"पाकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? अमराठी मजकूर
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४: ओळ ४४:
'''पाकिस्तान''' हा [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियात]] असलेल्या [[भारत|भारताच्या]] वायव्य सीमेवरील [[देश]] आहे. पाकिस्तान हे के॓द्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार के॓द्रशासित प्रदेश आहेत. [[इस्लामाबाद]] ही पाकिस्तानाची [[राजधानी]] तर [[कराची]] हो सर्वात मोठे [[शहर]] आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १७ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क आहे. [[इंडोनेशिया]] पाठोपाठ जगात सर्वाधिक [[मुस्लिम]] [[लोकसंख्या]] पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, [[भूगोल]], वन्यप्राणी यात प्रच॓ड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक [[विकसनशील देश]] असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. पाकिस्तानी [[अर्थव्यवस्था]] जगात २७ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून, [[लष्करी राजवट]], राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले वादग्रस्त संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही [[आतंकवाद]], [[दारिद्र्य]], [[निरक्षरता]] आणि [[भ्रष्टाचार]] अशा समस्यांशी झगडत आहे.
'''पाकिस्तान''' हा [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियात]] असलेल्या [[भारत|भारताच्या]] वायव्य सीमेवरील [[देश]] आहे. पाकिस्तान हे के॓द्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार के॓द्रशासित प्रदेश आहेत. [[इस्लामाबाद]] ही पाकिस्तानाची [[राजधानी]] तर [[कराची]] हो सर्वात मोठे [[शहर]] आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १७ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क आहे. [[इंडोनेशिया]] पाठोपाठ जगात सर्वाधिक [[मुस्लिम]] [[लोकसंख्या]] पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, [[भूगोल]], वन्यप्राणी यात प्रच॓ड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक [[विकसनशील देश]] असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. पाकिस्तानी [[अर्थव्यवस्था]] जगात २७ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून, [[लष्करी राजवट]], राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले वादग्रस्त संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही [[आतंकवाद]], [[दारिद्र्य]], [[निरक्षरता]] आणि [[भ्रष्टाचार]] अशा समस्यांशी झगडत आहे.


पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पाकिस्तान हे एक [[अण्वस्त्र]]सज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्रसज्जता असलेलेल हे [[मुस्लिम जगत|मुस्लिम जगतातील]] पहिले आणि एकमेव राष्ट्र असून, [[दक्षिण आशिया]]तील दुसरे राष्ट्र आहे. पाकिस्तान हे अमेरिकेचे [[नेटो]]बाहेरील मित्रराष्ट्र आहे आणि [[चीन]]सोबत राजनैतिक मित्रसंबंध आहेत. पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे (सध्याची [[इस्लामिक सहयोग संघटना]]) जनक राष्ट्र आहे. पाकिस्तान [[संयुक्त राष्ट्रे]], [[राष्ट्र्कुल]] आणि [[जी-२०]] संघटनांचे सदस्य आहे.
पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पाकिस्तान हे एक [[अण्वस्त्र]]सज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्रसज्जता असलेलेल हे [[मुस्लिम जगत|मुस्लिम जगतातील]] पहिले आणि एकमेव राष्ट्र असून, [[दक्षिण आशिया]]तील दुसरे राष्ट्र आहे. पाकिस्तान हे अमेरिकेचे [[नाटो]]बाहेरील मित्रराष्ट्र आहे आणि [[चीन]]सोबत राजनैतिक मित्रसंबंध आहेत. पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे (सध्याची [[इस्लामिक सहयोग संघटना]]) जनक राष्ट्र आहे. पाकिस्तान [[संयुक्त राष्ट्रे]], [[राष्ट्र्कुल]] आणि [[जी-२०]] संघटनांचे सदस्य आहे.

==भारतीय पंतप्रधानांचे पाकिस्तान दौरे==
* जवाहरलाल नेहरू : १९५३ (काश्‍मीर मुद्यावर चर्चेसाठी)
** १९६० (सिंधू पाणीवाटप करार)
* राजीव गांधी : १९८८ (सार्क परिषदेसाठी)
** १९८९ (द्विपक्षीय चर्चेसाठी)
* अटलबिहारी वाजपेयी : १९९९ (लाहोर-दिल्ली बससेवेचे उद्‌घाटन)
** २००४ (सार्क परिषदेसाठी)
* नरेंद्र मोदी : २०१५ (अनौपचारिक भेट)


{| class="infobox borderless"
{| class="infobox borderless"

०५:१३, २६ मे २०१६ ची आवृत्ती

पाकिस्तान
اسلامی جمہوریۂ پاکستان
Islamic Republic of Pakistan
पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: ईमान, इत्तेहाद, तन्जिम
(इमान, ऐक्य आणि शिस्त)
राष्ट्रगीत: क़ौमी तराना
पाकिस्तानचे स्थान
पाकिस्तानचे स्थान
पाकिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी इस्लामाबाद
सर्वात मोठे शहर कराची
अधिकृत भाषा उर्दू, इंग्लिश
इतर प्रमुख भाषा -
 - राष्ट्रप्रमुख ममनून हसन
 - पंतप्रधान नवाझ शरीफ
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इफ्तिकार चौधरी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (युनायटेड किंग्डमपासून)
ऑगस्ट १४, इ.स. १९४७ 
 - प्रजासत्ताक दिन मार्च २३, इ.स. १९५६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८,८०,२५४ किमी (३४वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.१
लोकसंख्या
 -एकूण १६,३९,८५,३७३ (६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २११/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४०४.६ अब्ज अमेरिकन डॉलर (२६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,६२८ अमेरिकन डॉलर (१२८वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन पाकिस्तानी रुपया (PKR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पाकिस्तानी प्रमाणवेळ (PST) (यूटीसी +५:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ PK
आंतरजाल प्रत्यय .pk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


पाकिस्तान हा दक्षिण आशियात असलेल्या भारताच्या वायव्य सीमेवरील देश आहे. पाकिस्तान हे के॓द्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार के॓द्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची हो सर्वात मोठे शहर आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १७ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रच॓ड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्था जगात २७ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून, लष्करी राजवट, राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले वादग्रस्त संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही आतंकवाद, दारिद्र्य, निरक्षरता आणि भ्रष्टाचार अशा समस्यांशी झगडत आहे.

पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पाकिस्तान हे एक अण्वस्त्रसज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्रसज्जता असलेलेल हे मुस्लिम जगतातील पहिले आणि एकमेव राष्ट्र असून, दक्षिण आशियातील दुसरे राष्ट्र आहे. पाकिस्तान हे अमेरिकेचे नाटोबाहेरील मित्रराष्ट्र आहे आणि चीनसोबत राजनैतिक मित्रसंबंध आहेत. पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे (सध्याची इस्लामिक सहयोग संघटना) जनक राष्ट्र आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रे, राष्ट्र्कुल आणि जी-२० संघटनांचे सदस्य आहे.

भारतीय पंतप्रधानांचे पाकिस्तान दौरे

  • जवाहरलाल नेहरू : १९५३ (काश्‍मीर मुद्यावर चर्चेसाठी)
    • १९६० (सिंधू पाणीवाटप करार)
  • राजीव गांधी : १९८८ (सार्क परिषदेसाठी)
    • १९८९ (द्विपक्षीय चर्चेसाठी)
  • अटलबिहारी वाजपेयी : १९९९ (लाहोर-दिल्ली बससेवेचे उद्‌घाटन)
    • २००४ (सार्क परिषदेसाठी)
  • नरेंद्र मोदी : २०१५ (अनौपचारिक भेट)
National symbols of Pakistan (Official)
National animal
National bird
National tree
National flower
National heritage animal
National heritage bird
National aquatic marine mammal
National reptile
National amphibian
National fruit
National mosque
National mausoleum
National river
National mountain

इतिहास

कालानुक्रमे भारतातील साम्राज्ये, हखामनी साम्राज्य (इराण), खिलाफत, मंगोल, मुघल, दुराणी साम्राज्य, शीख आणि ब्रिटिश वसाहत यांची पाकिस्तानावर सत्ता होती. इ.स. १९४७ मध्ये पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली झाली. भारतीय स्वातंत्र्यलढयाच्याशेवटी ब्रिटिश भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या मुस्लिमबहुल स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली, भारताच्या वायव्येला पश्चिम पाकिस्तान आणि पूर्वेला पूर्व पाकिस्तान यांचा मिळून पाकिस्तान देश बनला. हे दोन्ही विभाग भौगोलिकदृष्ट्या मध्ये असलेल्या भारतामुळे विलग झाले होते. इ.स. १९६५ मध्ये पाकिस्तानच्या राज्यघटनेला जनमान्यता मिळाल्यानंतर पाकिस्तान हे इस्लामी प्रजासत्ताक झाले. इ.स. १९७१ मध्ये सशस्त्र क्रांतीनंतर पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.

नावाची व्युत्पत्ती

पाकिस्तान हा शब्द पाक (अर्थ: पवित्र) व स्तान (अर्थ: भूमी) या दोन उर्दू शब्दां‍चा संधी आहे. इ.स. १९३३ मध्ये चौधरी रहमत अली, पाकिस्तान चळवळीचे सदस्य, यांनी प्रकाशित केलेल्या, नाऊ ऑर नेव्हर या नावाने परिचित असलेल्या प्रसिध्दिपत्रकात सर्वप्रथम पाकस्तानची मागणी केली गेली. पाकस्तान हा शब्द पंजाब, अफगाण प्रांत, काश्मीर, सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांच्या नावांमधील अक्षरांवरून निर्माण झाला. भाषेच्या नियमांमुळे आणि बोलण्याच्या सोयीसाठी त्या दोन घटकशब्दांत हा स्वर घालण्यात आला.

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतु:सीमा

पाकिस्तानच्या पूर्वेला भारत, वायव्येला अफगाणिस्तान, नैर्‌ऋत्येला इराण, ईशान्येला चीन आहे. पाकिस्तानच्या उत्तरेचा ताजिकिस्तान त्याला वाखानच्या भूभागाने जोडला गेला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्रओमानचे आखात असून देशाला १०४६ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पाकिस्तान देश ओमानशी सागरी सरहद्दीने जोडलेला आहे. पाकिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि मध्यपूर्व आशिया यांच्यामधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर आहे. आधुनिक पाकिस्तान हे नवपाषाण युग (नियोलिथिक) मेहरगढ़ आणि कांस्य युग सि॓धू संस्कृती याचा मिलाप आहे. याशिवाय वेळोवेळी झालेल्या आक्रमणांमुळे आणि वसाहतींमुळे पाकिस्तानात, हि॓दू, पर्शिअन, इंडो-ग्रीक, इस्लामिक, तुर्की-मंगोल, अफगाणी आणि शीख संस्कृतींचा प्रभाव आढळतो. पाकिस्तानचा भूभाग नेहमीच वेगवेगळ्या राजवटी आणि साम्राज्यांचा हिस्सा राहिला आहे.

राजकीय विभाग

पाकिस्तान चार प्रशासकीय विभागांमध्ये विभागलेले आहे; पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान, तसेच राजधानी प्रदेश आणि केंद्रीय अखत्यारीतील आदिवासी प्रदेश ज्यात सीमावर्ती भागाचा समावेश आहे. पाकिस्तानी सरकारचे वादग्रस्त पश्चिमी काश्मीर भागावर, जे आझाद काश्मीर आणि गिलगीट-बाल्टिस्तान या दोन विभागात विभागलेले आहे, आभासी सरकार आहे. गिलगीट-बाल्टिस्तान भागाला प्रांताचा दर्जा देत २००९ मध्ये हा प्रांत स्वयंशासित केला गेला.

स्थानिक पातळीवर प्रशासकीय संस्था तीन पातळ्यांवर विभागलेली आहे, जिल्हे, तालुका आणि गाव पातळी (Union councils).

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

पाकिस्तान हे घटनात्मक प्रजासत्ताक असून इस्लाम हा राष्ट्रीय धर्म आहे. सर्वप्रथम इ.स. १९५६ मध्ये संविधान स्विकारले गेले पण १९५८ मध्ये जनरल अय्युब खान यांनी ते रद्दबादल केले. इ.स. १९७३ मध्ये स्विकारलेले संविधान झिया-उल-हक यांनी पुन्हा इ.स. १९७७ मध्ये रद्द केले. इ.स. १९८५ मध्ये पुनर्जिवीत केलेली संविधानची प्रत ही देशातील अत्यंत महत्वाची आणि मुलभूत कायदेपत्रिका आहे.

लष्कर

जगात पाकिस्तानी लष्कराचा सातवा क्रमांक लागतो. पायदळ, नौसेना आणि वायुदल हे प्रमुख विभाग असून अंतर्गत सुरक्षा आणि सीमावर्ती टेहाळणीसाठी निमलष्करी दलाचा वापर केला जातो. नॅशनल कमांड ऑथोरिटी ही संस्था लष्करभरती, प्रशिक्षण, आण्विक शस्त्रनिर्मिती करणाऱ्या संस्थांचा विकास तसेच पाकिस्तानी आण्विक कार्यक्रम यांच्या नियोजनासाठी जबाबदार आहे.

अर्थतंत्र

खेळ

२००८ आॅलिम्पिक खेळात पाकिस्तानचा हाॅकी संघ

हॉकी हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ असून क्रिकेट ह सर्वात लोकप्रिय खेळ आहे. इ.स. १९९२ मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानने दुसरे स्थान पटकावले. इ.स. १९८७ आणि इ.स. १९९६ मध्ये पाकिस्तानने यजमानपद भूषविले. इ.स. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रथमच खेळल्या गेलेल्या आयसीसी ट्वेंटी-२० विश्वकरंडकामध्ये उपविजतेपद पटकावले, इ.स. २००९ मध्ये इंग्लंड मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी ट्वेंटी-२० विश्वकरंडकामध्ये पाकिस्तान विजेते ठरले. दहशतवादाच्या सावटाखाली जगभरातील क्रिकेट संघांनी पाकिस्तान जाणे सुरक्षित न समजल्याने पाकिस्तानी क्रिकेट विश्वाला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. इ.स. २००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकन क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे कोणत्याही क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा केलेला नाही.

जागतिक पातळीवर जाहंगीर खान आणि जानशेर खान यांनी अनेक वेळा स्क्वाश विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. जाहंगीर खान यांनी दहा वेळा ब्रिटिश ओपन जिंकून विश्वविक्रम स्थापन केला आहे. किरण खान यांनी जलतरण आणि ऐसम-उल्-हक कुरेशी यांनी टेनिस मध्ये जागतीक पातळीवर नैपुण्य प्रदर्शित केले आहे. पाकिस्तानने ऑलिंपिक खेळांमध्ये हॉकी,बॉक्सिंग,अ‍ॅथलेटिक्स, जलतरण आणि नेमबाजी मध्ये भाग घेतलेला आहे.