आल्प-मरितीम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| आल्प-मरितीम Alpes-Maritimes |
||
| फ्रान्सचा विभाग | ||
|
||
आल्प-मरितीमचे फ्रान्स देशामधील स्थान |
||
| देश | ||
| प्रदेश | प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर | |
| मुख्यालय | नीस | |
| क्षेत्रफळ | ४,२९९ वर्ग कि.मी. | |
| लोकसंख्या | १०,८२,४६५ | |
| घनता | २५१.८ प्रति वर्ग कि.मी. | |
आल्प-मरितीम (फ्रेंच: Alpes-Maritimes; ऑक्सितान: Aups Maritims) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या आग्नेय कोपर्यात इटली देशाच्या सीमेवर आल्प्स पर्वतरांगेत व भूमध्य समुद्राच्या किनार्यावर वसला आहे. मोनॅको हा सार्वभौम देश पूर्णपणे आल्प-मरितीमच्या आंतर्गत आहे.
येथील फ्रेंच रिव्हिएरावरील अनेक निसर्गरम्य व प्रसिद्ध समुद्रकिनार्यांमुळे पर्यटन हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. दाट लोकवस्तीच्या ह्या विभागामधील नीस, अँतिब व कान ही मोठी शहरे आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
| आल्प-दा-ओत-प्रोव्हाँस · ओत-आल्प · आल्प-मरितीम · बुश-द्यु-रोन · व्हार · व्हॉक्ल्युझ |