अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो.

इतिहास[संपादन]

१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडेयांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७ १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.

दुसरे ग्रंथकार संमेलन १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. मे २१ १८८५ रविवार, दुपारी ४ वाजता पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉलमध्ये भरले होते. या नंतर जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन १९०५ च्या मे महिन्यात सातारा येथे भरले. लो.टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. २३ मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तान्त प्रसिद्ध झाला होता. साताऱ्याचा पाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे २७-२८ मे १९०६ शनिवार, रविवार यां दिवशी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.[१]

साहित्य संमेलनांचे अध्यक्ष[संपादन]

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ३६ साहित्य संमेलने घेतली असून महाबळेश्वर येथे होत असलेले साहित्य संमेलन, ते भरवत असलेले ३७ वे साहित्य संमेलन होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके,विजया राजाध्यक्ष या तीन लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच शंकरराव खरात आणि केशव मेश्राम हे दोन दलित लेखक आणि यू.म. पठाण हे मुसलमान लेखक अध्यक्ष झालेले आहेत.

राज्य मराठी विकास संस्थेचे निमंत्रित सदस्य[संपादन]

अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे भरणारे साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे भरणारे नाट्य संमेलन व मराठी विज्ञान परिषदेतर्फे भरणारे विज्ञान संमेलन या तिन्ही संमेलनाचे अध्यक्ष हे राज्य मराठी विकास संस्थेचे विशेष निमंत्रित सदस्य असतात

८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन[संपादन]

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा तर्फे भरवले जाणारे ८४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात २५, २६, २७ डिसेंबर २०१० या तारखांना झाले. .दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि गडकरी रंगायतन या नियोजित ठिकाणी संमेलनाचे कार्यक्रम झाले. मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे) ही या ८४ व्या साहित्य संमेलनाची यजमान संस्था होती व उत्तम कांबळे हे या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. [२]

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन[संपादन]

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी इ.स. २०१३ दरम्यान होणार झाले. हे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आयोजित केलेले होते. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले होते.

८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन[संपादन]

८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे ३ ते ५ जानेवारी इ.स. २०१४ दरम्यान झाले. हे आचार्य विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सासवडने आयोजित केलेले आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फ. मुं. शिंदे होते.

८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन[संपादन]

८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान (पंजाब) येथे ३ ते ५ एप्रिल इ.स. २०१५ दरम्यान होणार आहे. या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष - डॉ. सदानंद मोरे आहेत . या संमेलनाविषयी अधिक माहितीसाठी - http://www.sahityasammelanghuman.org/

मराठी साहित्य संमेलने[संपादन]

वर्ष - स्थान - अध्यक्ष 1878 - पुणे - महादेव गोविंद रानडे

1884 - 1879 - नाही

1885 - पुणे - कृष्ण शास्त्री राजवाडे

1904 - 1886 - नाही

1905 - सातारा - रघुनाथ पांडुरंग करंदीकर

1906 - पुणे - गोविंद वामन कानिटकर

1907 - पुणे - विष्णु मोरेश्वर महाजनी

1908 - पुणे - चिंतामणराव विनायक वैद्य

1909 - बडोदा - कान्होबा रणछोडदास किर्तीकर

1911 - 1910 - नाही

1912 - अकोला - हरी नारायण आपटे [3]

1914 - 1913 - नाही

1915 - मुंबई - गंगाधर पटवर्धन

1916 - नाही

1917 - इंदोर - गणेश जनार्दन आगाशे

1920 - 1918 - नाही

1921 - बडोदा - नृसिंह चिंतामणराव केळकर

1925 - 1922 - नाही

1926 - मुंबई - माधव विनायक किबे

1927 - पुणे - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

1928 - ग्वाल्हेर - माधव श्रीहरी Aney

1929 - बेळगांव - शिवराम महादेव परांजपे

1930 - मारगाव - वामन मल्हार जोशी

1931 - हैदराबाद - श्रीधर व्यंकटेश केतकर

1932 - कोल्हापुर - सयाजीराव गायकवाड

1933 - नागपुर - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

1934 - बडोदा - नारायण गोविंद चाफेकर

1935 - इंदोर - भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी

1936 - जळगांव - माधव त्र्यंबक पटवर्धन

1937 - नाही

1938 - मुंबई - विनायक दामोदर सावरकर [4]

1939 - अहमदनगर - दत्तो वामन पोतदार

1940 - रत्नागिरी - नारायण सीताराम फडके

1941 - सोलापूर - विष्णू सखाराम खांडेकर

1942 - नाशिक - प्रल्हाद केशव अत्रे

1943 - सांगली - श्रीपाद महादेव मते

1944 - धुळे - भार्गवराम विठ्ठल वारेरकर

1945 - नाही

1946 - बेळगाव - गजानन त्र्यंबक माडखोलकर

1947 - हैदराबाद - नरहर रघुनाथ फाटक

1948 - नाही

1949 - पुणे - शंकर दत्तात्रय जावडेकर

1950 - मुंबई - यशवंत दिनकर पेंढारकर

1951 - कारवार - अनंत काकबा प्रियोलकर

1952 - अमळनेर - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

1953 - अहमदाबाद - विठ्ठल दत्तात्रय घाटे

1954 - दिल्ली - लक्ष्मणशास्त्री बालाजी जोशी

1955 - पंढरपूर - शंकर दामोदर पेंडसे

1956 - नाही

1957 - औरंगाबाद - अनंत आत्माराम काणेकर

1958 - मालवण - आत्माराम रावजी देशपांडे

1959 - मिरज - श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

1960 - ठाणे - रामचंद्र श्रीपाद जोग

1961 - ग्वाल्हेर - कुसुमावती देशपांडे

1962 - सातारा - नरहर विष्णू गाडगीळ

1963 - नाही

1964 - मारगाव - विष्णू वामन शिरवाडकर

1965 - हैदराबाद - वामन लक्ष्मण कुलकर्णी

1966 - नाही

1967 - भोपाळ - विष्णू भिकाजी कोलते

1968 - नाही

1969 - [[वर्धा ]] - पुरुषोत्तम शिवराम रेगे

1972 - 1970 - नाही

1973 - यवतमाळ - गजानन दिगंबर माडगूळकर

1974 - इचलकरंजी - पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

1975 - कराड - दुर्गा भागवत

1976 - नाही

1977 - पुणे - पुरुषोत्तम भास्कर भावे

1978 - नाही

1979 - चंद्रपूर - वामन कृष्ण चोरघडे

1980 - बार्शी - गंगाधर बाळकृष्ण सरदार

1981 फेब्रुवारी - अकोला - गोपाळ नीळकंठ दांडेकर

1981 डिसेंबर - रायपूर - गंगाधर गोपाळ गाडगीळ

1983 - अंबेजोगाई - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

1984 - जळगांव - शंकर रामचंद्र खरात

1985 - नांदेड - शंकर बाबाजी पाटील

1986 - मुंबई - विश्राम बेडेकर

1987 - नाही

1988 - ठाणे - वसंत कानेटकर

1989 - अमरावती - केशव जगन्नाथ पुरोहित

1990 जानेवारी- पुणे - युसुफखान मोहम्मदखान पठाण

1990 डिसेंबर - रत्नागिरी - मधु मंगेश कर्णिक

1992 - कोल्हापुर - रमेश मंत्री

1993 - सातारा - विद्याधर गोखले

1994 - पणजी - राम बाळकृष्ण शेवाळकर

1995 - परभणी - नारायण गंगाराम सुर्वे

1996 - आळंदी - शांता शेळके

1997 - अहमदनगर - नागनाथ इनामदार

1998 - परळी वैजनाथ - दत्ताराम मारुती मिरासदार

1999 - मुंबई - वसंत बापट

2000 - बेळगांव - यशवंत दिनकर फडके

2001 - इंदोर - विजया राजाध्यक्ष

2002 - पुणे - राजेंद्र बनहट्टी

2003 - कराड - सुभाष भेंडे

2004 - औरंगाबाद - रोहीत जाधव

2005 - नाशिक - केशव तानाजी मेश्राम

2006 - सोलापूर - मारुती चितमपल्ली

2007 - नागपुर - अरुण साधू

2008 - सांगली - मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर

2009 - महाबळेश्वर - आनंद रतन यादव

2010 - पुणे - दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी

2011 - ठाणे - उत्तम कांबळे

2012 - चंद्रपूर - वसंत आबाजी डहाके [5]

2013 - चिपळूण - नागनाथ कोतापल्ले [6]

2014 - सासवड - एफ एम शिंदे [8]

2015 - घुमाण (पंजाब) [9]

संदर्भ[संपादन]

  1. http://www.masapaonline.org/node/1
  2. Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6076870.cms. It is a snapshot of the page as it appeared on 28 Aug 2010 23:49:10 GMT.

बाह्य दुवे[संपादन]

खालील ओळींत संदर्भाशिवाय असणारे दुवे येथून कालांतराने काढावेत.