रीमा लागू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रीमा लागू
रीमा लागू
जन्म रीमा लागू
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

रीमा (जन्म १९५८) ह्या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत. नयन भडभडे या पूर्वाश्रमीच्या व रीमा लागू या लग्नानंतरच्या नावाने त्या ओळखल्या जातात. सुमारे चार दशकांचा चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले आहे. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन..!, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले आहे.

आरंभीचे आयुष्य[संपादन]

मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले.

रीमा लागू यांनी भूमिका केलेली नाटके[संपादन]

  • घर तिघांचं हवं
  • चल आटप लवकर
  • झाले मोकळे आकाश
  • तो एक क्षण
  • पुरुष
  • बुलंद
  • सविता दामोदर परांजपे
  • विठो रखुमाय

संदर्भ[संपादन]

http://www.imdb.com/name/nm0481363/