डोंबिवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोंबिवली is located in मुंबई
डोंबिवली
डोंबिवली


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.

मुंबईपासून सुमारे ५० किमी. अंतरावर मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील हे एक स्थानक आहे. २००१ च्या जनगणनेनुसार डोंबिवलीची लोकसंख्या १२ लाख होती. कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश होतो. २००९ साली स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाल्यावर भाजपचे श्री. रविंद्र चव्हाण डोंबिवलीचे पहिले आमदार म्हणून निवडून आले.

इतिहास[संपादन]

१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवली चा उल्लेख आढळतो. हा शिलालेख तुर्भे बंदराजवळ माहुल या गावात आहे. डोंबिवली गेल्या ८ शतकांपासून अस्तित्वात आहे.पोर्तुगिज जेंव्हा डोंबिवली मध्ये आले तेंव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. १७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात शेतकरी भात पिकवित आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करीत. १९८३ साली महापालिका स्थापन झाली. १९९५ साली लोकप्रतिनिधी (नगरसेवक) राजवट सुरु झाली. डोंबिवलीचे पहिले आमदार म्हणून भाजपाचे श्री. रविंद्र चव्हाण यांची २००९ साली निवड झाली.

डोंबिवली खालील चार गावांनी वेढलेले होते-

  1. पश्चिम - चोळे गाव
  2. पूर्व - आयरे गाव
  3. दक्षिण - पाथर्ली गाव
  4. उत्तर - ठाकुर्ली पूर्व

प्रशासन[संपादन]

१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपलिका आणि नजीकची कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क. डो. म. पा.) स्थापन करण्यात आली.

लोकजीवन आणि संस्कृति[संपादन]

डोंबिवली प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते डोंबिवलीत अनेक "कार" आहेत. चित्रकार, संगीतकार, कलाकार, पत्रकार वगैरे वगैरे....तर अनिल अवचट म्हणतात डोंबिवलीकर ही एक बेडरूम कम्युनिटी आहे. कामानिमित्त दिवसभर मुंबईत असतात आणि रात्री झोपायला फक्त घरी येतात.

"नववर्ष स्वागत शोभा यात्रा" [१] हा सांस्कृतिक सोहळा उल्लेखनीय आहे. या उत्सवाची सुरुवात १९९० मध्ये झाली. ही शोभायत्रा हिन्दू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुडी पाडव्याला आयोजीत केली जाते. ठाणे, पुणे, नाशिक या शहरांणी देखील डोंबिवलीचे अनुकरण करुन शोभा यात्रा आयोजीत करणे सुरु केले आहे. दिवाळी, गणेशोत्सव, दांडिया रास, नाताळ हे सण देखील उत्साहात साजरे केले जातात.

डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार[संपादन]

डोंबिवलीचं सर्वात मोठं विशिष्ट म्हणजे वर्षभर सुरु असणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम. पण या कार्यक्रमांना खरं ग्लॅमर मिळवून दिलं ते डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने हे निर्विवाद. आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीत रोझ फेस्टिवल, बच्चे कंपनीकरिता किलबिल फेस्टिवल, आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार संध्या असे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केले.

अर्थव्यवस्था[संपादन]

डोंबिवलीच्या औद्योगिक भागात विविध कारखाने आहेत. यात तैलरंग, औद्योगिक आणि शेतीसाठी लागणारी रसायणे यांचा समावेश होतो. या भागात जड धातूची सामग्री बनवणारे कारखाने देखील आहेत. काही प्रमुख औद्योगिक संस्था जसे घरडा केमिकल, विको लॅब, लॉईड स्टील, दीपक फर्टीलायझर यांचे उत्पादन कारखाने या ठिकाणी आहेत. डोंबिवली, कोपर (यात दिवा-वसई मर्गावरील कोपर स्थानकाचा देखील समावेश आहे), ठाकुर्ली ही मध्य रेल्वेमधील एकूण तीन स्थानके डोंबिवली शहराच्या अख्यातरित आहेत.

वाहतूक[संपादन]

ट्रेन: डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील एक महत्वाचे स्थानक आहे. सकाळी आणि संध्याकळी स्थानकात भरपूर गर्दी असते.

बस: कल्याण-डोंबिवली महानगर परिवहनाची बस सुविधा डोंबिवली मध्ये उपलब्ध आहे. डोंबिवली राष्र्टीय महामार्गाने पनवेल आणि कल्याण या शहरांना जोडलेले आहे. एन. एम. एम. टी. ची डोंबिवली ते नवी मुंबई बस सुविधा आहे.

एन. एम. एम. टी. डोंबिवली बस सेवा

एन. एम. एम. टी. मार्ग क्रमांक. मार्ग
एन. एम. एम. टी. ४१ वाशी रेल्वे स्थानक ते डोंबिवली
एन. एम. एम. टी. ४२ वाशी रेल्वे स्थानक ते डोंबिवली
एन. एम. एम. टी. ४४ खारघर (वास्तु विहार) ते डोंबिवली

इतिहास[संपादन]

"डोंबिवली शहराचा इतिहास" दोन वेळा प्रसिद्द झाला आहे. १९५० आणि २००० साली. डोंबिवली शहराला त्याचे नाव तेथील मूळ निवासी "डोंबी" लोकांपासून मिळाले आहे.

शिक्षण[संपादन]

डोंबिवलीत स्थापन झालेले पहिले हायस्कूल म्हणजे स. वा. जोशी विद्यालय. पहिले महाविद्यालय के. वि. पेंढरकर. डोंबिवली मध्ये अनेक शिक्षणसंस्था आहेत. सरस्वती विद्यामंदीर, महात्मा गांधी विद्यामंदीर, स्वामी विवेकानंद विद्यामंदीर, अभिनव विद्यामंदीर, डॉन बॉस्को, सिस्टर निवेदिता या आणि इतर अनेक शाळा डोंबिवली मध्ये आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालय - जोंधळे.

डोंबिवली
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कोपर
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
ठाकुर्ली
स्थानक क्रमांक: २४ मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: ४८ कि.मी.ट्रेन-छोटी.png
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


संदर्भ[संपादन]