श्रीविजय साम्राज्य
Appearance
श्रीविजय साम्राज्य (भासा इंडोनेशिया: Sriwijaya ; भासा मलेशिया: Srivijaya ;) हे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील एक प्राचीन व बलशाली मलय साम्राज्य होते. अंदाजे सातव्या शतकापासून ते १३व्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेल्या ह्या हिंदू साम्राज्याचा इतिहासात संलग्न उल्लेख नाही. अस्तानंतर १९२० सालापर्यंत श्रीविजयबद्दल स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय इतिहासकारांना जवळजवळ काहीही माहिती नव्हती. १९२० साली एका फ्रेंच पंडिताने श्रीविजयच्या अस्तित्वाचे पुरावे शोधून काढले.
सुमारे दहाव्या शतकादरम्यान भरभराटीच्या शिखरावर असताना श्रीविजय साम्राज्याची सत्ता आग्नेय आशियाच्या सुमात्रा, मलाय द्वीपकल्प, बोर्नियो, जावा व सुलावेसी ह्या भागावर होती.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- मलायू ऑनलाइन - कराजान स्रीविजया (श्रीविजय साम्राज्याविषयीची माहिती) (भासा मलेशिया मजकूर)