सिद्दी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कर्नाटक मधील सिद्दी स्त्री

सिद्दी इंग्लिश- Siddhi, or Sheedi (उर्दु: شیدی ‎; हिंदी, कोकणी: सिद्दी or शीदि/ಸಿದ್ಧಿ; सिंधी: شيدي; गुजराती: સીદી; कानडी: ಸಿದ್ಧಿಗಳು) हे आफ्रिकन मूळ असलेले भारतात वास्तव्य करणारे लोक आहेत. त्यांची भारतातील संख्या सुमारे २०,०००-५५,००० असून ते प्रामुख्याने गुजरात, हैदराबाद आणि कर्नाटक मध्ये राहतात. महाराष्ट्रातील जंजिरा हा अजिंक्य व अभेद्य किल्ला सिद्दींचा होता. हे लोक मुख्यत्वे सुफी मुस्लिम, काही हिंदु व काही कॅथॉलिक ख्रिश्चन असतात.

इतिहास[संपादन]

सिद्दी लोक इ.स. ६२८ साली भरुच बंदरात आल्याचे बोलले जाते व काही जण मुहम्मद बिन कासिमच्या सैन्यात आले. त्यांना अरब सैन्यात झांजि म्हटले जाई.


सिद्दी बोलीभाषा[संपादन]

भारतीय भाषांची लोकगणना' म्हणजेच पीपल्स लिंग्विस्टिक सव्‍‌र्हे ऑफ इंडिया हा 'भाषा' या बडोद्यातील संस्थेच्या महाराष्ट्रातील सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सिद्दी बोली ज्ञात असलेली केवळ दोन कुटूंबे होती आणि तीही सहसा सिद्दी बोलीचा उपयोग करत नाहीत. [१]

संदर्भ[संपादन]