Jump to content

कृष्ण सातवाहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कृष्ण सातवाहन
दक्षिणा-पाठपती
नाशिक लेण्यांमधील लेणी क्रमांक १९ मधील राजा कान्हाचा शिलालेख. हा सुमारे इ.स.पूर्व १००-७० काळातील, सर्वात जुना ज्ञात सातवाहन शिलालेख आहे
अधिकारकाळ इ.स.पू. १०० - इ.स.पू. ७०
राज्याभिषेक इ.स.पू. १००
राजधानी प्रतिष्ठान
पूर्ण नाव कृष्ण सातवाहन
पूर्वाधिकारी सिमुक सातवाहन
उत्तराधिकारी पहिला सातकर्णी
राजघराणे सातवाहन
धर्म हिंदू धर्म

कान्हा उर्फ कृष्ण (ब्राह्मी लिपी: 𑀓𑀦𑁆𑀳 ,का-न्हा) हा भारतातील सातवाहन राजवंशाचा शासक होता. इतिहासकार हिमांशू प्रभा राय यांनी त्याचा राज्यकाळ अंदाजे इ.स.पूर्व १००-७० असा निश्चित केला आहे.

पुराणांमध्ये कान्हाचा उल्लेख "कृष्ण" (IAST :Kṛṣṇa) म्हणून केला गेला आहे. पौराणिक वंशावळीनुसार, तो पहिला सातवाहन राजा सिमुक सातवाहन (ज्याचे नाव वेगवेगळ्या पुराणांनुसार बदलते) याचा भाऊ होता.