छत्तीसगढचे मुख्यमंत्री
Appearance
(छत्तीसगडचे मुख्यमंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)
छत्तीसगढचे मुख्यमंत्री
Chief Minister of State of Chhattisgarh | |
---|---|
छत्तीसगढची राजमुद्रा | |
भारतीय ध्वजचिन्ह | |
शैली | राज्यसरकार प्रमुख |
सदस्यता | छत्तीसगढ विधानसभा |
वरिष्ठ अधिकारी | छत्तीसगढचे राज्यपाल |
निवास | बी३, मुख्यमंत्री आवास, सिव्हिल लाईन्स, रायपूर |
मुख्यालय | महानदी भवन, रायपूर |
नियुक्ती कर्ता | छत्तीसगढचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
निर्मिती | १ डिसेंबर २००० |
पहिले पदधारक | अजित जोगी |
उपाधिकारी | छत्तीसगढचे उपमुख्यमंत्री |
छत्तीसगढचा मुख्यमंत्री हा भारताच्या छत्तीसगढ राज्याचा सरकारप्रमुख व विधानसभेचा प्रमुख नेता असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांद्वारे निवडला जातो व छत्तीसगढच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ छत्तीसगढ राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे.
२००० सालच्या छत्तीसगढ राज्याच्या स्थापनेनंतर आजवर एकूण ४ व्यक्ती छत्तीसगढच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. भारतीय जनता पक्षचे विष्णुदेव रामप्रसाद साई हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
मुख्यमंत्र्यांची यादी
[संपादन]क्र | नाव | चित्र | पदावरील काळ | कार्यकाळ | निवडणूक | पक्ष | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|
छत्तीसगढ राज्य (२००० पासून) (मध्य प्रदेश पुनर्रचना अधिनियम, २०००द्वारे १ नोव्हेंबर २००० रोजी मध्य प्रदेश राज्याचा काही भागाचे विभाजन करत छत्तीसगढ राज्याची स्थापना करण्यात आली.) | ||||||||
१ | ॲड. अजित प्रमोदकुमार जोगी (१९४६-२०२०) (मतदारसंघ: मरवाही) |
१ नोव्हेंबर २००० | ७ डिसेंबर २००३ | ३ वर्षे, ३६ दिवस | १९९८ (विभाजनपूर्व मध्य प्रदेश) |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
२ | डॉ. रमण विघ्नहरण सिंह (जन्म १९५२) मतदारसंघ: डोंगरगाव (२००३-२००८) राजनांदगांव (२००८-२०१८) |
७ डिसेंबर २००३ | १७ डिसेंबर २००३ | १५ वर्षे, १० दिवस | २००३ ————————— २००८ ————————— २०१३ |
भारतीय जनता पक्ष | ||
३ | भूपेश नंदकुमार बघेल (जन्म १९६०) (मतदारसंघ: पाटण) |
१७ डिसेंबर २०१८ | १३ डिसेंबर २०२३ | ४ वर्षे, ३६१ दिवस | २०१८ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
४ | विष्णुदेव रामप्रसाद साई (जन्म १९६४) (मतदारसंघ: कुंकरी) |
१३ डिसेंबर २०२३ | पदस्थ | ० वर्षे, ३३१ दिवस | २०२३ | भारतीय जनता पक्ष |
छत्तीसगढमधील राष्ट्रपती राजवट तपशील
[संपादन]छत्तीसगढमध्ये आत्तापर्यंत एकदाही राष्ट्रपती राजवट लावण्यात आली नाही.