"सातवाहन साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Krassotkin (चर्चा | योगदान) छो (Script) File renamed: File:AndhraPradeshRoyalHearings1stCenturyBCE.jpg → File:Andhra Pradesh Royal earrings 1st Century BCE.jpg File renaming criterion #2: Change from completely meaningless name... |
|||
ओळ २८: | ओळ २८: | ||
[[चित्र:Satavahana1stCenturyBCECoinInscribedInBrahmi(Sataka)Nisa.jpg| ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेली इ.स.पू. पहिल्या शतकातले नाणे|thumb]] |
[[चित्र:Satavahana1stCenturyBCECoinInscribedInBrahmi(Sataka)Nisa.jpg| ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेली इ.स.पू. पहिल्या शतकातले नाणे|thumb]] |
||
[[महाराष्ट्र राज्य गॅझेटियर]] (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे |
[[महाराष्ट्र राज्य गॅझेटियर]] (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढीलप्रमाणे नोंदवितो. |
||
* '''सिमुक सातवाहन'''(संस्थापक) (यालाच सिंधुक असेही नाव आहे.) |
* '''सिमुक सातवाहन'''(संस्थापक) (यालाच सिंधुक असेही नाव आहे.) |
||
[[चित्र:Andhra Pradesh Royal earrings 1st Century BCE.jpg|आंध्रपदेश येथे सापडलेली सातवाहन राजवंशातील कर्णभूषणे|thumb]] |
[[चित्र:Andhra Pradesh Royal earrings 1st Century BCE.jpg|आंध्रपदेश येथे सापडलेली सातवाहन राजवंशातील कर्णभूषणे|thumb]] |
||
[[चित्र:Indian ship on lead coin of Vashishtiputra Shri Pulumavi.jpg|इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुलुमावी यांच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र. हे चित्र भारतीय प्राचीन दर्यावर्दी होते हे सिद्ध करते, तसेच प्राचीन भारताच्या परदेशी व्यापाराचा पुरावाही देते.|thumb]] |

सिमुक |
सिमुक सातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी [[रथिक]] व [[भोज]] या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने [[कण्व]] घराण्याचा शेवटचा [[राजा सुदार्मन]] याला पदच्युत करून शुंगांची सत्ता नष्ट करुन आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. [[नाणेघाट]] येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून [[दक्षिणापथपति]] ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती. |
||
* '''[[कृष्ण सातवाहन]]'''( सिमुकचा धाकटा भाऊ..) |
* '''[[कृष्ण सातवाहन]]'''( सिमुकचा धाकटा भाऊ..) |
||
सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली. |

* '''[[पहिला |
* '''[[पहिला सातकर्णी]]''' (नागनिकेचा पती.) |
||
सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती [[नाणेघाट]] येथील शिलालेखात आहे. [[अप्रतिहतचक्र]] ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती. |

ओळ ५९: | ओळ ५९: | ||
* यज्ञ सातकर्णी |
* यज्ञ सातकर्णी |
||
अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौसिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणार्या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते. |

==सातवाहन राज्याची पार्श्वभूमी असलेले मराठी ललित साहित्य== |
|||
* हिरण्यदुर्ग (कादंबरी, लेखक : संजय सोनवणी) |
|||
* |
|||
== सातवाहन राजांची वंशावळ == |
== सातवाहन राजांची वंशावळ == |
१४:५९, १७ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
सातवाहन (तेलुगू: శాతవాహన సామ్రాజ్యము ; रोमन लिपी: Sātavāhana ;) हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील पांडवलेणी या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली.
सातवाहन राजघराणे
सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे
बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. हे राजे वैदिक धर्माभिमानी होते. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा-वेरूळची लेणी ही लेणी खोदली गेली.
पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती.
राज्यकर्ते
सातवाहन काळात या राजघराण्याच्या तीस राज्यकर्ते होऊन गेले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्याच तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे.
नाणेघाटातील शिलालेखात ब्राह्मी लिपीत कोरून ठेवलेली खालील नावे दिसून येतात :
- राजा सिमुक सातवाहन,
- राणी नागणिका,
- राजा श्री सातकर्णी (नागणिकेचा पती),
- कुमार भाय (राजपुत्र),
- महारठि गणकयिरो अथवा महारथी गणरयिर (राणी नागणिकेचे पिता),
- कुमार हुकुसिरी (राजपुत्र)
- कुमार सातवाहन (राजपुत्र)
हे अतिशय समृद्ध असे राज्य होते.
महाराष्ट्र राज्य गॅझेटियर (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढीलप्रमाणे नोंदवितो.
- सिमुक सातवाहन(संस्थापक) (यालाच सिंधुक असेही नाव आहे.)
सिमुक सातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून शुंगांची सत्ता नष्ट करुन आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दक्षिणापथपति ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती.
- कृष्ण सातवाहन( सिमुकचा धाकटा भाऊ..)
सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली.
- पहिला सातकर्णी (नागनिकेचा पती.)
सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती नाणेघाट येथील शिलालेखात आहे. अप्रतिहतचक्र ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती.
- वेदिश्री
- सतिसिरी (शक्तिश्री)
- हाल सातवाहन
- गौतमीपुत्र सातकर्णी
- आपिलक
- कुंतल
- सुनंदन
- सुंदर
- वाशिष्ठीपुत्र सातकर्णी
- वाशिष्ठीपुत्र शिवश्री पुलुमावी
- वाशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी
- गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
- गौतमीपुत्र विजय सातकर्णी
- चंड सातकर्णि
- वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी
- पुलुमावी (पुळुमावि)
- यज्ञ सातकर्णी
अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौसिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणार्या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते.
सातवाहन राज्याची पार्श्वभूमी असलेले मराठी ललित साहित्य
- हिरण्यदुर्ग (कादंबरी, लेखक : संजय सोनवणी)
सातवाहन राजांची वंशावळ
बाह्य दुवे
- दुर्गाप्रसाद लिखित आंध्रप्रदेशाचा इतिहास [मृत दुवा] (इंग्रजी मजकूर)
- सातवाहनांचे भारतीय साम्राज्य [मृत दुवा] (इंग्रजी मजकूर)
- (इंग्रजी भाषेत) http://travel2.nytimes.com/2006/11/05/travel/05caves.html?pagewanted=print. Missing or empty
|title=
(सहाय्य) - सातवाहनांचा इतिहास (इंग्रजी मजकूर)
- "पुराणकालीन इतिहासाचा सेतू" सातवाहन (इंग्रजी मजकूर)
- "तेलमन भाषा तेलुगू [मृत दुवा] (इंग्रजी मजकूर)