सीन-सेंत-देनिस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सीन-सेंत-देनिस Seine-Saint-Denis |
||
| फ्रान्सचा विभाग | ||
|
||
सीन-सेंत-देनिसचे फ्रान्स देशामधील स्थान |
||
| देश | ||
| प्रदेश | इल-दा-फ्रान्स | |
| मुख्यालय | बॉबिन्यी | |
| क्षेत्रफळ | २३६ वर्ग कि.मी. | |
| लोकसंख्या | १५,१५,९८३ | |
| घनता | ६,४२६ प्रति वर्ग कि.मी. | |
सीन-सेंत-देनिस (फ्रेंच: Seine-Saint-Denis) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्या सीन नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या वायव्येस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे. स्ताद दा फ्रान्स हे फ्रान्समधील सर्वात मोठे स्टेडियम ह्याच विभागातील सेंट-डेनिस शहरात स्थित आहे. तसेच चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा काही भाग देखील ह्याच विभागात आहे.
सीन-सेंत-देनिसमधील बहुसंख्य जनता उत्तर आफ्रिका खंडातून स्थानांतरित झालेली असून इस्लाम हा येथील प्रमुख धर्म आहे.
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (फ्रेंच) प्रिफेक्चर
- (फ्रेंच) समिती
