सीन-मरितीम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सीन-मरितीम Seine-Maritime |
||
| फ्रान्सचा विभाग | ||
|
||
सीन-मरितीमचे फ्रान्स देशामधील स्थान |
||
| देश | ||
| प्रदेश | ओत-नोर्मंदी | |
| मुख्यालय | रोआँ | |
| क्षेत्रफळ | ६,२७८ वर्ग कि.मी. | |
| लोकसंख्या | १२,४३,८३४ | |
| घनता | १९८.१ प्रति वर्ग कि.मी. | |
सीन-मरितीम (फ्रेंच: Seine-Maritime) हा फ्रान्स देशाच्या ओत-नोर्मंदी प्रदेशातील दोनपैकी एक विभाग आहे (दुसरा विभागः युर). हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर व सीन नदीच्या मुखाजवळ वसला आहे. रोआँ ही ह्या विभागाची राजधानी व ला आव्र हे येथील एक मोठे शहर आहे.
दुसर्या महायुद्धादरम्यान झालेल्या घनघोर लढाईत नोर्मंदीमधील इतर विभागांप्रमाणे येथे देखील अतोनात जीवित व वित्तहानी झाली होती.
बाह्य दुवे[संपादन]
- (फ्रेंच) प्रिफेक्चर
- (फ्रेंच) समिती
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |