"नंदिनी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
नाशिक जवळच्या या नंदिनी नदीच्या काठी वसलेल्या टाकळी या गाव रामदासस्वामींनी तपश्चर्या केली. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ)[[रामदास]] हे नाव धारण केले. टाकळी येथे ते, इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालीत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा, तर चार तास रामनामाचा जप करीत. म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला, असे म्हणतात. |

==सद्यस्थिती== |
|||
नंदिनी ही गोदावरीप्रमाणेच नाशिकच्या मध्यवस्तीतून वाहणारी नदी आहे. महिरावणी ते आगरटाकळी या सुमारे पंचवीस किलोमीटरच्या मार्गावर तिच्या पात्रात अनेक गावे, वस्त्या, झोपडपट्ट्या आणि नागरी वसाहतींचे मलजल, सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळते. पावसाळ्यात मोठा पाऊस झाला, तरच भरून वाहणाऱ्या या नदीची अवस्था एरवी नाल्यासारखीच झाली आहे. दोन्ही काठांवर झोपडपट्ट्या आणि वस्त्यांचे अतिक्रमण झाल्याने तिच्या पात्राचा संकोच झाला आहे, |
|||
अतिक्रमणांच्या वेढ्यात दबलेली आणि सांडपाणी गटारीसारखे वाहून नेण्यापुरती उरलेली नंदिनी भविष्यात नाशिक शहरापुढे मोठे संकट निर्माण करण्याची चिन्हे आहेत. तिच्या पात्राचा संकोच आणि प्रदूषणाकडे झालेले दुर्लक्ष नागरिकांसाठी जीवघेणे ठरू शकते. ही नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत आगरटाकळी येथे गोदावरीत मिसळते. या ठिकाणाला "टाकळी संगम' म्हटले जाते. पण, दोन्ही नद्यांच्या या भेटीला प्रदूषणाचा काळाकुट्ट डाग लागला आहे. नंदिनीचे कमालीचे घाण आणि गटारीसारखे काळे पाणी ’नदी' म्हणून गोदेत मिसळते. त्यामुळे संगमाच्या अलीकडे निळसर दिसणारी गोदावरी या ठिकाणी मात्र पूर्णपणे काळीठिक्कर पडली आहे. |
|||