कोइंबतूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोयंबत्तूर या पानावरून पुनर्निर्देशित)
कोइंबतूर
கோயம்புத்தூர்
भारतामधील शहर
कोइंबतूर is located in तमिळनाडू
कोइंबतूर
कोइंबतूर
कोइंबतूरचे तमिळनाडूमधील स्थान

गुणक: 11°00′00″N 76°58′00″E / 11.00000°N 76.96667°E / 11.00000; 76.96667

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
जिल्हा कोइंबतूर जिल्हा
क्षेत्रफळ २४६.७५ चौ. किमी (९५.२७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,३४९ फूट (४११ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १०,५०,७२१
  - महानगर २१,३६,९१६
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
अधिकृत संकेतस्थळ


कोइंबतूर हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील चेन्नई खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व कोइंबतूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. कोइंबतूर शहर तमिळनाडूच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा भाग असलेल्या अनामलाईनिलगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले आहे. पालक्काड खिंड कोइंबतूर व तमिळनाडूला केरळ राज्यासोबत जोडते. कोइंबतूर शहर चेन्नईपासून ५०० किमी, बंगळूरपासून ३१० किमी तर पालक्काडपासून ५० किमी अंतरावर स्थित आहे. उटी हे दक्षिण भारतामधील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे पर्यटनस्थळ कोइंबतूरपासून ८५ किमी अंतरावर आहे. २०११ साली कोइंबतूरची लोकसंख्या १०.५ लाख होती.

येथील कापूस उत्पादनामुळे व मोठ्या प्रमाणावरील वस्त्रउद्योग कारखान्यांमुळे कोइंबतूरला दक्षिण आशियाचे मॅंचेस्टर असे संबोधले जात असे. स्वातंत्र्यानंतर कोइंबतूरचे झपाट्याने उद्योगीकरण झाले व सध्या ते भारतामधील सर्वात झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक मानण्यात येते.

वाहतूक[संपादन]

कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून १५ किमी अंतरावर असून तो भारतामधील १८व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. सध्या येथून केवळ देशांतर्गत प्रवासी वाहतूक चालवली जाते. कोइंबतूर रेल्वे स्थानक दक्षिण रेल्वेवरील चेन्नई सेंट्रलखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. येथून चेन्नई, दिल्ली, मुंबई, बंगळूर इत्यादी अनेक शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेली निलगिरी पर्वतीय रेल्वे कोइंबतूरच्या मेट्टुपलयम ह्या उपनगरापासून उटीपर्यंत धावते.

राष्ट्रीय महामार्ग ४७, ६७२०९ हे तीन राष्ट्रीय महामार्ग कोइंबतूरमधून जातात. कोइंबतूर शहरामधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी येथे मोनोरेल मार्गाचे प्रस्तावन करण्यात आले आहे.

कोइंबतूर हे कृषि विद्यापीठ असलेले शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत