शेषनाग
शेषनाग अर्थातच भगवान विष्णू एका सात फणी असलेल्या नागावर विश्राम घेत बसलेले आहेत असे म्हटले जाते.
आई-वडील[संपादन]
नवनागांपैकी एक म्हणजे ‘शेषनाग’ होय. याला देवांचा व मानवाचाही मित्र मानतात. श्री विष्णूंचा अंशावतार म्हणूनही त्याच्याविषयी सांगितले जाते.
शेषनाग हा कश्यप ऋषींच्या १३ बायकांन पैकी कद्रु हिचा पुत्र असल्याचे भागवत पुराणात आढळते.
वस्तीस्थान[संपादन]
शेषनाग हा पाताळात राहत असून त्याने आपल्या मस्तकावर पृथ्वीचा भार घेतला आहे, अशी कल्पना आहे.
स्वरूप[संपादन]
भगवंताचे शेषशायीरूप याच्यामुळे निर्माण झाले असून याला सहस्त्रमस्तके असल्याची कल्पना आहे. त्यामुळेच तो पृथ्वीचा भार सहन करतो. याच्या गळ्यामध्ये पांढरीशुभ्र रत्नमाला असून एका हातात नांगराचा फाळ व दुसऱ्या हातात कोयता आहे. गंगेने शेष नागाची भक्ती करून त्याच्याकडून ज्योतिष व खगोलशास्त्राचे ज्ञान मिळवले असं विष्णूपुराणात सांगितले आहे.
शक्ती[संपादन]
इच्छेला येईल त्याप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या शेषनागाला ठाऊक होती. त्यामुळेच त्याचे अनेक अवतार व कला निर्माण झाल्या. वसुदेव नवजात कृष्णाला घेऊन गोकुळात निघाले असता धो धो पाऊस पडत होता त्यावेळी त्या पावसापासून कृष्णाचे रक्षण करण्यासाठी शेषनागाने आपले फणाछत्र कृष्णावर धरले होते.
अवतार[संपादन]
राम बंधू लक्ष्मण, कृष्ण बंधू बलराम व महाभाष्यकार पतंजली हे शेषाचे अवतार समजले जातात. शेष हा कालाचे प्रतीक मानला जातो. तो असंख्य रूपांनी सृष्टीच्या संकोच-विकासात सहभागी होत असतो. विष्णूपुराणामध्ये शेषनागाची खालील स्तुती केलेली आहे.
स्तुती[संपादन]
त्वया धुतेयं धरणी विभर्ति चराचरं विेशमनन्तमूर्ते| कृतादि भेदै रज कालरुपो निमेषपूर्वी जगदेतदत्सि॥ याचा अर्थ असा- हे अनंतपूर्ती शेषा, तू ज्या धरित्रीला धारण करतोस, ती पृथ्वी चराचर विेशाला धारण करते. हे अजा, तू कृतयुगापासून निमेषापर्यंत कालाचे भाग असणाऱ्या विेशाचे भक्षण करतोस. सर्व जगाला शेषरुपी नागाने लपटलेले आहे, अशी कल्पना आहे.
काल आणि दिक या दोहोंच्या खेचाखेचीत सृष्टीच्या उत्पत्तिस्थिती- लयाची प्रिाया चालत राहणे, महत्त्वाचे आहे. ज्यावेळी सर्व सृष्टीचा विनाश होतो, तेव्हा कालशेष शिल्लक राहतो म्हणून काल आणि शेष हे दोघेही एकाच तत्त्वाचे पर्याय आहेत. लक्ष्मी आणि वारुणी या शेषाची पूजा करतात आणि प्रलयकाळामध्ये शेष विषयुक्त अग्निज्वाला बाहेर फेकत असतो, अशी ही कल्पना पुराण ग्रंथात मांडलेली आहे.
पुराणात अनेक नागांचा उल्लेख आहे जसे ; वासुकी, शेष, पद्म, कंबल, कार कोटक, नागेश्वर, धृतराष्ट्र, शंख पाल, कालाख्य, तक्षक, पिंगल, महा नाग आदि नागांच वर्णन आहे.
बाह्य दुवे[संपादन]
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |