Jump to content

"विराट कोहली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३९: ओळ १३९:
<br />
<br />
एप्रिल २००७ मध्ये त्याने ट्वेंटी२० पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.<ref>[http://cricketarchive.com/Archive/Events/6/Inter_State_Twenty-20_Tournament_2006-07/Delhi_Batting.html २००६-०७ आंतरराज्य टी२० स्पर्धा]</ref> जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. [[श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ]] आणि [[बांग्लादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघ]]यांच्याशी झालेल्या त्रिकोणी मालिकेतील ५ सामन्यांमध्ये कोहलीने १४६ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळविले.<ref>[http://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_career.html?id=3206;type=tournament श्रीलंकेमधील १९ वर्षांखालील त्रिकोणी मालिका, २००७ मध्ये सर्वाधिक धावा]</ref> त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या. <ref>[http://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_career.html?id=3201;type=series भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची श्रीलंकेतील कसोटी मालिका, २००७]</ref>
एप्रिल २००७ मध्ये त्याने ट्वेंटी२० पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.<ref>[http://cricketarchive.com/Archive/Events/6/Inter_State_Twenty-20_Tournament_2006-07/Delhi_Batting.html २००६-०७ आंतरराज्य टी२० स्पर्धा]</ref> जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. [[श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ]] आणि [[बांग्लादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघ]]यांच्याशी झालेल्या त्रिकोणी मालिकेतील ५ सामन्यांमध्ये कोहलीने १४६ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळविले.<ref>[http://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_career.html?id=3206;type=tournament श्रीलंकेमधील १९ वर्षांखालील त्रिकोणी मालिका, २००७ मध्ये सर्वाधिक धावा]</ref> त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या. <ref>[http://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_career.html?id=3201;type=series भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची श्रीलंकेतील कसोटी मालिका, २००७]</ref>

{{Quote box |width=25% |align=left |quoted=1 |quote="He is a very physical type of player. He likes to impose himself on the game, backs it up with his skill."|salign=right |source=—भारतीय प्रशिक्षक [[डेव्ह व्हॉटमोर] १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक २००८ स्पर्धेदरम्यान कोहली बाबत बोलताना<ref name=emerging/>}}
+
फेब्रुवारी-मार्च २००८ मध्ये कोहली [[मलेशिया]] मध्ये पार पडलेल्या [[१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २००८|१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक]] जिंकणार्‍या संघाचा कर्णधार होता. ४थ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ६ सामन्यांमध्ये ४७च्या सरासरीने त्याने २३५ धावा केल्या, आणि सर्वात जास्त धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळविले. स्पर्धेमध्ये शतक झळकावणार्‍या तीन फलंदाजांपैकी तो एक होता.<ref name=border>[http://www.espncricinfo.com/india/content/story/353779.html कोहली, सांगवान आणि श्रीवास्तव ऑस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षण घेणार (इंग्रजी मजकूर)]</ref> वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरूद्धची त्याच्या ७४ चेंडूंतील १०० धावांच्या खेळीला ESPNcricinfo ने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळी म्हणून संबोधले आहे.<ref name=onestowatch>[http://www.espncricinfo.com/india/content/story/340902.html पाहण्यासारखी खेळी (इंग्रजी मजकूर)]</ref>. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिज विरूद्ध भारताने ५० धावांनी विजय मिळविला आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. कोहलीला सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली परंतू इंग्लंड १९ वर्षांखालील संघा विरूद्ध उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी तो वेळेत बरा झाला.<ref>[http://www.espncricinfo.com/u19wc2008/content/story/340550.html लिडींग द वे (इंग्रजी मजकूर)]</ref> [न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघ]ा विरूद्ध विजयात त्याचा खूप मोठा वाटा होता. त्या सामन्यात त्याने २७ धावांत २ गडी बाद केले आणि लक्ष्याचा तणावपूर्ण पाठलाग करताना ४३ धावा केल्या. या सामन्यातही त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.<ref>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/317005.html १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, उपांत्य सामना: भारत १९ वर्षांखालील संघ वि न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघ कौलालंपूर, २७ फेब्रुवारी २००८]</ref> अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने १९ धावा केल्या, हा सामना भारताने डकवर्थ/लुईस पद्धतीनुसार १२ धावांनी जिंकला. ESPNcricinfo ने त्याने स्पर्धेत अनेकदा केलेल्या गोलंदाजीतील बदलांची प्रशंसा केली. <ref name=onestowatch/>


==आंतरराष्ट्रीय कामगिरी==
==आंतरराष्ट्रीय कामगिरी==

११:३५, २७ मार्च २०१६ ची आवृत्ती


विराट कोहली
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव विराट कोहली
जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ (1988-11-05) (वय: ३६)
दिल्ली,भारत
उंची ५ फु ९ इं (१.७५ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००६-सद्य दिल्ली
२००८-सद्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
प्रथम श्रेणी पदार्पण २३ नोव्हेंबर २००६: दिल्ली v तमिळनाडू
List-A पदार्पण १८ फेब्रुवारी २००६: दिल्ली v सर्विसेस
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.टी२०प्र.श्रे.
सामने ४१ १७१ ४१ ७३
धावा २९९४ ७२१२ १४७० ५२४३
फलंदाजीची सरासरी ४४.०२ ५१.५१ ५२.५० ४८.१०
शतके/अर्धशतके ११/१२ २५/३६ ०/१४ १८/२०
सर्वोच्च धावसंख्या १६९ १८३ ९०* १९७
चेंडू १५० ६११ १३६ ६१८
बळी
गोलंदाजीची सरासरी - १५९.० ६१.० १०८.०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी - १/१५ १/१३ २/४२
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

२५ मार्च, इ.स. २०१६
दुवा: [विराट कोहली क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)


विराट कोहली (जन्म ५ नोव्हेंबर १९८८) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी तसेच काही वेळा उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. सध्या तो भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील कर्णधार तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उपकर्णधार आहे. तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचाही तो कर्णधार आहे.
दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट २००८मध्ये, १९ वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. सुरुवातीला राखीव खेळाडू असलेल्या विराट कोहलीने लवकरच भारताच्या मधल्या फळीमध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. कोहली आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला. त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली[]. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.
२०१२ मध्ये कोहलीची एकदिवसीय क्रिकेट मध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने बरेचदा कर्णधार महेंद्रसिंग धोणीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. २०१४ मध्ये धोणीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला. सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे. २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.
कोहलीला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू २०१२ आणि २०११-१२ व २०१४-१५ साठीचा बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कारसुद्धा समाविष्ट आहे. स्पोर्टस् प्रो (SportsPro), नावाच्या एका इंग्लंडच्या मासिकाने २०१४ मध्ये कोहलीला दुसरा सर्वात उल्लेखनीय खेळाडू म्हणून उल्लेखले आहे.

तो आयएसएल च्या एफसी गोवा आणि आयपीटीएलची फ्रंचायसी असलेल्या यूएई रॉयल्सचा सह-मालक आहे.


सुरुवातीचे जीवन

विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला[][]. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी. [] त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.

कोहली उत्तम नगर मध्ये लहानाचा मोठा झाला आणि विशाल भारती पब्लिक स्कूल मध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले. १९९८ साली, पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता. “विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लब मध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले. अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. त्यावेळी नॉयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडूनही तो सामने खेळला. नववी असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. खेळाशिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता.

मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. कुटुंबावर कठीण वेळा आल्या... हे सर्व मनावर खोल रुतून बसलं आहे." कोहलीने सांगितल्यानुसार त्याच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा दिला होता, "माझे वडील हा माझा सर्वात मोठा आधार होता. ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत. अजूनही कधी कधी मला त्यांच्या सहवासाची आठवण होते."

स्थानिक कामगिरी

कोहली प्रथम ऑक्टोबर २००२ मध्ये पार पडलेल्या २००२-०३ पॉली उम्रीगर ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांखालील दिल्लीच्या संघातून खेळला. या स्पर्धेत ३४.४० च्या सरासरीने त्याने सर्वांत जास्त १७२ धावा केल्या. [] २००३-०४ पॉली उम्रीगर ट्रॉफीसाठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. []. त्या स्पर्धेत पाच डावांत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ७८ च्या सरासरीने ३९० धावा केल्या. [] २००४ च्या उत्तरार्धात तो २००४-०५ विजय मर्चंट ट्रॉफीसाठी १७ वर्षांखालील दिल्ली संघात निवडला गेला. त्या स्पर्धेत त्याने दोन शतकांसह ११७.५० च्या सरासरीने ४७० धावा केल्या, त्यात नाबाद २५१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. [] २००५-०६ विजय मर्चंट ट्रॉफी, १७ वर्षांखालील दिल्लीच्या संघाने जिंकली, ज्यात कोहली सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्याने ७ सामन्यांत तीन शतकांसह ८४.११ च्या सरासरीने ७५७ धावा केल्या. [] फेब्रुवारी २००६ मध्ये त्याने सर्व्हिसेसच्या संघाविरुद्ध दिल्लीकडून लिस्ट अ सामन्यामध्ये पदार्पण केले, परंतु त्याला फलंदाजी मिळाली नाही.[१०]

जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०५ च्या सरासरीने [११] तर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या[१२]. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दॊन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले. दौऱ्याच्या समाप्‍तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित होत म्हणाले, "कोहलीने जलद आणि फिरकी दोन्ही गोलंदाजीविरूद्ध मजबूत तांत्रिक कौशल्य दाखविले [१३] ". सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. कोहलीने पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी मालिकेत ५८[१४] तर एकदिवसीय मालिकेत ४१.६६ च्या सरासरीने धावा केल्या. [१५] ऑक्टोबर मध्ये दिल्ली १९ वर्षांखालील क्रिकेट संघाकडून खेळताना त्याने विनू मनकड ट्रॉफीमध्ये १५ च्या सरासरीने[१६] आणि कुचबिहार ट्रॉफीमध्ये ७२.६६ च्या सरासरीने धावा केल्या. [१७] त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तर विभाग १९ वर्षांखालील संघामध्ये निवडला गेला, ज्यामध्ये त्याने दोन सामन्यांत २८ च्या सरासरीने धावा केल्या.[१८]

"मी ज्याप्रकारे खेळाला सामोरा गेलो, त्यामुळे तो दिवसच बदलला. माझ्या मनात एकच गोष्ट होती – की मला माझ्या देशासाठी खेळायचं आहे आणि माझ्या वडिलांसाठी ते स्वप्न जगायचं आहे. "

— कोहली त्याच्या कर्नाटक विरूद्धच्या खेळीबद्दल.[१९]

कोहलीने नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले, आणि पदार्पणाच्या सामन्यात तो अवघ्या १० धावा काढू शकला. परंतु जेव्हा तो डिसेंबर महिन्यात झालेल्या वडलांच्या निधनानंतरही कर्नाटकविरुद्ध खेळला तेव्हा तो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. त्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या. [२०] तो बाद झाल्यानंतर लगेचच वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेला. दिल्लीचा कर्णधार मिथुन मन्हास म्हणतो "ही एक खूपच वचनबद्धतेची कृती आहे आणि त्याच्या खेळी निर्णायक ठरली. त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." [२१] त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." [] त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या. [२२]

एप्रिल २००७ मध्ये त्याने ट्वेंटी२० पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.[२३] जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि बांग्लादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघयांच्याशी झालेल्या त्रिकोणी मालिकेतील ५ सामन्यांमध्ये कोहलीने १४६ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळविले.[२४] त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या. [२५]

{{Quote box |width=25% |align=left |quoted=1 |quote="He is a very physical type of player. He likes to impose himself on the game, backs it up with his skill."|salign=right |source=—भारतीय प्रशिक्षक [[डेव्ह व्हॉटमोर] १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक २००८ स्पर्धेदरम्यान कोहली बाबत बोलताना[१९]}}

 	+ 	

फेब्रुवारी-मार्च २००८ मध्ये कोहली मलेशिया मध्ये पार पडलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकणार्‍या संघाचा कर्णधार होता. ४थ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ६ सामन्यांमध्ये ४७च्या सरासरीने त्याने २३५ धावा केल्या, आणि सर्वात जास्त धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळविले. स्पर्धेमध्ये शतक झळकावणार्‍या तीन फलंदाजांपैकी तो एक होता.[२६] वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरूद्धची त्याच्या ७४ चेंडूंतील १०० धावांच्या खेळीला ESPNcricinfo ने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळी म्हणून संबोधले आहे.[२७]. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिज विरूद्ध भारताने ५० धावांनी विजय मिळविला आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. कोहलीला सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली परंतू इंग्लंड १९ वर्षांखालील संघा विरूद्ध उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी तो वेळेत बरा झाला.[२८] [न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघ]ा विरूद्ध विजयात त्याचा खूप मोठा वाटा होता. त्या सामन्यात त्याने २७ धावांत २ गडी बाद केले आणि लक्ष्याचा तणावपूर्ण पाठलाग करताना ४३ धावा केल्या. या सामन्यातही त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.[२९] अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने १९ धावा केल्या, हा सामना भारताने डकवर्थ/लुईस पद्धतीनुसार १२ धावांनी जिंकला. ESPNcricinfo ने त्याने स्पर्धेत अनेकदा केलेल्या गोलंदाजीतील बदलांची प्रशंसा केली. [२७]

आंतरराष्ट्रीय कामगिरी

सुरुवातीची वर्षे

तळागाळातून वर

एकदिवसीय उप-कर्णधार म्हणून बढती

विक्रमांची मांदियाळी

परदेश दौरे

कसोटी कर्णधार

आयपीएल कामगिरी

खेळाची शैली

क्रिकेट शिवाय

वैयक्तिक जीवन

व्यावसायिक गुंतवणूक

मान्यता

विराट कोहली फाऊंडेशन

विक्रम आणि कामगिरी

आकडेवारी

पुरस्कार

  • आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू २०१२[३२]
  • आयसीसी विश्व एकदिवसीय XI : २०१२, २०१४
  • बीसीसीआय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पॉली उम्रीगर पुरस्कार : २०११-१२, २०१४-१५ [३३]
  • अर्जुन पुरस्कार: २०१३
  • सीएट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू : २०११-१२, २०१३-१४[३४]

कसोटी क्रिकेट

सामनावीर पुरस्कार

क्र. विरुद्ध ठिकाण तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ
1 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत एम्. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर ३१ ऑगस्ट–३ सप्टेंबर २०१२ १ला डाव: १०३ (१९३ चेंडू: १४x४ १x६)

२रा डाव: ५१ (८२ चेंडू: ९x४)

विजयी [३५]
2 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका न्यू वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग १८-२२ डिसेंबर २०१३ १ला डाव: ११९ (१८१ चेंडू: १८x४)

२रा डाव: ९६ (१९३ चेंडू: ९x४)

अनिर्णित [३६]

एकदिवसीय क्रिकेट

सामनावीर पुरस्कार

मालिकावीर पुरस्कार

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट

सामनावीर पुरस्कार

मालिकावीर पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ विराट कोहली नंबर वन
  2. ^ आजही क्रिकेटपटूला पुरेसा पैसा मिळत नाही : कपिलदेव आणि विराट कोहलीचा संवाद (इंग्रजी मजकूर)
  3. ^ [http://forbesindia.com/printcontent/36731 विराट कोहली : द ग्लॅडिएटर (इंग्रजी मजकूर)
  4. ^ a b वडीलांच्या मृत्युनंतर विराट बदलला : आई (इंग्रजी मजकूर)
  5. ^ २००२-०३ पॉली उम्रीगर ट्रॉफी
  6. ^ १५ वर्षांखालील दिल्ली वि १५ वर्षांखालील हिमाचल प्रदेश, २००३-०४
  7. ^ २००३-०४, पॉली उम्रीगर ट्रॉफीमध्ये १५ वर्षांखालील दिल्ली संघाची फलंदाजी
  8. ^ २००४-०५, विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये १७ वर्षांखालील दिल्ली संघाची फलंदाजी
  9. ^ २००५-०६, विजय मर्चंट ट्रॉफीमधील फलंदाजी
  10. ^ २००६, दिल्ली विरुद्ध सर्व्हिसेस
  11. ^ २००६ मध्ये इंग्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची एकदिवसीय मालिकेतील फलंदाजी
  12. ^ २००६ मध्ये इंग्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची कसोटी मालिकेतील फलंदाजी
  13. ^ लालचंद राजपूत भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या कामगिरीने संतुष्ट (इंग्रजी मजकूर)
  14. ^ २००६-०७ मध्ये पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची कसोटी मालिकेतील फलंदाजी
  15. ^ २००६-०७ मध्ये पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची एकदिवसीय मालिकेतील फलंदाजी
  16. ^ २००६-०७, विनू मनकड ट्रॉफीमध्ये १९ वर्षांखालील दिल्ली संघाची फलंदाजी
  17. ^ २००६-०७, कुचबिहार ट्रॉफीमध्ये १९ वर्षांखालील दिल्ली संघाची फलंदाजी
  18. ^ उत्तर विभाग १९ वर्षांखालील संघाची २००६-०७ विजय हजारे ट्रॉफीमध्ये फलंदाजी
  19. ^ a b स्वतः उदयोन्मुख (इंग्रजी मजकूर)
  20. ^ दिल्लीच्या लढ्याची सूत्रे बिश्त आणि कोहलीकडे (इंग्रजी मजकूर)
  21. ^ वडिलांच्या निधनानंतरही तो दिल्लीला वाचविण्यासाठी खेळला (इंग्रजी मजकूर)
  22. ^ २००६-०७, रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीची फलंदाजी
  23. ^ २००६-०७ आंतरराज्य टी२० स्पर्धा
  24. ^ श्रीलंकेमधील १९ वर्षांखालील त्रिकोणी मालिका, २००७ मध्ये सर्वाधिक धावा
  25. ^ भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची श्रीलंकेतील कसोटी मालिका, २००७
  26. ^ कोहली, सांगवान आणि श्रीवास्तव ऑस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षण घेणार (इंग्रजी मजकूर)
  27. ^ a b पाहण्यासारखी खेळी (इंग्रजी मजकूर)
  28. ^ लिडींग द वे (इंग्रजी मजकूर)
  29. ^ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, उपांत्य सामना: भारत १९ वर्षांखालील संघ वि न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघ कौलालंपूर, २७ फेब्रुवारी २००८
  30. ^ विराट कोहली कसोटी क्रिकेट आकडेवारी espncricinfo.com वर
  31. ^ विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट आकडेवारी espncricinfo.com वर
  32. ^ विराट कोहलीला २०१२ आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार
  33. ^ विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित
  34. ^ विराट कोहली सीएट सर्वोत्तम क्रिकेटपटू
  35. ^ [१]
  36. ^ [२]