अंबेजोगाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?अंबाजोगाई
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
गुणक: 18°26′N 76°14′E / 18.44, 76.23
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा बीड
नगराध्यक्ष
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४,३१,५१७
• +91(02446)
• MH 44

गुणक: 18°26′N 76°14′E / 18.44, 76.23 अंबेजोगाई किंवा अंबाजोगाई हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या गावाचे जुने नाव महंमदाबाद(की मोमिनाबाद?).

समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे. येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे.

स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे (जे रझाकारांविरुद्ध लढले) या प्रसिद्ध व्यक्तींचा या शहराशी संबंध आला आहे.

अंबेजोगाई मध्ये योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. शिवाय खोलेश्वर, मुकुंदराज आणि दासोपंत सारखी इतर मंदिर आहेत.

अंबाजोगाईला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बस स्थानक असून, महाराष्ट्र तसेच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी जोडले गेले आहे.

जवळील रेल्वे स्थानक परळी येथे आहे.

जवळील विमानतळ लातूर येथे असून आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]