Jump to content

छत्तीसगढ विधानसभा निवडणूक, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छत्तीसगढ विधानसभा निवडणूक, २०२३
विधानसभा निवडणुक
देशभारत संपादन
कार्यक्षेत्र भागछत्तीसगड संपादन
मागील.२०१८ छत्तीसगढ विधानसभेची निवडणूक संपादन
तारीख७ नोव्हेंबर 2023, १७ नोव्हेंबर 2023 संपादन

छत्तीसगढ विधानसभेच्या सर्व ९० सदस्यांची निवड करण्यासाठी छत्तीसगढ राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी दोन टप्प्यात पार पडल्या. मतांची मोजणी करण्यात आली आणि ३ डिसेंबर २०२३ रोजी निकाल घोषित करण्यात आला.[] निकालात, भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या व बहुमताचा टप्पा पार पाडला. आम आदमी पक्षाच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम गमवावी लागली.[]

पार्श्वभूमी

[संपादन]

छत्तीसगढ विधानसभेचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे.[] यापूर्वीच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्य सरकार स्थापन केले व भूपेश बघेल हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.[]

वेळापत्रक

[संपादन]

भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२३ रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.[][]

छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचे टप्पे
मतदान कार्यक्रमपहिला टप्पादुसरा टप्पा
सूचना तारीख१३ ऑक्टोबर २०२३२१ ऑक्टोबर २०२३
नामांकनाची सुरुवात१३ ऑक्टोबर २०२३२१ ऑक्टोबर २०२३
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख२० ऑक्टोबर २०२३३० ऑक्टोबर २०२३
नामांकनाची छाननी२१ ऑक्टोबर २०२३३१ ऑक्टोबर २०२३
नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख२३ ऑक्टोबर २०२३२ नोव्हेंबर २०२३
मतदानाची तारीख७ नोव्हेंबर २०२३१७ नोव्हेंबर २०२३
मतमोजणीची तारीख३ डिसेंबर २०२३३ डिसेंबर २०२३

पक्ष आणि युती

[संपादन]

स्रोत:[][][]

युती/पक्षझेंडाचिन्हनेताजागा लढवल्या
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भूपेश बघेल ९०
भारतीय जनता पक्ष नारायण चंदेल ९०
बसपा+[१०] बहुजन समाज पक्ष हेमंत पोयाम[११] ५८ ९०
गोंडवाना गणतंत्र पक्ष कुलदीप प्रजापती[११] ३२
जनता काँग्रेस छत्तीसगड अमित जोगी ७७
आम आदमी पक्ष कोमल हुपेंडी[१२] ५३

परिणाम

[संपादन]
पार्टी मते जागा
मते % जागा लढल्या जागा जिंकल्या +/-
भारतीय जनता पक्ष ७,२३४,९६८४६.२७%९०५४increase ३९
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,६०२,५८६४२.२३%९०३५ ३३
गोंडवाना गणतंत्र पक्ष ३२increase
इतर पक्ष ८६७,०६३५.५५%
अपक्ष
नोटा १९७,६७८१.२६%
एकूण १००.००%९०-

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Voter turnout" (PDF). Chhattisgarh CEO.[permanent dead link]
  2. "All AAP Candidates Lose Deposit In Chhattisgarh Polls". NDTV.com. 2023-12-05 रोजी पाहिले.
  3. "Terms of the Houses". Election Commission of India (इंग्रजी भाषेत). 28 March 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-13 रोजी पाहिले.
  4. "Bhupesh Baghel sworn in as Chief Minister of Chhattisgarh". द हिंदू (इंग्रजी भाषेत). PTI. 2018-12-17. ISSN 0971-751X. 2022-02-13 रोजी पाहिले.CS1 maint: others (link)
  5. "Chhattisgarh votes in 2 phases on November 7, 17" (इंग्रजी भाषेत). 9 October 2023. 9 October 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 October 2023 रोजी पाहिले.
  6. "Chhattisgarh Election 2023: Two-Phase Polling On November 7 And November 17". news.abplive.com (इंग्रजी भाषेत). 2023-10-09. 2023-11-14 रोजी पाहिले.
  7. "Chhattisgarh Assembly Elections 2023 first phase on Tuesday: Voters in 20 seats set to determine fate of 223 candidates". ETV Bharat News (इंग्रजी भाषेत). 2023-11-16 रोजी पाहिले.
  8. "Chhattisgarh: 70 seats up for grabs in 2nd phase of polls; CM Baghel among 958 in fray". Moneycontrol (इंग्रजी भाषेत). 2023-11-16. 2023-11-16 रोजी पाहिले.
  9. "Chhattisgarh polls: 2nd phase polling today, Bhupesh Baghel among others in fray". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-11-17 रोजी पाहिले.
  10. "BSP to ally with Gondwana party in M.P., Chhattisgarh; will fight alone in Rajasthan, Telangana". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2023-10-09. ISSN 0971-751X. 2023-11-17 रोजी पाहिले.
  11. 1 2 "Amid Chhattisgarh Cong-BJP game, bit players wait in the wings: Jogi party to BSP-GGP alliance". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2023-11-12. 2023-11-17 रोजी पाहिले.
  12. "AAP to kickstart campaign in Chhattisgarh soon". The Sunday Guardian Live (इंग्रजी भाषेत). 2023-04-29. 2023-11-17 रोजी पाहिले.[permanent dead link]