Jump to content

वासिष्ठीपुत्र पुलुमावी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पहिला पुलुमावी या पानावरून पुनर्निर्देशित)
सम्राट वासिष्ठीपुत्र पुलुमावी
महाराजा
श्री वसिष्ठीपुत्र पुलुमावि यांचे प्राकृत आणि (शक्यतो) जुन्या तेलुगु भाषेतील द्विभाषिक नाणे, आणि प्राकृत आख्यायिकेच्या समोरील बाजूचे लिप्यंतरण .

समोरील बाजू: राजाचे चित्र. ब्राह्मी लिपीत प्राकृत आख्यायिका (१२ वाजता सुरू): 𑀭𑀜𑁄 𑀯𑀸𑀲𑀺𑀣𑀺𑀧𑀼𑀢𑀲 𑀲𑀺𑀭𑀺 𑀧𑀼𑀎𑀼𑀫𑀸𑀯𑀺𑀲 राणो वासिष्ठीपुत्र सिरी-पुḷुमाविसा "राजा भगवान पुलुमावि, वसिष्ठीचा मुलगा" उलट: उज्जैन आणि कमानी-टेकडी चिन्हे. द्रविडमधील आख्यायिका ( तेलुगु अचंताच्या शेवटासारखी), आणि द्रविड लिपी, ब्राह्मी लिपीशी जुळणारी (12 वाजता सुरू होणारी): 𑀅𑀭𑀳𑀡𑀓𑀼 𑀯𑀸𑀳𑀺𑀣𑀺 𑀫𑀸𑀓𑀼 𑀢𑀺𑀭𑀼 𑀧𑀼𑀮𑀼𑀫𑀸𑀯𑀺𑀓𑀼 अरहणकु वाहित्ती माकाणकु तिरु पुलुमाविकु किंवा: अरचनकु वाचित्ती मकाणकु तिरु पुलुमाविकु"चे राजा तिरु पुलुमावी, वसिष्ठीचा मुलगा"

अधिकारकाळ इ.स. १३० - इ.स. १५४
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. १३०
राजधानी प्रतिष्ठान
पूर्ण नाव वासिष्ठीपुत्र श्री पुलुमावी
पूर्वाधिकारी गौतमीपुत्र सातकर्णी
उत्तराधिकारी वासिष्ठीपुत्र सातकर्णी
वडील गौतमीपुत्र सातकर्णी
आई महाराणी वासिष्ठी
राजघराणे सातवाहन
ब्रिटिश संग्रहालयात असलेले वासिष्ठीपुत्र पुलुमावीचे चांदीचे नाणे

वासिष्ठीपुत्र पुलुमावी (मराठी लेखनभेद: वासिष्ठीपुत्र पुलुमावि) हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर इ.स. १३२ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला.

कारकीर्द

[संपादन]

याच्या कारकिर्दीत क्षत्रपांनी उठाव करून नर्मदेच्या उत्तरेकडील भूप्रदेश व उत्तर कोकण जिंकून घेतले. वासिष्ठीपुत्र पुलुमावी आणि रूद्रदामन (उज्जैनचा क्षत्रप राजा) यांच्यात दोनदा युद्ध झाले. या दोन्ही युद्धांत रूद्रदामनाने वासिष्ठीपुत्र पुलुमावीचा पराभव केला. परंतु त्याची कन्या वासिष्ठीपुत्र सातकर्णीस (पुलुमावीचा धाकटा भाऊ) दिलेली असल्याने क्षत्रपांनी तडजोड करून घेतली. वासिष्ठीपुत्र पुलुमावीने स्वतःचा मुखवटा असलेली चांदीची नाणी प्रचारात आणली.

संकीर्ण

[संपादन]

टॉलेमी या ग्रीक प्रवाशाने प्रतिष्ठानचा सम्राट म्हणून वासिष्ठीपुत्र पुलुमावीचा (ग्रीकः सिरिस्तोलेमयोस, अर्थात श्री पुलुमायी) उल्लेख केलेला आहे[ संदर्भ हवा ].