रसिका जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रसिका जोशी
जन्म रसिका जोशी
१२ सप्टेंबर, १९७२
मुंबई
मृत्यू ७ जुलै, २०११
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पती गिरीश जोशी

रसिका जोशी (जन्मदिनांक : मुंबई, १२ सप्टेंबर इ.स. १९७२ - मुंबई, ७ जुलै, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) ही मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री होती. तिने मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला. दिग्दर्शक गिरीश जोशी याची ती पत्‍नी होती.

महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळीतून या अभिनेत्रीचा उदय झाला.

कारकीर्द[संपादन]

रसिका जोशी हिच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील तिची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील तिच्या भूमिका स्मरणीय होत्या. यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाचे कथा आणि संवादलेखन तिने केले होते.

गायब, वास्तुशास्त्र, भूत अंकल, भुलभुलय्या, मालामाल वीकली, जॉनी गद्दार, बिल्लू बार्बर, खलबली या हिंदी भाषेतील चित्रपटातूनही तिने अभिनय केला.

मृत्यू[संपादन]

अखेरची तीन वर्षे ती कर्करोगाने ग्रस्त होती. जुलै, इ.स. २०११मध्ये व्हाईट लिली आणि नाइट रायडर या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल आले होते[ संदर्भ हवा ]. वयाच्या ३९व्या वर्षी ७ जुलै, इ.स. २०११ रोजी वांद्रे, मुंबई येथे रुग्णालयात तिचा मृत्यू झाला[१].

संदर्भ[संपादन]

  1. ^ "अभिनेत्री रसिका जोशी यांचे निधन" (मराठी मजकूर). सकाळ. ८ जुलै, इ.स. २०११. ८ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.