जावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जावा

जावा बेटाचे स्थान आग्नेय आशिया
क्षेत्रफळ १,३२,१८७ वर्ग किमी
लोकसंख्या १३.६ कोटी
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया

जावा (इंडोनेशियन: Jawa) हे इंडोनेशिया देशाचे एक बेट आहे. जावा हे आकाराने जगातील १३व्या क्रमांकाचे व जगातील सर्वाधिक व सर्वात घनदाट लोकसंख्येचे बेट आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता ह्याच बेटावर वसलेली आहे व देशाच्या लोकसंख्येच्या ६० तक्के लोक जावा बेटावर राहतात. ऐतिहासिक काळात बलशाली हिंदू राज्ये नांदलेल्या आणि वसाहतयुगात महत्त्वाची डच वसाहत असलेले जावा आधुनिक इंडोनेशियाच्या अर्थकारणात व राजकारणात महत्त्वाचे स्थान राखून आहे.

मेरबाबु पर्वत ज्वालामुखी

पूर्वी ह्या बेटाचे नाव यव द्वीप होत आणि याचे संदर्भ भारताच्या बऱ्याच ग्रंथात आढळतात. येथे जवळजवळ २००० वर्ष हिंदू सभ्यत्येचे प्रभुत्व होते. आजही इथे भरपूर ठिकाणी हिंदू लोकवस्ती आढळते. खासकरून पूर्व जावा मध्ये मजापहित साम्राज्यचे वंशज टेंगर लोग रहतात जे आजही हिंदू आहेत.

सुमेरू पर्वत आणि ब्रोमो पर्वत पूर्व जावा मध्ये
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: