संयुक्तिक व्हावे.

दूरस्थ अवकाश : आपल्या आकाशगंगेच्या पलीकडील, हजारो, किंवा लाखो पकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगा, दीर्घिका आणि तारकापूंज जेथे असतात ते दूरस्थ अवकाश, डीप स्पेस, असे छटाभेद करता येतील.

इंग्रजीत मात्र स्काय, स्पेस आणि डीपस्पेस हे तीनच शब्द प्रामुख्याने वापरतात.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले