"मुक्ता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सपना शेरेकर (चर्चा | योगदान) खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ २२०: | ओळ २२०: | ||
|आम्ही दोघी |
|आम्ही दोघी |
||
|मराठी |
|मराठी |
||
|प्रमुख भूमिका - अम्मी |
|||
|घोषित |
|||
|- |
|- |
||
|मुंबई पुणे मुंबई ३ |
|मुंबई पुणे मुंबई ३ |
||
|मराठी |
|मराठी |
||
|घोषित |
|घोषित |
||
|- |
|||
| rowspan="2" | २०१९ |
|||
| बंदिशाळा |
|||
| मराठी |
|||
| प्रमुख भूमिका- जेलर माधवी सावंत |
|||
|} |
|} |
||
१६:५१, १६ जून २०१९ ची आवृत्ती
मुक्ता बर्वे | |
---|---|
मुक्ता बर्वे | |
जन्म |
मुक्ता वसंत बर्वे १७ मे, १९८१ पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय, निर्मिती |
कारकीर्दीचा काळ | २००० पासून |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | देहभान, फायनल ड्रॅफ्ट, कबड्डी कबड्डी, छापा काटा, कोडमंत्र |
प्रमुख चित्रपट | जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई भाग १ आणि २, डबलसीट |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | एका लग्नाची दुसरी गोष्ट |
वडील | वसंत बर्वे |
आई | विजया बर्वे |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.muktabarve.com |
मुक्ता बर्वे (जन्म: १७ मे १९८१) मुक्ता बर्वे या मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. अभ्यासू, स्वतंत्र विचारांची आणि मेहनती अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात.
त्या मूळच्या पुण्याजवळील चिंचवड गावच्या आहेत. वडील वसंत बर्वे आणि आई शिक्षिका व नाट्यलेखिका विजया बर्वे. रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. मुक्ताने अवघी चार वर्षाची असताना आईच्या ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात भूमिका केली. मुक्ता बर्वे प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतात. इ.स. २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. तिने पुणे विद्यापीठातून (ललित कला केंद्र) नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.
अनेक गाजलेल्या नाटक, मालिका आणि चित्रपटातून मुक्ताने आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडवले आहे. यासाठी अनेक पुरस्कारांनी तिला गौरविण्यात आले आहे. जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले.[१] २०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती.
आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणार्या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.
शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी
पुण्याजवळच्या चिंचवड येथे मुक्ताचा १९८१ साली जन्म झाला. वडील श्री वसंत बर्वे टेल्को कंपनीत नोकरी करत होते. आई विजया बर्वे या शिक्षिका तसेच नाट्यलेखिका होत्या [२]. मोठा भाऊ देबू बर्वे कमर्शियल आर्टिस्ट आहे तसेच त्याने लहानपणी काही चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. मुक्तावर कलेचे संस्कार लहानपणापासून घरातूनच होत होते. मूळचा लाजाळू आणि बुजरा स्वभाव कमी व्हावा यासाठी मुक्ताच्या आई विजया बर्वे यांनी "रुसू नका फुगू नका" हे बालनाट्य लिहिले, यात भित्रा ससा आणि परी राणी अश्या दुहेरी भूमिका मुक्ताने साकारल्या. अश्या पद्धतीने वयाच्या चौथ्या वर्षी मुक्ताचे रंगभूमीवर पदार्पण झाले. दहावीच्या परीक्षेनंतर "घर तिघांचे हवे" या रत्नाकर मतकरी लिखित नाटकात मुक्ताने भूमिका साकारली. या नंतर नाटकाविषयी ओढ निर्माण झाल्याने त्यात करियर करायचे ठरविले. इयत्ता ११ आणि १२ वी चे शिक्षण सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे येथे घेतले. यानंतर ललित कला केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नाट्य शास्त्र विषयात पदवी घेतली [३]. नाट्यशास्त्रातील पदवी प्राप्त केल्यावर लगेच मुक्ता मुंबईत आल्या. २००० सालापासून त्या मुंबईत वास्तव्यास आहेत [४].
अभिनयातील कारकीर्द
१९९९ ते २००७ : नाटक, मालिका आणि चित्रपटात पदार्पण
इ. १० वी च्या परीक्षेनंतर, टेल्को कंपनीसाठी स्पर्धेसाठी बसवलेल्या, रत्नाकर मतकरी लिखित "घर तिघांचे हवे" या नाटकातून मुक्ताने भूमिका साकारली. १९९८ साली "घडलंय बिघडलंय" या मालिकेतून मुक्ताने टेलिव्हिजन वरील पदार्पण केले. खेडवळ अश्या चंपाची भूमिका तिने साकारली. ती रसिकांना खूप आवडली. त्यानंतर पिंपळपान (१९९८), बंधन (१९९८), बुवा आला (१९९९), चित्त चोर (१९९९), मी एक बंडू (१९९९), आभाळमाया (१९९९), श्रीयुत गंगाधर टिपरे (२००१) आणि इंद्रधनुष्य (२००३) या मालिकांमधून मुक्ताने छोट्या भूमिका साकारल्या [५]. २००१ मध्ये सुयोगच्या "आम्हाला वेगळे व्हायचंय" या नाटकातून तिला व्यावसायिक नाटकात काम करण्याची पहिली संधी चालून आली.
२००४ साली, "चकवा" या चित्रपटातून मुक्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. चकवा चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री पुरस्कार मिळाला. २००५ मध्ये अमोल पालेकरांच्या "थांग" या मराठी आणि इंग्रजी द्वैभाषिक सिनेमात मुक्ताची छोटी भूमिका होती. याच वर्षी "देहभान" आणि "फायनल ड्राफ्ट" या दोन व्यावसायिक नाटकांमधून मुक्ताने काम केले [६]. "फायनल ड्राफ्ट" मधील विद्यार्थिनीच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. २००५ साली, देहभान साठी उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री चा अल्फा गौरव चा पुरस्कार मुक्ताला मिळाला. प्रायोगिक नाटकासाठीचा उत्कृष्ट अभिनेत्री चा अल्फा गौरव २००५ चा पुरस्कार मुक्ता बर्वे यांना 'फायनल ड्राफ्ट' साठी मिळाला. २००६चा महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार आणि २००८चा झी गौरव पुरस्कार यांनी मुक्ताला सन्मानित केले गेले.[७].
यापुढे शेवरी (२००६), ब्लाइंड गेम (२००६) आणि मातीमाय (२००६) या चित्रपटातून मुक्ताने छोट्या भूमिका साकारल्या. त्याच वर्षी टेलिव्हिजनवरील अग्निशिखा या मालिकेतून मध्यवर्ती भूमिका साकारली. २००६ साली "हम तो तेरे आशिक है" या व्यावसायिक नाटकात रुकसाना साहिल या मुस्लिम मुलीची प्रमुख भूमिका साकारली. या नाटकात रुकसाना, अनिल प्रधान (जितेंद्र जोशी) या हिंदू मुलाच्या प्रेमात पडते आणि ते लग्न करतात अशी कथा आहे. नाटकातील मुक्ताच्या या भूमिकेचे भरभरून कौतुक झाले. या साठी महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने मुक्ताला सन्मानित करण्यात आले. २००७ साली सावर रे या चित्रपटात मुक्ता याच नावाने भूमिका साकारली. पुढे जितेंद्र पाटील यांच्या "कबड्डी कबड्डी" या व्यावसायिक नाटकात कबड्डीपटूची भूमिका साकारली. या नाटकात एका कबड्डीपटूची खेळाविषयीची महत्त्वाकांक्षा आणि तिच्या वडिलांचा तिला अमेरिकेला स्थायिक होण्याचा आग्रह यातील संघर्ष समर्थपणे दाखविला आहे. मुक्ताची कबड्डीपटूची भूमिका आणि विनय आपटेंनी साकारलेली तिच्या वडिलांची भूमिका समीक्षकांना आणि रसिकांना खूप आवडली. या भूमिकेसाठी मुक्ताला २००७ सालच्या राज्य सरकारच्या तसेच महाराष्ट्र टाइम्स पुरस्काराने आणि २००८ साली झी गौरव सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री या पुरस्काराने गौरविले [७].
२००८ ते २०११: जोगवा आणि मुंबई- पुणे- मुंबईचे यश
२००८ साली "दे धक्का" या मराठी आणि "सास बहू और सेन्सेक्स" या हिंदी चित्रपटातून मुक्ताने छोट्या भूमिका साकारल्या. २००९ साली "एक डाव धोबीपछाड" आणि "सुंबरान" या मराठी चित्रपटातून साहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या. पण राजीव पाटील दिग्दर्शित, २००९ सालच्या "जोगवा" या चित्रपटाने मुक्ताला चित्रपटातील घवघवीत यश मिळवून दिले [८] तायप्पा (उपेंद्र लिमये) आणि सुली (मुक्ता बर्वे) यांच्या प्रेमकथेने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जोगते आणि जोगतिणींच्या दुःखद जीवनावर प्रकाश टाकणार्या या चित्रपटाने २००८ सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली. मुक्ताने साकारलेली सुलीची भूमिका तिच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणून मानली जाते [९]. या चित्रपटासाठी फोटो, लेख आणि प्रत्यक्ष जोगतिणींच्या आयुष्याचे जवळून निरीक्षण करून मुक्ताने या भूमिकेचा अभ्यास केला. अत्यंत बोलक्या डोळ्यांचे वरदान लाभलेल्या मुक्ताने अनेक प्रसंगांमध्ये केवळ डोळ्यांच्या भाषेतून प्रेम, दुःख, संघर्ष या भावना अत्यंत सशक्तपणे चितारल्या आहेत. या भूमिकेसाठी मुक्ताला २००९ सालच्या राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री च्या पुरस्काराने गौरविले गेले. २००९ सालच्या संगीत नाटक अकादमी च्या "उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने" मुक्ताला गौरविण्यात आले [१०]. २०१० साली थँक्स मा या हिंदी चित्रपटात लक्ष्मी नावाच्या वेश्येची भूमिका साकारली.
"जोगवा" नंतर २०१० साली प्रदर्शित झालेल्या सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटाने पुन्हा एकदा मुक्ताला घवघवीत यश मिळवून दिले. या चित्रपटातून मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांची सुपरहिट जोडी मराठी चित्रपट सृष्टीला लाभली.[११]मुंबई ची मुलगी लग्नासाठी मुलाला पाहायला पुण्याला येते आणि एका दिवसाच्या त्यांच्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी या चित्रपटाची कथा रसिकांना खूपच भावली. मुक्ता आणि स्वप्निलच्या अत्यंत सहज अभिनयाने आणि दोन्ही शहरांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे अचूक चित्रण केल्याने हा चित्रपट व्यावसायिक पातळीवर खूप यशस्वी ठरला. मुक्ता आणि स्वप्निल ची जोडी रसिकांना इतकी आवडली कि त्याची तुलना शाहरुख आणि काजोलच्या जोडीशी केली जाते.[१२]
शहरी मुलीची भूमिका असो किंवा खेडवळ बाजाची व्यक्तिरेखा असो, मुक्ता जेव्हा अभिनयास उभी राहते तेव्हा ते पात्र जिवंत करते असा रसिकांचा अनुभव आहे. २०१० साली आलेल्या टेलिव्हिजन वरील "अग्निहोत्र" मालिकेतली "मंजुळा श्रीपाद अग्निहोत्री" ही भूमिकासुद्धा मुक्ताने अशीच समर्थ पणे रेखाटली.[१३].२०१० साली, विक्रम गोखले दिग्दर्शित "आघात" या चित्रपटातील डॉ. स्मिता देशमुख ही भूमिकासुद्धा लक्षवेधी ठरली. यासाठी मुक्ताला Pune International Film Festival Awards (2011) मध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री चा पुरस्कार मिळाला. राजा परांजपे फिल्म फेस्टिवल २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल तरुणाई सन्मानाने मुक्ताला गौरविण्यात आले.[१४][१५]
२०१२ ते २०१४ : एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि इतर नाटक व चित्रपट
२०१२ साली झी मराठी वरील, सतीश राजवाडे दिग्दर्शित "एका लग्नाची दुसरी गोष्ट" या मालिकेतून पुन्हा एकदा मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांची जोडी रसिकांच्या भेटीला आली.[१६] एका जाहिरात कंपनीत काम करणारी राधा महेश देसाई (मुक्ता बर्वे) आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला घनःश्याम काळे (स्वप्निल जोशी) घरच्यांच्या दबावाला कंटाळून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात आणि शेवटी खरोखरीच एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी या मालिकेची कथा रसिकांना वर्षभर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली.[१७][१८]मुक्ताने साकारलेले राधाचे पात्र आणि दोघांची प्रेमकहाणी रसिकांनी अक्षरशः उचलुन धरली.[१९] केवळ हाय TRP नाही तर झी मराठी च्या इतिहासातील सुवर्णपान या शब्दात या मालिकेचा गौरव केला गेला. माकडाच्या हाती शॅम्पेन या नाटकाचे २०१२ साली "बदाम राणी गुलाम चोर" या चित्रपटात रूपांतर केले. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ताने उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे यांच्या बरोबर काम केले. यातील मुक्ताने साकारलेले पेन्सिल नावाचे पात्र खूप आवडले. टाइम्स ऑफ इंडिया ने मुक्ताच्या अभिनयाचा "Mukta Barve (Pencil) have done a fantastic job. Mukta has shown 'Pencil's' bold attitude flawlessly ( मुक्ताने पेन्सिल चे पात्र चोखपणे वठविले आहे )" या शब्दात गौरव केला.[२०]
२०१३ साली, मुक्ता ने गिरीश जोशी यांच्या बरोबर टोरांटो मध्ये प्रसिद्ध अश्या फायनल ड्रॅफ्ट या नाटकाचा प्रयोग सादर केला.[२१] २०१३ साल मुक्तासाठी अत्यंत महत्वाचे आणि यशस्वी वर्ष होते. या वर्षी आपल्या "रसिका प्रॉडक्शन्स" ( रसिका जोशी या प्रसिद्ध अभिनेत्री मैत्रिणीस स्मरणात ठेवून ) या कंपनी द्वारे मुक्ताने नाट्य निर्मितीत प्रवेश केला.[२२][२३] इरावती कर्णिक लिखित आणि समीर विद्वंस दिग्दर्शित "छापा काटा" या नव्या नाटकात मुक्ताने मैत्रेयी भागवत या आजच्या काळातील मुलीचे तिच्या आईशी असलेले नातेसंबंध दाखवणारे पात्र साकारले.[२४]यात काही प्रयोगांसाठी मैत्रयी भागवत च्या आईची भूमिका रीमा लागू आणि नंतर नीना कुलकर्णी यांनी साकारली.[२५] एक अशी मुलगी जिला चांगले जगण्याची आस आहे आणि ती ते नाकारत नाही, त्यासाठी ती धडपडते आहे आणि एक अशी आई जिला एकटेपणाची भीती आहे, मुलीची काळजी आहे आणि प्रेमापोटी तिला बांधुन ठेवण्यासाठी आटपिटा करते आहे, अश्या आई मुलीच्या नात्याची गोष्ट अत्यंत समर्थपणे दाखवणारे नाटक रसिकांना खूप आवडले. या नाटकासाठी मुक्ता बर्वे आणि सहनिर्माते श्री. दिनेश पेडणेकर यांना दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (२०१४) चा सर्वोत्कृष्ठ नाटकाचा पुरस्कार मा. लता मंगेशकर यांच्या हस्ते मिळाला.[२६][२७] २०१४ मध्ये मुक्ताने कवितांवर आधारित "रंग नवा" या कार्यक्रमाची निर्मिती केली. या मध्ये संगीतकार मिलिंद जोशी यांच्या बरोबर "ज्ञात कवींच्या अज्ञात कविता" या विषयावरील आणि स्वतः लिहिलेल्या काही कविता सादर केल्या.[२८]
२०१३ साली अजय नाईक यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणातील "लग्न पहावे करून" या चित्रपटात उमेश कामत बरोबर प्रेमकथा साकारली.[२९] वधुवर सूचक मंडळ स्थापन केलेल्या अदिती टिळक या मुलीची भूमिका मुक्ताने अत्यंत समर्पकरीत्या साकारली. Indian Nerve ने तिच्या कामाचे कौतुक पुढील शब्दात केले आहे. "Performance wise, Mukta as a strong and determined Aditi who is scared of failing is the best character of them all. She pulled off the role very aptly."[३०] २०१३ मध्ये रेणू देसाई निर्मित "मंगलाष्टक वन्स मोअर" या चित्रपटातून मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांची जोडी पाहायला मिळाली.[३१] लग्नानंतर नवऱ्याच्या भोवती आयुष्य विणून स्वतःला विसरलेली आरती पाठक या अत्यंत भाबड्या आणि हळव्या मुलीचे चित्रण मुक्ताने अतिशय उत्तमरीत्या साकारले. The Times Of India ने तिच्या अभिनयाचे वर्णन पुढील शब्दात केले "Mukta too excels with her comic timing and dialogue delivery".[३२]
२०१४ साली रत्नाकर मतकरी लिखित "शॉट" या कथेवरुन चित्रित केलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये मुक्ताने श्रुती हे पात्र साकारले. मुक्ता बर्वे आणि सुप्रिया मतकरी यांच्या भूमिका असलेली ही शॉर्ट फिल्म अनेक चित्रपट महोत्सवांतून दाखवली गेली.
२०१५-१६ : ‘डबलसीट’चे यश आणि पुढील प्रवास
२०१५ साली मुक्ताचे अत्यंत महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले. यातील समीर विद्वंस दिग्दर्शित "डबलसीट" या चित्रपटात तिने अंकुश चौधरी बरोबर प्रथमच चित्रपटात काम केले.[३३] रोहा सारख्या कोकणातील गावातून अमित नाईकशी (अंकुश चौधरी) लग्न झाल्यावर मुंबईत आलेल्या मंजिरीचे पात्र मुक्ताने रेखाटले.[३४][३५]मध्यम वर्गीय नवर्याबरोबर चांगले आयुष्य जगण्याची आस असलेली, स्वप्ने पहायला न डगमगणारी आणि त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करायला तयार असलेली मंजिरी मुक्ताने जिवंत केली. टाइम्स ऑफ इंडियाने मुक्ताचे या शब्दांत कौतुक केले "Mukta, who too makes a return after two years, is brilliant as ever as the strong-willed, caring and accommodative wife".[३६] मंजिरीच्या डोळ्यातला आशावाद, आत्मविश्वास आणि निरागसता मुक्ताने रसिकांच्या मनात आपल्या अभिनयातून पोहोचवला. आपण सहज आणि नैसर्गिक अभिनयाच्या साम्राज्ञी आहोत हे या चित्रपटातून मुक्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले. तिच्या ‘डबलसीट’च्या कामासाठी तिला २०१५ आणि २०१६ सालात अनेकोत्तम पुरस्कार मिळाले. संस्कृती कलादर्पण २०१६मध्ये तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीसाठीचे नामांकन होते [३७] तर महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१५, झी चित्र गौरव २०१६, महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री २०१६[३८], मराठी फिल्मफेअर २०१६ [३९] या पुरस्कारांनी गौरविले गेले.[४०][४१]
२०१५ मध्येच, अमित त्रिवेदी च्या "हायवे- एक सेल्फी आरपार" या चित्रपटात इतर अनेक दिग्गज कलाकारांबरोबर (रेणुका शहाणे, टिस्का चोप्रा, गिरीश कुलकर्णी, विद्याधर जोशी) मुक्ताने काम केले. तमासगीर तरुणी ची भूमिका मुक्ताने अत्यंत सहजपणे साकारली.[४२][४३] नोव्हेंबर २०१५ मध्ये बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित अशा ‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या भाग दोनमध्ये मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी ही जोडी पुन्हा एकदा रसिकांना पाहायला मिळाली.[४४][४५] पहिल्या भागातील तिची (मुंबई म्हणजे गौरी देशपांडे) आणि स्वप्निल ची ( पुणे म्हणजे गौतम देशपांडे) प्रेमकथा पुढे सरकलेली पाहायला मिळाली. काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीतली आणि लग्नाला होकार देण्यासाठी चाचरत असलेल्या गौरीची मुक्ताने साकारलेली भूमिका समीक्षकांना आणि रसिकांना खूप आवडली.[४६] बॉक्स ऑफिसवरदेखील या चित्रपटाने यशस्वी कमाई केली.मुंबई- पुणे- मुंबई २ मधल्या कामासाठी मुक्ताला मराठी फिल्मफेअर २०१६ पुरस्काराचे सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचे नामांकन मुक्ताला होते.[४७]
२०१६ मध्ये, अतुल जगदाळे दिग्दर्शित "गणवेश" या चित्रपटात किशोर कदम, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, गुरु ठाकूर यांच्या बरोबर काम केले. [४५] खाकी वर्दीमधल्या कर्तव्यकठोर पण मनातून माणूसपण न हरवलेल्या मीरा पाटील या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका मुक्ताने केली. टाइम्स ऑफ इंडिया ने तिच्या ‘गणवेश’मधील कामाबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले "Barve (who is an absolute pleasure to watch) delivers her usual balanced performance.[४८]
ऑगस्ट २०१६ मध्ये मुक्ताने समीर विद्वंस दिग्दर्शित YZ या चित्रपटात सायली ही छोटी भूमिका साकारली.[४९] या चित्रपटात तिच्याबरोबर सागर देशमुख, अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. भूमिकेची लांबी किती आहे हे महत्वाचे नसून तेवढ्या छोट्या भूमिकेत सुद्धा पात्र किती समर्थपणे साकार करता येते याचा प्रत्यय मुक्ताच्या अभिनयातून नेहमीच मिळतो. टाइम्स ऑफ इंडिया तिच्या YZ मधील भूमिकेविषयी " In a small role too, Mukta drives the point home with her expressions." असे वर्णन केले.[५०]
२०१७: हृदयांतर: एक महत्वाचा टप्पा
२०१७ मध्ये, मुक्ता, सुबोध भावे बरोबर "हृदयांतर" या चित्रपटातून समायरा जोशी या मुख्य भूमिकेत झळकतील.[५१] फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणातल्या या चित्रपटाच्या मुहूर्ताचा शॉट शाहरुख खान च्या हस्ते झाला.[५२] हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लाँच हृतिक रोशन च्या हस्ते झाला.[५३] ऑगस्ट २०१७ पासून झी युवा वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या रुद्रम मालिकेत मुक्ताची प्रमुख भूमिका आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिशोध घेणाऱ्या रागिणी देसाई ची भूमिका मुक्ता करते आहे. या मालिकेत तिच्याबरोबर या मालिकेत मोहन आगाशे, वंदना गुप्ते, सतीश राजवाडे, संदीप पाठक, किरण करमरकर इ. दिग्गज कलाकार काम करत आहेत. भय आणि रहस्यमय कथानक असलेली हि मालिका प्रेक्षकांना खूप आवडली.
नाट्यनिर्मिती, इतर भूमिका, कार्य आणि पुरस्कार
नाटक, सिनेमा आणि मालिकांबरोबर मुक्ताचे अन्य कार्यसुद्धा महत्त्वाचे आहे. २०१० मध्ये मुक्ताने "आम्ही मराठी पोरं हुशार" या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर २०१२च्या झी मराठी गौरव पुरस्काराचे सूत्रसंचालन स्वप्निल जोशीं बरोबर केले.[५४] २०१२ मध्ये सुयोग ग्रुपची मुक्ता स्वप्निलबरोबर ब्रँड अँबेसिडर होती.[५५] ७ डिसेंबर २०१४ मध्ये विनय आपटेंच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मुक्ताने लोकसत्तामध्ये विनय आपटेंच्या काही आठवणी लिहिल्या.[५६]तसेच विनय एक वादळ या कार्यक्रमात कबड्डी कबड्डी या नाटकातील तिचा विनय आपटेंबरोबरचा प्रवेश सादर केला.[५७] ९X झकास हिरोईन सीझन २ मध्ये मुक्ताने स्पर्धेचे परीक्षकपद भूषविले.[५८]
मुक्ताचे प्राणिप्रेमदेखील सर्वश्रुत आहे. २०१५ मध्ये इतर कलाकारांबरोबर मुक्ताने अॅनिमल्स मॅटर या NGO च्या "पक्षी वाचवा" उपक्रमात भाग घेतला.[५९] आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लोकसत्ता वृत्तपत्राने भरवलेल्या "कर्ती करविती" या दोन दिवसाच्या चर्चासत्राचे उदघाटन करण्याचा मान मुक्ता बर्वे यांना मिळाला.[६०] उदघाटनाच्या भाषणातील मुक्ताने प्रकट केलेले विचार तिच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात.[६१][६२]
२०१६ मध्ये लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द इयर (मराठी थिएटर मधील मुक्ताच्या कार्यासाठी) आणि जुलै २०१६ मध्ये निळू फुले चतुरस्र अभिनेत्री पुरस्काराने मुक्ताला गौरविले गेले.[६३] महाराष्ट्र वन चॅनेलच्या महिलादिन विशेष "सावित्री सन्मान २०१६" सोहळ्यात मुक्ताला तिच्या सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कराने गौरविले गेले.[६४] मुक्ताचा सन्मान करताना श्री. वामन केंद्रे यांनी "Mukta is most talented girl around us. मुक्ता महाराष्ट्राला, भक्ती बर्वेनंतर पडलेलं स्वप्न आहे" या शब्दात गौरविले.[६४] नोव्हेंबर २०१६ मध्ये पुलोत्सव २०१६ तर्फे मुक्ताचा तरुणाई सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.[६५]
मुक्ताने व्यावसायिक रंगभूमीवर मोजक्या नाटकांत कामे करून रंगभूमीवरील आपले अस्तित्व कायम ठेवले. २०१५ आणि १६ मध्ये तिने काही नाटकांची निर्मिती केली. २०१५ साली संस्पेंस थ्रिलर प्रकारातील लव्हबर्ड्स मध्ये काहीशी नकारात्मक छटा असलेली देविका तिने साकारली.[६६] २०१५ मध्ये रत्नाकर मतकरी लिखित "इंदिरा" या नाटकाची निर्मिती केली. २०१६ मध्ये, भारतीय सैन्याच्या पार्श्वभूमीवरचे "कोडमंत्र" हे नाटक मुक्ताने रंगभूमीवर आणले. या नाटकातील सैनिकी कायदातज्ज्ञ अहिल्या देशमुखचे पात्र मुक्ताने साकारले.[६७] त्याचे प्रयोग सुरू असतानाच या नाटकावर आधारित एका पुस्तकाची निर्मिती करावी, असा विचार तिच्या मनात आला व तिने ‘कोडमंत्र’ या नावानेच एक पुस्तक तयार केले. नुकत्याच झालेल्या नाटकाच्या दीडशेव्या प्रयोगाला त्याचे प्रकाशन करण्यात आले. सैनिकांच्या आयुष्यावरील ‘कोडमंत्र’ या नाटकाच्या टीमने या नाटकावर आधारलेल्या पुस्तकाच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम सैनिक कल्याण निधीला देण्यात येत आहेत. सुरुवातीला मुक्ता बर्वे अणि तिच्या टीमने ५१००० रुपये महाराष्ट्र राज्याच्या सैनिक कल्याण निधीसाठी दिले आहेत. ’कोडमंत्र’च्या सुरुवातीला एक हजार प्रती छापण्यात आल्या. काही महिन्यांतच त्याची पहिली आवृत्ती संपली. ‘अ फ्यू गुड मेन’ या इंग्रजी नाटकावर कोडमंत्र नाटक आधारलेले असून त्यामध्ये सैनिकांची निष्ठा, त्यांची शौर्यगाथा, त्यांचे जगणे, शिस्त अशा अनेक पैलूंचा मागोवा घेण्यात आला आहे.
मराठी रंगभूमीवर नवनवीन नाट्य प्रयोग करून पाहायला मुक्ता बर्वे नेहमीच उत्सुक असतात. मुक्ताने ऑक्टोबर २०१६ मध्ये नसिम सोलेमानपूर (इराणी लेखक) लिखित आणि सिद्धेश पूरकर अनुवादित (मराठी अनुवाद) "व्हाईट रॅबिट रेड रॅबिट" या नाटकाचा पुण्यात भरत नाट्य मंदिर येथे प्रयोग सादर केला. जगभरातील अनेक भाषांमधील अनुवादित आणि सादर केलेल्या या नाटकाचे वैशिष्ठय त्याच्या उत्स्फुर्त सादरीकरणात होते. दिग्दर्शक नाही आणि संहितेचे सादरीकारणापूर्वी वाचन नाही, कलाकाराला थेट रंगमंचावर संहिता हातात मिळते, नाटकाचा एका कलाकाराला एकच प्रयोग सादर करता येतो असे या नाटकाचे स्वरूप होते. रंगमंचावर कलाकाराने संहिता वाचत वाचत कलाकार आणि प्रेक्षकांनी नाटकाचा सह-अनुभव घ्यायचा अश्या कलाकारासाठी धाडसी आणि प्रेक्षकांसाठी नवख्या वाटाव्या अश्या प्रयोगाचे चॅलेंज मुक्ताने अगदी सहजी पेलले.[६८][६९]
ऑक्टोबर २०१६ मध्ये रसिका-अनामिका प्रॉडक्शन्स बरोबर मुक्ताने 'दीपस्तंभ' नाटक रंगभूमीवर आणले.[७०] फेब्रुवारी २०१७ मध्ये ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांबरोबर, मुक्ता बर्वे यांनी, 'सखाराम बाईंडर' या विजय तेंडुलकर लिखित सुप्रसिद्ध नाटकाचे विशेष पाच प्रयोग रंगभूमीवर सादर केले.[७१] नाटकातील सर्व कलाकारांनी या प्रयोगांचे मानधन न घेता, या प्रयोगांमधून जमणारा निधी बॅकस्टेज कलाकार मदत निधी म्हणून दिला.[७२]
कारकीर्द
चित्रपट
मुक्ता बर्वेची भूमिका असलेले चित्रपट :
वर्ष | शीर्षक | भाषा | भूमिका |
---|---|---|---|
२००४ | चकवा | मराठी | सिस्टर छाया |
२००५ | थांग | मराठी/इंग्लिश | पाहुणी कलाकार |
२००६ | शेवरी | मराठी | पाहुणी कलाकार |
ब्लाइंड गेम | मराठी | साहाय्यक अभिनेत्री | |
माती माय | मराठी | साहाय्यक अभिनेत्री -यशोदा | |
२००७ | सावर रे | मराठी | साहाय्यक अभिनेत्री- मुक्ता |
२००८ | दे धक्का | मराठी | पाहुणी कलाकार |
सास बहू और सेन्सेक्स | हिंदी | परिमल | |
२००९ | एक डाव धोबीपछाड | मराठी | सुलक्षणा |
जोगवा | मराठी | प्रमुख भूमिका- सुली | |
सुंबरान | मराठी | साहाय्यक अभिनेत्री- कल्याणी | |
२०१० | आघात | मराठी | प्रमुख भूमिका- डॉक्टर |
ऐका दाजीबा | मराठी | साहाय्यक अभिनेत्री | |
थँक्स माँ | हिंदी | वेश्या | |
मुंबई-पुणे-मुंबई | मराठी | प्रमुख भूमिका- मुंबई | |
२०१२ | बदाम राणी गुलाम चोर | मराठी | प्रमुख भूमिका- पेन्सिल |
गोळाबेरीज | मराठी | साहाय्यक अभिनेत्री- नंदिनी चौबळ | |
२०१३ | मंगलाष्टक वन्स मोअर | मराठी | प्रमुख भूमिका- आरती |
लग्न पहावे करून | मराठी | प्रमुख भूमिका- आदिती टिळक | |
२०१४ | गुणाजी | कोकणी | प्रमुख भूमिका- धनगर स्त्री |
शॉट | मराठी | शॉर्ट फिल्म - श्रुती | |
२०१५ | डबलसीट | मराठी | प्रमुख भूमिका- मंजिरी नाईक |
मुंबई-पुणे-मुंबई २ | मराठी | प्रमुख भूमिका- गौरी देशपांडे | |
हायवे- एक सेल्फी आरपार | मराठी | साहाय्यक अभिनेत्री | |
२०१६ | गणवेश | मराठी | प्रमुख भूमिका - इन्स्पेक्टर मीरा पाटील |
वाय.झेड | मराठी | साहाय्यक अभिनेत्री- सायली | |
२०१७ | हृदयांतर | मराठी | प्रमुख भूमिका - समायरा जोशी |
२०१८ | आम्ही दोघी | मराठी | प्रमुख भूमिका - अम्मी |
मुंबई पुणे मुंबई ३ | मराठी | घोषित | |
२०१९ | बंदिशाळा | मराठी | प्रमुख भूमिका- जेलर माधवी सावंत |
दूरचित्रवाणी
मुक्ता बर्वे यांचे दूरचित्रवाणीवर प्रदर्शित झालेले कार्यक्रम :
वर्ष (इ.स.) | कार्यक्रमाचे नाव | भूमिकेचे नाव | टिप्पणी |
---|---|---|---|
१९९८ | घडलंय बिघडलंय | चंपा | Debut Show |
पिंपळपान | सहायक भूमिका | ||
बंधन | सहायक भूमिका | ||
१९९९ | बुवा आले | सहायक भूमिका | |
चित्तचोर | सहायक भूमिका | ||
मी एक बंडू | सहायक भूमिका | ||
आभाळमाया | वर्षा निमकर | सहायक भूमिका | |
२००१ | श्रीयुत गंगाधर टिपरे | योगिता | सहायक भूमिका |
२००३ | इंद्रधनुष | सहायक भूमिका | |
२००६ | अग्निशिखा | कलिका | मुख्य भूमिका |
२०१०-११ | अग्निहोत्र | मंजुळा श्रीपाद अग्निहोत्री | मुख्य भूमिका |
२०१० | आम्ही मराठी पोरं हुशार | सूत्रसंचालिका | Game show |
२०११ | लज्जा | ऍड. मीरा पटवर्धन | Supporting role |
मधु इथे चंद्र तिथे | गौरी | Episodic role | |
२०१२ | एका लग्नाची दुसरी गोष्ट | राधा देसाई-काळे | मुख्य भूमिका |
२०१४ | विनय एक वादळ | TV special episode | |
२०१५ | झकास हिरोईन (सिझन २) | परिक्षक | Reality show |
२०१७ | रुद्रम | रागिणी | Thriller show-Lead role |
नाटके
वर्ष (इ.स.) | नाटकाचे नाव | भूमिकेचे नाव | नाटकाची भाषा |
---|---|---|---|
१९९६ | घर तिघांचे हवे | पदार्पणातील नाटक | मराठी |
२००१ | आम्हांला वेगळे व्हायचंय (नाटक) | साहाय्यक अभिनेत्री | मराठी |
२००५ | देहभान (नाटक) | साहाय्यक अभिनेत्री | मराठी |
फायनल ड्राफ्ट (नाटक) | प्रमुख भूमिका -विद्यार्थिनी | मराठी | |
२००६ | हम तो तेरे आशिक हैं (नाटक) | प्रमुख भूमिका- रुकसाना साहिल | मराठी |
२००८ | कबड्डी कबड्डी | प्रमुख भूमिका- पूर्वा | मराठी |
२०१३ | छापा काटा | निर्माती आणि प्रमुख भूमिका - मैत्रेयी भागवत | मराठी |
२०१४ | रंग नवा | निर्माती आणि प्रमुख भूमिका | मराठी |
२०१५ | लव्ह बर्ड्स | निर्माती आणि प्रमुख भूमिका- देविका | मराठी |
इंदिरा | निर्माती | मराठी | |
२०१६ | कोडमंत्र | निर्माती आणि प्रमुख भूमिका- अहिल्या देशमुख | मराठी |
दीपस्तंभ | निर्माती | मराठी | |
२०१७ | सखाराम बाईंडर | निर्माती आणि प्रमुख भूमिका- चंपा | मराठी |
पुरस्कार आणि प्रशंसा
साल | चित्रपट/ नाटक | पुरस्कार | विभाग/ नामांकने | निकाल |
---|---|---|---|---|
२००३ | देहभान | अल्फा गौरव अवॉर्ड्स | उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री प्रायोगिक नाटकातील उत्कृष्ट अभिनेत्री |
प्राप्त |
२००५ | फायनल ड्राफ्ट | अल्फा गौरव अवॉर्ड्स | उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री प्रायोगिक नाटकातील उत्कृष्ट अभिनेत्री |
प्राप्त |
चकवा | महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार | उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री | प्राप्त | |
२००६ | हम तो तेरे आशिक है | महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार | प्राप्त | |
फायनल ड्राफ्ट | महाराष्ट्र टाइम्स सन्मान अवॉर्ड्स | प्राप्त | ||
झी गौरव अवॉर्ड्स | प्राप्त | |||
संस्कृती कलादर्पण अवॉर्ड्स | प्राप्त | |||
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार | प्राप्त | |||
२००७ | कबड्डी कबड्डी | महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार | प्राप्त | |
२००८ | झी गौरव अवॉर्ड्स | प्राप्त | ||
२००९ | जोगवा | महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार | सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री | प्राप्त |
२०१० | मुंबई पुणे मुंबई | Marathi international film and theater awards | प्राप्त | |
Pune international film festival awards | प्राप्त | |||
२०११ | महाराष्ट्राचा फेवोरेट कोण | नामांकन | ||
आघात | Pune International Film Festival Awards | प्राप्त | ||
२०१४ | लग्न पहावे करून | स्क्रीन मराठी अवॉर्ड्स | नामांकन | |
छापा काटा | दिनानाथ मंगेशकर अवॉर्ड्स | प्राप्त | ||
संस्कृती कलादर्पण अवॉर्ड्स | सर्वोत्कृष्ठ नाटक | प्राप्त | ||
संस्कृती कलादर्पण अवॉर्ड्स | सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री | प्राप्त | ||
मंगलाष्टक वन्स मोअर | महाराष्ट्राचा फेवोरेट कोण | नामांकन | ||
२०१५ | डबलसीट | महाराष्ट्राचा फेवोरेट कोण | प्राप्त | |
२०१६ | डबलसीट | झी चित्र गौरव | प्राप्त | |
संस्कृती कला दर्पण | नामांकन | |||
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार | प्राप्त | |||
मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स | प्राप्त | |||
मुंबई पुणे मुंबई २ | मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स | नामांकन | ||
महाराष्ट्राचा फेवोरेट कोण | नामांकन | |||
२०१७ | कोडमंत्र | म. टा. सन्मान २०१७ | सर्वोत्कृष्ठ नाटक , सर्वोत्कृष्ठ नेपथ्य | प्राप्त |
झी नाट्य गौरव २०१७ | सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री | नामांकन | ||
विशेष पुरस्कार- नैसर्गिक अभिनय | प्राप्त | |||
विशेष पुरस्कार- नाटक | प्राप्त | |||
सर्वोत्कृष्ठ नाटक | नामांकन | |||
संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१७ | सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री | प्राप्त | ||
सर्वोत्कृष्ठ नाटक | प्राप्त |
इतर विशेष पुरस्कार
साल | पुरस्कार | विभाग/ नामांकने | निकाल |
---|---|---|---|
२००९ | संगीत नाटक अकादमी अवॉर्ड्स | उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार | प्राप्त |
२०११ | राजा परांजपे फेस्टिवल अवॉर्ड्स | तरुणाई सन्मान | प्राप्त |
२०१२ | ऍड फिझ | Special Achievement Award | प्राप्त |
२०१४ | IBN लोकमत | उद्याची प्रेरणा पुरस्कार (नाटक आणि सिनेमा) | प्राप्त |
महाराष्ट्र वन | सावित्री सन्मान (सिनेमा) | प्राप्त | |
२०१६ | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर | नाटक विभाग | प्राप्त |
निळू फुले सन्मान २०१६ | Intelligent actress of the year | प्राप्त | |
पु ल महोत्सव | तरुणाई सन्मान पुरस्कार | प्राप्त | |
२०१७ | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर | नाटक विभाग | नामांकन |
- आय.बी.एन. लोकमत या दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार : २०१४
- ’आघात’साठी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
- ’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
- संगीत नाटक अकादमी (नवी दिल्ली)चा नाट्यक्षेत्रासाठीचा उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार:२००९
- ’जोगवा’साठी महाराष्ट्र सरकारचा वर्षातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२००८-०९
- कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
- कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
- कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७ [७३]
- फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
- फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
- हम तो तेरे आशिक हैं सारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००४-०५
- फायनल ड्राफ्टसारख्या प्रायोगिक(?) नाटकातील भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अल्फा गौरव अवॉर्ड:२००४-०५
- ’चकवा’साठी, पदार्पणातच चमकणार्या कलावंताला दिला जाणारा महाराष्ट्र सरकारचा २००४-०५चा पुरस्कार
- ’देहभान’मधील उत्कृष्ट सहकलाकाराच्या भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
- ’देहभान’मधील भूमिकेसाठी, पदार्पणातच चमकणार्या कलावंताला ’झी’तर्फे दिला जाणारा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
- ‘डबलसीट’ चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले.
संदर्भ व नोंदी
- ^ भुते, वैशाली. http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm. ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://www.ozee.com/shows/home-minister-swapna-gruh-lakshmiche/video/home-minister-episode-1342-august-14-2015-full-episode.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.loksatta.com/videos/vivalaunj/401940/mukta-barve-talks-about-lalit-kala-kendra-theater-education/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.loksatta.com/viva-news/viva-lounge-mukta-barve-401029/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://timesofindia.indiatimes.com/city/pune-times/Performing-arts-degree-slowly-taking-centre-stage/articleshow/26707.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.loksatta.com/lokrang-news/yugdharma-marathi-natak-1113407/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b http://www.muktabarve.com/biography.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Is-Mukta-Barve-planning-to-sell-her-car/articleshow/47551303.cms
- ^ url=http://archive.indianexpress.com/news/bold-attempt-jogwa/522836/
- ^ url=http://www.thehindu.com/arts/sangeet-natak-akademi-announces-ustad-bismillah-khan-yuva-puraskars-for-2009/article514205.ece
- ^ url=http://archive.indianexpress.com/news/romance-in-the-air/631013/
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Swwapnil-and-Muktas-intense-chemistry/articleshow/48386831.cms
- ^ url=http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-viva-lounge-with-mukta-barve-in-thane-today-394511/
- ^ url=http://www.sakaaltimes.com/sakaaltimesbeta/20110114/4897010558338744242.htm
- ^ url=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7169608.cms
- ^ url=http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-/23113
- ^ url=http://www.loksatta.com/lokprabha/virtual-friendship-with-television-262140/
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Eka-Lagnachi-Dusri-Goshtha-to-be-aired-as-mini-film/articleshow/18045602.cms?
- ^ url=http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-viva-lounge-with-mukta-barve-in-thane-today-394511/
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/Badam-Rani-Gulam-Chor/movie-review/15074898.cms
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Muktas-to-entertain-fans-in-Toronto/articleshow/16136480.cms
- ^ url=http://maharashtratimes.indiatimes.com/interview/mukta-barve/articleshow/49294812.cms
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Mukta-Barve-turns-producer-with-her-production-house-named-after-Rasika-Joshi/articleshow/25653222.cms
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/theatre/Chhapa-Kaata-Sameer-Vidwans-Reema-Mukta-Barve-Ashish-Kulkarni/articleshow/27898207.cms?
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/theatre/Neena-replaces-Reema-in-play/articleshow/44697284.cms
- ^ url=http://www.radioandmusic.com/node/35291
- ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/nominations-announced-for-sanskruti-kala-darpan-awards-488366/
- ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/drama-review-rang-nava-602694/
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Mukta-Barve-and-Umesh-Kamat-team-up-for-a-Rom-Com/articleshow/19964971.cms?
- ^ url=http://indiannerve.com/lagne-pahave-karun-movie-review-making-sense-of-arranged-marriages-kundali-compatibility-23456-12098/
- ^ url=http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5587397050721758160&SectionId=4724885822106096577&SectionName=Bollywood&NewsDate=20130607&NewsTitle=Mukta-Swapneel%20to%20recreate%20the%20magic!
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/Mangalashtak-Once-More/movie-review/26255334.cms
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/tv/trade-news/marathi/World-Television-Premiere-of-Double-Seat/articleshow/49597645.cms
- ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/double-seat-movie-music-launch-1126640/
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Mukta-Barves-real-life-inspiration-for-Double-Seat/articleshow/48141245.cms
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/Double-Seat/movie-review/48483610.cms
- ^ url=http://marathicineyug.com/news/latest-news/811-sanskruti-kaladarpan-awards-nominations-lifetime-achievement-award-for-ashok-saraf-face-of-the-year-swwapnil-joshi
- ^ url=http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-53rd-maharashtra-state-film-awards-halal-and-ringan-shine-out-5313287-PHO.html?ref=np
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Mukta-Barve-wins-Best-Actress-at-Marathi-Filmfare/articleshow/55655872.cms
- ^ url=http://www.thehansindia.com/posts/index/2015-11-26/Zee-Talkies-Maharashtracha-Favorite-Kon-2016-Awards-a-massive-success-189044
- ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/list-of-zee-chitragaurav-award-winners-1214483/
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Highway-marathi-casting/articleshow/47971181.cms
- ^ url=http://www.firstpost.com/bollywood/highway-review-umesh-and-girish-kulkarnis-latest-is-a-triumph-for-marathi-cinema-and-ftii-2411824.html
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/Mumbai-Pune-Mumbai-2/movie-review/49769393.cms
- ^ a b url=http://www.loksatta.com/manoranjan-news/interview-with-mukta-barve-1164704/
- ^ url=http://www.loksatta.com/moviereview-news/eka-lagnachi-practical-gosht-1159613/
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/filmfare-marathi-nominations-2016/articleshow/55576778.cms
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/Ganvesh/movie-review/52916677.cms
- ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/mukta-barve-in-yz-movie-1262110/
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/YZ/movie-review/53670117.cms
- ^ url=http://www.megamarathi.com/marathi-movies/hrudayantar-marathi-movie/
- ^ url=http://www.marathimovieworld.com/news/shahrukh-khan-gives-clap-for-vikram-phadnis-marathi-film-hrudayantar.php
- ^ http://indianexpress.com/article/entertainment/regional/hrithik-roshan-returns-as-krrish-in-hrudayantar-but-has-no-dialogues-4679068/
- ^ url=http://www.dnaindia.com/entertainment/report-zee-gaurav-celebrates-100-years-of-indian-cinema-1658617
- ^ url=http://www.loksatta.com/vruthanta-news/swapnil-joshi-mukta-barve-brand-ambassador-of-suyog-group-5252/
- ^ url=http://www.loksatta.com/lokrang-news/vinay-apte-in-mukta-barves-memory-1048570/
- ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/actor-vinay-apte-birth-anniversary-celebrated-616403/
- ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/jhakkas-heroine-season-2-1129059/
- ^ url=http://www.loksatta.com/mumbai-news/marathi-actor-become-active-for-birds-save-1189699/
- ^ url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-with-its-progressive-outlook-is-a-better-place-for-women/
- ^ url=https://www.youtube.com/watch?v=ovxk6BaEoQE
- ^ url=http://www.loksatta.com/ls-diwali2015-news/poem-7-1196994/
- ^ url=https://twitter.com/ColorsMarathi/status/758668154008637440
- ^ a b url=https://www.youtube.com/watch?v=WwnEnL0H8dE&t=4830s
- ^ url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pu-La-awards-for-Ameen-Sayani-Mirasdar/articleshow/55320773.cms
- ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/lovebirds-marathi-drama-1103671/
- ^ url=http://marathicineyug.com/theatre/news/1298-mukta-barve-s-marathi-play-code-mantra-opens-from-18-june-2016
- ^ url=http://sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5461738112727328060&SectionId=5131376722999570563&SectionName=Features&NewsTitle=A%20real%20%E2%80%98live%E2%80%99%20theatrical%20experience
- ^ url=https://www.youtube.com/watch?v=g0h95nb5lY0
- ^ url=http://marathicineyug.com/theatre/news/1770-mukta-barve-produced-new-marathi-play-deepstambh-muhurat-held
- ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/mukta-barve-lalitkala-kendra-revive-classic-marathi-play-sakharam-binder-for-a-cause-1395292/
- ^ url=http://marathicineyug.com/theatre/news/2224-mukta-barve-lalitkala-kendra-revive-classic-marathi-play-sakharam-binder-for-a-cause
- ^ (इंग्लिश भाषेत) http://www.मराठीmovieworld.com/artistprofile/mukta-barve-award.php. ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://www.muktabarve.com/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)