जोगवा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोगवा
दिग्दर्शन राजीव पाटील
निर्मिती श्रीपाल मोराखिया
पटकथा संजय कृष्णाजी पाटिल
प्रमुख कलाकार मुक्ता बर्वे
उपेन्द्र लिमये
विनय आपटे
अदिती देशपांडे
किशोर कदम
प्रिया बेर्डे
प्रमोद पवार
अमिता खोपकर
प्रशांत पाटिल
चिन्मय मांडलेकर
स्मिता तांबे
संकलन राजेश राव
संगीत अजय अतुल
देश भारत भारतीय
भाषा मराठी
प्रदर्शित २५ सप्टेंबर, इ.स. २००९
अवधी ९२ मिनिटे


जोगवा हा इ.स. २००९ चा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट आहे. २५ सप्टेंबर, इ.स. २००९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक राजीव पाटील आणि आय ड्रिम प्रॉडक्शनची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटात उपेंद्र लिमये,मुक्ता बर्वे, प्रिया बेर्डे, विनय आपटे आणि किशोर कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पार्श्वभूमी[संपादन]

कर्नाटकमधील यल्लम्मा देवीला मुले -मुली सोडण्याची अनिष्ट रूढी अजूनही समाजात काही अंशी प्रचलित आहे. या मुलांना "जोगता" तर मुलींना "जोगतीण" म्हणतात. यांचे जीवन हे देवदासींप्रमाणेच असते. समाजातील त्यांचे स्थान हे दुय्यम असून अनेकदा त्यांचे लैंगिक शोषणही होते. राजीव पाटिल यांनी विषयाची मांडणी अत्यंत साधेपणाने केली असून, केवळ मनोरंजन आणि चित्रपट समिक्षकांची वाहवा मिळवण्यापुढे जाऊन, ग्रामीण समाजात या रूढीचे कारण, निराकारण आणि जागृतीचे काम या चित्रपटाने केले.

कथानक[संपादन]

चित्रपटाची कथा ही डॉ. राजन गवस यांच्या चौंडक आणि भंडार भोग तसेच चारुता सागर यांच्या दर्शन या कादंबऱ्यांवर आधारीत आहे. ह्रदयद्रावक असणाऱ्या या चित्रपटात अनिष्ट रूढींचे जोखड झुगारून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्त्रीची कथा आहे.

कलाकार[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

गीत गायक चित्रिकरण
"मन रानात गेल ग" श्रेया घोषाल मुक्ता बर्वे
"लल्लाटी भंडार" अजय गोगावले उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे आणि इतर
"जीव दंगला" हरिहरन आणिश्रेया घोषाल उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे
"हरिणीच्या दारात" आनंद शिंदे उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे

पुरस्कार[संपादन]

इ.स. २००८ च्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत या चित्रपटाने ५ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. सर्वोत्कृष्ट सामाजिक जागृती करणारा चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता - उपेंद्र लिमये, सर्वोत्कृष्ट संगीत - अजय अतुल, सर्वोत्कृष्ट पुरूष गायक -हरिहरन, सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका -श्रेया घोषाल. "जीव रंगला" या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गायनाचे हे दोन पुरस्कार जाहीर झाले होते.