Jump to content

कोकणी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Look up कोकणी भाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
कोकणी भाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
कोंकणी
कोंकणी
स्थानिक वापर भारत
प्रदेश गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ
लोकसंख्या 98 लाख
क्रम १२३
बोलीभाषा

बारदेशी, आंतरूजी, शास्तिकार, मालवणी, कॅनरा क्रीस्तांव, कॅनरा सारस्वत,

सिद्दी, कोच्ची
भाषाकुळ
लिपी देवनागरी, रोमन लिपी, कानडी लिपी, मल्याळी लिपी, अरबी लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-२ kok
ISO ६३९-३ kok[मृत दुवा]

कोंकणी ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी एक इंडो-युरोपीय भाषा आहे.गोवा राज्याची ही राजभाषा आहे. त्याचप्रमाणे  महाराष्ट्र, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. पूर्वी कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकात कानडी तर केरळातील कोकणी लोक मल्याळी लिपी वापरत असत. मात्र आता सर्वत्र देवनागरी लिपीतून कोंकणी लिहिली जाते. व कोकणी मुसलमान अरबी लिपी वापरतात. गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर होतो. गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात.  कोंकणी ही गोव्याची राजभाषा असून मराठीला गोव्यात समकक्ष दर्जा आहे. अनुस्वार हा कोंकणी भाषेचा श्वास आहे  .

कोंकणी ही (macrolanguage) एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार (individual languages) गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोंकणी ही त्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा प्रभाव आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोंकणीही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे 98 लाखांहून अधिक आहे.

इंडो-आर्यन भाषांत ही सर्वांत दक्षिण टोकाकडील भाषा आहे. तिचे नाते मराठी आणि गुजरातीशी आहे. केरळमध्ये आणि कर्नाटकात बोलल्या जाणाऱ्या कोंकणी भाषेत द्रविड भाषांतले अनेक मूळ शब्द आहेत[].

गोव्यामध्ये​ सुनापरांत हे कोंकणी दैनिक दीर्घकाळ प्रकाशित होत होते. १ आगस्ट २०१७ साली ते ​बंद झाले. त्यानंतर आता भांगरभूंय हे देवनागरी कोंकणी दैनिक प्रकाशित होते. त्याचप्रमाणे ४ फेब्रुवारी २०१८ पासून गोंयकार हे कोंकणी भाषेतील पहिली आणि एकमेव न्यूजसाईट तसेच युट्युब चॅनेल  सुरू करण्यात आले. गोव्याच्या ओपिनियन पोल काळात कोंकणी भाषेचा लढा 'राष्ट्रमत' या दैनिकाने लढवला होता. मराठी भाषेतून कोंकणीची बाजू मांडणारे हे दैनिक कालौघात बंद झाले. मात्र ४ फेब्रुवारी २०१८ ​पासून पत्रकार, लेखक किशोर अर्जुन यांनी राष्ट्रमत नावाने हे दैनिक ऑनलाईन प्रकाशित करू लागले.  त्याचप्रमाणे राष्ट्रमतचे युट्युब चॅनलदेखील आहे. या व्यतिरिक्त गोव्यामध्ये रोमन कोंकणीमध्ये आमचो आवाज, वावरड्यांचो इष्ट ही साप्ताहिके प्रकाशित होतात. तर बिंब आणि गोंयकाराक जाग हे देवनागरी कोंकणीमध्ये साहित्यिक मासिके प्रकाशित होतात.  

वैशिष्ठ्ये

[संपादन]

कोंकणी भाषेचे व्याकरण मराठी भाषेच्या जवळ जाणारे असले तरी, ते तंतोतंत मराठी भाषेचे व्याकरण नाही. कोंकणीमध्ये (दीर्घ स्वर सोडून) १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. प्रत्येक स्वर नाकात उच्चारला जातो.

स्वर

[संपादन]


कोंकणी भाषेचे एक वैशिष्ट्य असे आहे की कोंकणीतला चा उच्चार मराठीतल्या अच्या उच्चारापेक्षा वेगळा आहे. मराठीत वापरतात त्या ’अ’साठी IPA चिन्ह आहे ə (unrounded mid vowel), तर कोंकणीतला ’अ’ ɵ(rounded Close-mid central vowel) ने दाखवतात.

कोंकणीत ’ए’ या स्वराचे तीन उच्चार आहेत. :e, ɛ आणि æ.

कोंकणीत वापरला जाणारा æ स्वर IPAच्या æ (Near-open front unrounded vowel) या प्रमाण स्वरापासून वेगळा आहे. कोंकणीत वापरतात तो स्वर ɛ आणि æ यांच्या मधला आहे, आणि प्रमाण æ पेक्षा लांब आहे. प्रमाण æ फक्त युरोपियन भाषांतून आलेल्या तत्सम शब्दांसाठी वापरला जातो.

Front Near-front Central Near-back Back
Close
i •
• u
ɪ •
• ʊ
e •
• ɵ
• o
ɛ •
ʌ • ɔ
a •
• ɒ
Near‑close
Close‑mid
Mid
Open‑mid
Near‑open
Open

व्यंजन

[संपादन]
Consonants
  Labial Dental Alveolar Retroflex Alveopalatal Velar Glottal
Voiceless
stops
p

t̪ʰ
  ʈ
ʈʰ

cɕʰ
k
 
Voiced
stops
b

d̪ʰ
  ɖ
ɖʰ
ɟʝ
ɟʝʰ
ɡ
ɡʰ
 
Voiceless
fricatives
    s   ɕ   h
Nasals m

n̪ʰ
  ɳ
ɳʰ
ɲ ŋ  
Liquids ʋ
ʋʰ
  l ɾ
ɾʰ
ɭ ɽ j    

कोंकणीतील व्यंजने मराठीच्या व्यंजनांसारखीच आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ F.C. Southwort. "Prehistoric Implications of the Dravidian element in the NIA lexicon, with special attention to Marathi" (PDF).
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत