Jump to content

रवींद्रनाथ टागोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रबिन्द्रनाथ टागोर या पानावरून पुनर्निर्देशित)
रवींद्रनाथ टागोर
जन्म नाव रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर
टोपणनाव गुरूदेव
जन्म मे ७, १८६१
कोलकाता, भारत
मृत्यू ७ ऑगस्ट, १९४१ (वय ८०)
कोलकाता, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान, नाटक
भाषा बंगाली
साहित्य प्रकार कविता, नाटक
प्रसिद्ध साहित्यकृती जन गण मन, गीतांजली
प्रभावित द.रा. बेंद्रे, पु.ल. देशपांडे
वडील देवेंद्रनाथ टागोर
आई सरला देवी
पत्नी
मृणालिनी देवी
(ल. १८८३; मृ. १९०२)
पुरस्कार साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१३)[]
स्वाक्षरी रवींद्रनाथ टागोर ह्यांची स्वाक्षरी

रवींद्रनाथ टागोर (बंगाली: রবীন্দ্রনাথ ঠাকুর उच्चार: रोबीन्द्रनाथ ठाकूर) (मे ७, १८६१ - ऑगस्ट ७, १९४१), ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते.[][] १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला.

अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचे वर्णन "अगदी संवेदनशील, ताजे आणि सुंदर" कविता असे केले जाते. ते १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले.[] टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे आध्यात्मिक आणि पारंपारिक म्हणून पाहिले गेले; तथापि, त्यांचे "सुंदर गद्य आणि जादुई कविता" बंगालबाहेर फारसे ज्ञात नाहीत.[]

बंगाली साहित्यावर रवीन्द्रनाथांचा एवढा प्रभाव लक्षात आहे की, बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते. त्यांना कधीकधी "बंगालचा बार्ड" म्हणून संबोधले जाते.[] तसेच ते अत्यंत प्रतिष्ठित रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते.

कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली.[] वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. १८७७ पर्यंत त्यांनी त्यांच्या खऱ्या नावाने लघुकथा आणि नाटके प्रकाशित केली. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला.[][]

शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.

रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मनआमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झाले.[१०]

जीवनपट

[संपादन]

प्रारंभिक आयुष्य (१८६१ - १९०१)

[संपादन]

कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनाव रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर (१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० - १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत.ε[›][११] ११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे), अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.[१२][१३]

१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले.[१४] याच काळात त्यांनी संध्या-संगीत(१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा "भिकारिणी" व सुप्रसिद्ध कविता "निर्झरेर स्वप्नभंग" आदी रचना लिहिल्या.[१५][१६]

पत्‍नी मृणालिनीदेवी व रवींद्रनाथ १८८३

बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. ९-नोव्हेंबर-१८८३ रोजी त्यांनी मृणालिनी-देवी(जन्मनाव भावतारिणी १८७३-१९००) यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये (पैकी दोघांचा बालमृत्यू) झाली.[१७] १८९० साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्‍नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते.[१८] हा काळ रवींद्रनाथांचा "साधना काळ" म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ (मराठी अर्थ: कथा-गुच्छ) नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले.[१५] आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.[१५][१९]

शांतिनिकेतन (१९०१ - १९३२)

[संपादन]
महात्मा गांधी व रवीन्द्रनाथ (सालः १९४०)

१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता . या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली.[२०] रवीन्द्रनाथांच्या पत्‍नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान १९-जाने-१९०५ला घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांन नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी,ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली.[२१] या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (१९०१) व खेया (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा free verse या नावाने अनुवाद करणेही सुरू होते. १४-नोव्हे.-१९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते.[२२] १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने "सर" ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.

१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरूल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे "श्री-निकेतन" असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.[२३] ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले.[२४][२५] १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.[२६]

अखेरची वर्षे (१९३२-१९४१)

[संपादन]
रवींद्रनाथ (पहिल्या ओळीत डावीकडून तिसरे) इराणी संसद सदस्यांसोबत १९३२ [१].

जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. १५-जानेवारी-१९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी "दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड" अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला.[२७] बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्‌ऱ्यबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार ( अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो.[२८][२९] पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) आदी गद्यपद्यांचा(prose-prose) समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय 'चित्रांगदा', श्यामा (१९३९), चंडालिका (१९३८) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले.[३०] याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच (१९३४), and चार अध्याय (१९३४)आदी कादंबऱ्या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद(naturalism) हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे जसे से (तो) (१९३७),तीन संगी (१९४०), गल्पस्वल्प (१९४१).[३१]

इ.स. १९२४ चिनी विद्वानांसमवेत त्सिंग्व्हा विद्यापीठात टागोर (मध्यात).

रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनांत सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते.[३२][३३] ७-ऑगस्ट-१९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.[३४]

रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र

[संपादन]

रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.
रवींद्रनाथ अनुवादित तुकारामांचे अभंग.
कारवार येथील सृष्टिसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली [३५] छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्य ही त्यांनी रचले आहे. रवींद्रनाथांचा नेता व क्रांतिकारक या रूपांत भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती. रवीन्द्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते. रविंद्रनाथ ्मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे हे बंगाली भाषा शिकले. मराठीकानडी भाषेत लेखन केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या द.रा. बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रवीद्रनाथांचा प्रभाव आहे.

गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर रवींद्रनाथांनीच केले होते. याशिवाय तिचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले. मराठीतले पहिला गद्य अनुवाद हरि नारायण फडके यांनी केला होता. अमरावतीचे डॉक्टर राम म्हैसाळकर (जन्म : २९ मे, १९२९) यांनी रवींद्रनाथांच्या गीतंजलीसकट एकूण चार पुस्तकांचा ‘रवींद्र गीतांजली...’ नावाचा गद्यानुवाद केला आहे. ह्या अनुवादल मसापचे उत्कृष्ट भावानुवादाचे स.ह. मोडक पारितोषिक मिळाले होते.

याव्यतिरिक्त सौ. ज्योती कुलकर्णी यांनी ‘गीतांजली रविंद्रनाथांच्या - माझ्या मराठीत’ नावाचे पद्यमय भाषांतर केले आहे. (२००८)

कार्य

[संपादन]
पारंपारिक हैदा कोरीवकाम शैलीतील बंगाली लिपीतील रवींद्रनाथांची आद्याक्षरे "र-ठ" रवींद्रनाथ स्वतःची हस्तलिखिते अनेकदा अशा कलेने सजवत असत.

संगीत,साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते.

रवींद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली. यमकप्रचुरता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतर रवींद्रनाथांची लघुकथा ही प्रमुख रचना मानली जाते. रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार समजले जातात. सामान्य माणसांचे जीवन हे त्यांच्या कथांचे बीज आहे.

काव्य

[संपादन]
शांतिनिकेतन येथे वार्षिक होळी यात्रेनिमित्त जमलेले बाऊल लोककलाकार

१५-१६ व्या शतकातील वैष्णव रचनांचा रवींद्रनाथांवर प्रभाव होता. भारतीय परंपरेतील 'ऋषी' संकल्पनेचाही रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव दिसून येतो. गावोगावी गीत गात फिरणाऱ्या फकिरांसारख्या 'बाऊल' कलाकारांची ग्रामीण बंगालमध्ये परंपरा आहे. बाऊल स्वतःस कोणत्याही एका धर्माचे मानत नाहीत. त्यांच्या गीतांत हिंदू, मुस्लिम अशा दोन्ही धर्माची शिकवण दिसून येते. रवींद्रनाथांनी या परंपरेस बुद्धिजीवी वर्तुळात पूर्वी नसलेली प्रतिष्ठा दिली. त्यांच्या बाऊल परंपरेच्या अभ्यासाने त्यांच्या स्वतःच्या काव्यकृतीस नवा आयाम मिळाला.[३६][३७] 'मनेर मानुष' (मनातील माणूस) आणि 'जीवन देवता' ही दोन रूपके टागोरांच्या कवितेत बऱ्याचदा दिसतात.[३८][३९]

रवींद्रनाथांच्या गीतांजलीचे १९१३ सालच्या आवृत्तीचे मुखपृष्ठ.

गीतांजलीतील (গীতাঞ্জলি) चौथ्या कवितेचे (titleः प्रार्थना) मराठी भाषांतर

বিপদে মোরে রক্ষা করো এ নহে মোর প্রার্থনা,
বিপদে আমি না যেন করি ভয়।
দুঃখতাপে ব্যথিত চিতে নাই বা দিলে সান্ত্বনা,,
দুঃখে যেন করিতে পারি জয়॥
সহায় মোর না যদি জুটে
নিজের বল না যেন টুটে।
সংসারেতে ঘটিলে ক্ষতি, লভিলে শুধু বঞ্চনা,
নিজের মনে না যেন মানি ক্ষয়॥
আমারে তুমি করিবে ত্রাণ এ নহে মোর প্রার্থনা
তরিতে পারি শকতি যেন রয়।
আমার ভার লাঘব করি নাই বা দিলে সান্ত্বনা,
বহিতে পারি এমনি যেন হয়॥
নম্রশিরে সুখের দিনে তোমারি মুখ লইব চিনে,
দুখের রাতে নিখিল ধরা যে দিন করে বঞ্চনা তোমারে যেন না করি সংশয়॥
बिपदे मोरे रक्षा करो ए नहे मोर प्रार्थना,
बिपदे आमिना जेन करि भय||
दुःखतापे ब्यथित चिते नाइ बा दिले सान्त्बना,
दुःखे जेन करिते पारि जय||
सहाय मोरना जदि जुटे
निजेर बलना जेन टुटे|
संसारेते घटिले क्षति, लभिले शुधु बन्चना
निजेर मनेना जेन मानि क्षय||
आमारे तुमि करिबे त्राण ए नहे मोर प्रार्थना
तरिते पारि शकति जेन रय||
आमार भार लाघब करि नाइ बा दिले सान्त्बना
बहिते पारि एमनि जेन हय||
नम्रशिरे सुखेर दिने तोमारि मुख लैब चिने
दुखेर राते निखिल धरा जे दिन करे बन्चना
तोमारे जेनना करि संशय||

प्रार्थना
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|

दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा|


जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|

माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा|

माझे ओझे हलके करून
तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा|

सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा|

कादंबऱ्या व इतर साहित्य

[संपादन]

रवींद्रनाथांनी 'चतुरंग', 'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता), 'चार अध्याय', 'नौका डुबी', 'घरे बाईरे' या सारख्या ४ लघुकांदबऱ्या व ८ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. 'चतुरंग' ही सचिश नावाच्या परस्परविरोधी संकल्पनांत अडकलेल्या पात्राची कहाणी आहे. धार्मिक गूढतेतून आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या कथानायकाचा अंती होणारा भ्रमनिरास टागोरांनी या कादंबरीतून मांडला आहे.

गोरा कांदबरीतील मुख्य पात्र पारंपरिक हिंदू सनातनी मताचे समर्थक आहे. ह्या गौरवर्णीय पात्र व इतर पात्रातील संवादातून ही कांदबरी उलगडत जाते. सनातनी गोराच्या विचारामुळे त्याचे सनातनी वडील प्रभावित होत नाहीत. धर्मांधता ही श्रद्धेमुळे नव्हे तर व्यक्तीच्या उग्र प्रकृतीने बनते असे टागोर या कादंबरीतून सांगतात.

'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता) ही कवितेने नटलेली कादंबरी. यात 'रवींद्रनाथ ठाकूर' हे स्वतःचेच नाव सांगणाऱ्या 'प्रसिद्ध कवी'वर टागोर त्रयस्थपणे टीका करतात. 'चार अध्याय' ही रवींद्रनाथांची शेवटची कांदंबरी. 'राष्ट्रभक्ती' म्हणजे काय?, राष्ट्र कसे बनते?, केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय? अशा प्रश्नांचा धांडोळा ही कादंबरी घेते.

जीवनकहाणी

[संपादन]

रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांव्या ’जीवनस्मृती’ या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी केला आहे.

रवींद्रसंगीत

[संपादन]
"नाचणारी मुलगी", रवींद्रनाथांचे एक तैलचित्र - तारीख अज्ञात.

रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास २२३० गीतांना एकत्रितपणे रवींद्रसंगीत (बंगाली :রবীন্দ্র সংগীত}} असे संबोधले जाते. गगनेर खाले रबि चन्द्र दीपक ज्बले हे रवींद्रनाथांनी रचलेले पहिले व हे नूतन देखा दिक आरो बारो हे शेवटचे गीत मानण्यात येते. भारतबांग्लादेश यांची राष्ट्रगीते असलेल्या जन गण मनआमार शोनार बांग्ला ह्या रचना मूलतः रवींद्रसंगीताचा हिस्सा आहेत. सांगीतिकदृष्ट्या अभिजात भारतीय संगीत, बंगाली लोकसंगीत व अभिजात पाश्चात्त्य संगीत ह्या रवींद्रसंगीताच्या प्रेरणा मानल्या जातात. अभिजात भारतीय संगीतातील ठुमरी शैलीचा रवींद्रसंगीतावर मुख्य प्रभाव आहे. ही गीते रवींद्रनाथांच्या स्वतःचे तत्त्वचिंतन दाखवत असली तरी त्यांवर वैष्णवउपनिषदीय तत्त्वज्ञानाचीही झलकही दिसते. रवींद्रसंगीतातील गीते ही विविध रागांमध्ये बांधण्यात आली असून रागाचा व गीताचा भाव यात सुसंगती असते.[४०] अनेक गीतांमध्ये विविध रागांना एकत्र बांधून नवसृजन केलेले दिसते. अभिजात भारतीय संगीतातून प्रेरणा घेतलेल्या रवींद्रसंगीत हे नंतर अनेक अभिजात भारतीय संगीताच्या गायकवादकांचे प्रेरणास्रोत ठरले. रवींद्रसंगीताने प्रभावित गायक-वादकात विलायत खान (सतार), अमजद अली खान (सरोद]) आदींचा समावेश आहे.

चित्रकला

[संपादन]

वयाच्या ६० च्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रे काढण्यास सुरुवात केली. द. फ्रान्स मधील कलाकारांच्या प्रेरणेवरून त्यांच्या चित्रांची पॅरिस मधील पहिल्या प्रदर्शनासह युरोपभर अनेक प्रदर्शने झाली.[४१] आयुष्याच्या या काळात रवींद्रनाथांना रंगांधळेपणाचा त्रास सुरू झाला होता. सौन्दर्यदृष्टी व रंगछटांमध्ये रवींद्रनाथांच्या चित्रशैलीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. रवींद्रनाथांनी रचनेत वेगवेगळ्या शैलींचे अनुसरण केले. यात उत्तर आयर्लॅडमधील मलनगान कारागिरीपासून कॅनडाच्या हैदा कोरीवकाम प्रकारापर्यंतच्या चित्र व शिल्पकलेतील शैली येतात.[४२] आपल्या कृतींची हस्तलिखितेही अनेकदा रवींद्रनाथांनी कलाकारीने सजवली आहेत.

नाट्य

[संपादन]

वयाच्या विसाव्या रवींद्रनाथांनी 'वाल्मिकी प्रतिभा' नावाचे पहिले नृत्य-नाट्य लिहिले. यात भजनांच्या स्वरूपात असलेले पारंपरिक बंगाली कीर्तन व युरोपीय गीत-शैलींचा संमिश्र वापर केला आहे. ऐहिक सुखोपभोगांपासून पारमार्थिकाकडे हा विषय डाकघर नावाच्या नाटकात रवींद्रनाथांनी हाताळला आहे. 'अभिनयापेक्षा भावनांवर भर' असे रवींद्रनाथ स्वतःच्या नाटकांचे वर्णन करतात. 'चंडालिका', 'विसर्जन', चित्रांगदा', 'राजा', 'मायार खेला' ही रवींद्रनाथांची इतर नाटके. नाटकांसोबत टागोरांच्या 'नृत्य-नाटिका' विशेष प्रसिद्ध आहेत. मणिपुरी शैलीच्या अभिजात नृत्य शैलींचा टागोरांनी वापर केला आहे.

लघुकथा

[संपादन]

'गल्पगुच्छ'(कथागुच्छ) नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर,आधुनिक कल्पना व बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात. 'काबुलीवाला' या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशी असलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात.

इस्रायलमधील सार पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनसंस्थेने रविंद्रनाथांच्या कथांचा हिब्रू भाषेतील अनुवाद 'एप' या नावाने इ.स. २००६ साली प्रकाशित केलेला आहे.

राजकीय मते

[संपादन]
टागोर (उजवीकडे); महात्मा गांधी व पत्‍नी कस्तुरबा यांचेसह शांतिनिकेतन १९४०.

चरखा-पंथी असे संबोधून त्यांनी तत्कालीन स्वदेशी चळवळीची खिल्ली उडवली होती. ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही 'सामाजिक अनारोग्य' त्यांना मोठा शत्रू वाटत असे. स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणाऱ्या शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता. या मतांमुळे रवींद्रनाथांना शारीरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली. टागोरांनी रचलेली 'एकला चलो रे' व 'चित्त जेथा भयशून्य' ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा गीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

प्रभाव व वारसा

[संपादन]
रवींद्रनाथांचा वॅलाडोलिड येथील पुतळा

रवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकूर बाडी गावी रवींद्रनाथांच्या पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो.[४३][४४] रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तींत अमर्त्य सेन, ॲंन्द्रे गिडेल (फ्रान्स), यसुनारी कावाबाता (जपान) आदी नोबेल विजेते, याशिवाय सलमान रश्दी, पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे , विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे.

निवडक साहित्य सूची

[संपादन]

कादंबऱ्या

[संपादन]

गोरा (१९१०)
घरे बाईरे (१९१६)
चतुरंग (१९१६)
चार अध्याय (१९३४) चोखेर बाली (१९०२)
गोरा (१९१०)
जोगाजोग (१९३०)
मुक्तधारा (१९१६)
राज ऋषि (१९१६)
राजा आर रानी (१९१६)
शेषेर कबिता (१९२९)

लघुकथा

[संपादन]

काबुलीवाला
दृष्टिदान
क्षुधित पाषाण

नृत्य-नाटिका

[संपादन]

चंडालिका (१९३८)
चित्रांगदा (१९३६)
मालिनी (१८९५)
श्यामा (१९३८)

नाटके

[संपादन]

बिसर्जना (१८९०)
बैकुण्ठेर खाता (१८९७) राजा ओ रानी (१८८९)

काव्य व पुस्तके

[संपादन]

गीतांजली (१९१०)
जन्मदिने (१९४१)
नैबेद्य (१९०१)
पत्रपूत (१९३६)
पूरबी (१९२५)
पुनश्च (१९३२)
शेष सप्तक (१९३५)
श्यामली (१९३६)
सोनार तारी (१८९३)

रवींद्रानाथ टागोरांची मराठीत अनुवादित झालेली पुस्तके

[संपादन]
  • एकविंशति (कथासंग्रह, साहित्य अकादमी प्रकाशन)
  • काबुलीवाला आणि इतर कथा (अनुवादक - मृणालिनी गडकरी)
  • गीतांजली (काव्य, मेहता प्रकाशन)
  • चक्षूशल्य (कथासंग्रह, साहित्य अकादमी प्रकाशन)
  • चित्रांगदा (लेखसंग्रह; अनुवादक - गंगाधर गवाणकर)
  • जीवनस्मृती (आत्मचरित्र, अनुवादक - नीलिमा भावे)
  • तीन सांगातिणी (व्यक्तिचित्रणे, अनुवादक - मृणालिनी गडकरी)
  • देवदूत (कथासंग्रह, भावानुवाद - विजया भुसारी)
  • नष्ट नीड (कादंबरी, अनुवादक - नीलिमा भावे)
  • पोरवय (आठवणी, अनुवादक - पु.ल. देशपांडे)
  • पोस्टमास्तर आणि इतर कथा (अनुवादक - मृणालिनी गडकरी)
  • बऊठाकुरानीर हाट (कादंबरी, मेहता प्रकाशन)
  • भानुसिंहाची पत्रावली (रवींद्रनाथांची पत्रे, अनुवादक - विलास गिते)
  • योगायोग (साहित्य अकादमी प्रकाशन)
  • रवीन्द्र गीताली (माहितीपर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र कल्पना (कवितासंग्रह, अनुवादक - डाॅ. राम म्हैसाळकर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र काव्यांजली (माहितीपर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र गीतिमाल्य (विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र जन्मदिने (माहितीपर, अनुवादक -डाॅ. राम म्हैसाळकर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवींद्रनाथ टागोरांच्या निवडक कथा (अनुवादक - आराधना कुलकर्णी)
  • रवींद्रनाथ टागोरांच्या बालकविता (बालसाहित्य, अनुवादक - पद्मिनी बिनीवाले)
  • रवीन्द्र पथिक (माहितीपर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र भावांजली (माहितीपर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र शेषलेखा (माहितीपर, अनुवादक -डाॅ. राम म्हैसाळकर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र क्षणिका (रवींद्रनाथांच्या क्षणिका व चैतालि या काव्यसंग्रहाचा भावानुवाद, अनुवादक - डाॅ. राम म्हैसाळकर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रशियाहून लिहिलेली पत्रे (लोकवाङ्मय प्रकाशन)
  • सोनार तरी (कवितासंग्रह, अनुवादक - डाॅ. राम म्हैसाळकर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • स्वदेशी समाज आणि साधना (वैचारिक, अनुवादक - साने गुरुजी)

रवींद्रनाथांवरील मराठी पुस्तके

[संपादन]
  • गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर (चरित्र, व्यक्तिचित्रण, उज्ज्वला दीक्षित)
  • रविंद्रनाथ टागोर (प्रतिभा लेले)
  • रवींद्रनाथ टागोर: एक संपन्न व्यक्तिमत्त्व (पद्मिनी बिनीवाले)
  • रवींद्रनाथ टागोर युगनिर्माता विश्वमानव (डॉ. नरेंद्र जाधव)
  • रवींद्रनाथ-शुभ बुद्धीचे उपासक (आशा साठे)
  • रवींद्रनाथ टागोर समग्र साहित्यदर्शन (डॉ. नरेंद्र जाधव)

चित्रपट

[संपादन]

रवींद्रनाथांच्या अनेक कादंबऱ्या आणि लघुकथांवर बंगाली आणि हिंदी चित्रपट निघाले आहेत. उदा० परिणीता, काबुलीवाला वगैरे वगैर.

रवींद्रसंगीतातील काही निवडक गीते

[संपादन]
  1. आमार शोनार बांग्ला sound_title= Amar Shonar Bangla (Instrumental)
  2. आमी चिनी चिनी गो तोमारे ओ गो बिदेशिनी | (मी तुला ओळखतो गं विदेशिनी) (रवींद्रसंगीतातील एक अतिशय लोकप्रिय गीत)

आमी चिनी चिनी गो तोमारे ओ गो बिदेशिनी | Archived 2014-07-23 at the Wayback Machine.

  1. जन गण मन

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "साहित्यातील नोबेल पारितोषिक १९१३" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ "Anita Desai and Andrew Robinson — The Modern Resonance of Rabindranath Tagore". The On Being Project (इंग्रजी भाषेत). 2022-01-24 रोजी पाहिले.
  3. ^ Henry Newman (1921). The Calcutta Review. University of Calcutta. p. 252. I have also found that Bombay is India, Satara is India, Bangalore is India, Madras is India, Delhi, Lahore, the Khyber, Lucknow, Calcutta, Cuttack, Shillong, etc., are all India.
  4. ^ ""Red Oleanders by Tagore (tr. by Nupur Gangopadhayy Lahiri)--two reviews by Kathleen M. O'Connell, and Uma Dasgupta". www.parabaas.com. 2022-01-24 रोजी पाहिले.
  5. ^ "Tagore And His India By Amartya Sen". www.countercurrents.org. 2022-01-24 रोजी पाहिले.
  6. ^ "'Bard of Bengal' celebrated in London" (इंग्रजी भाषेत).
  7. ^ दत्ता, प्रदीप कुमार. Rabindranath Tagore's The Home and the World: A Critical Companion. p. 2.
  8. ^ Kripalani, Krishna. Tagore, A Life. pp. 2–3. line feed character in |प्रकरण= at position 9 (सहाय्य)
  9. ^ p.6, p.8 "Dwarkanath Tagore" Krishna Kripalani 1980 1st edn. reprint 2002 ISBN 81-237-3488-3
  10. ^ "ibnlive". 2012-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-24 रोजी पाहिले.
  11. ^ Dutta & Robinson 1995, p. 37.
  12. ^ Dutta & Robinson 1995, pp. 55–56.
  13. ^ Stewart & Twichell 2003, p. 91.
  14. ^ Stewart & Twichell 2003, p. 3.
  15. ^ a b c चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Chakravarty_1961_45 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  16. ^ Dutta & Robinson 1997, p. 265.
  17. ^ Dutta & Robinson 1995, p. 373.
  18. ^ Dutta & Robinson 1995, pp. 109–111.
  19. ^ Dutta & Robinson 1995, p. 109.
  20. ^ Dutta & Robinson 1995, p. 133.
  21. ^ Dutta & Robinson 1995, pp. 139–140.
  22. ^ Hjärne 1913.
  23. ^ Dutta & Robinson 1995, pp. 239–240.
  24. ^ Dutta & Robinson 1995, p. 242.
  25. ^ Dutta & Robinson 1995, pp. 308–309.
  26. ^ Dutta & Robinson 1995, p. 309
  27. ^ Dutta & Robinson 1995, pp. 312–313.
  28. ^ Dutta & Robinson 1995, pp. 335–338.
  29. ^ Dutta & Robinson 1995, p. 342.
  30. ^ ""Chitra at Project Gutenberg"". 2008-09-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-07 रोजी पाहिले.
  31. ^ Asiatic Society of Bangladesh 2006.
  32. ^ Dutta & Robinson 1995, p. 338.
  33. ^ Indo-Asian News Service 2005.
  34. ^ Dutta & Robinson 1995, p. 363.
  35. ^ http://en.wikipedia.org/wiki/Karwar
  36. ^ Stewart & Twichell 2003, p. 94.
  37. ^ Urban 2001, p. 18.
  38. ^ Stewart & Twichell 2003, p. 95.
  39. ^ Stewart & Twichell 2003, p. 7.
  40. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Dasgupta_2001 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  41. ^ Robinson 1997 Page 222}}.
  42. ^ name="Dyson_2001" प्रकाशक Dyson 2001
  43. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Chakrabarti_2001 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  44. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Hatcher_2001 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  • ^ α: Indian English pronunciation:
    साचा:IPA2.
  • ^ β: Romanized transliteration from Tagore's name in Bengali script:
    Robindronath Ţhakur.
  • ^ γ: In the Bengali calendar: 25 Baishakh, 1268–22 Srabon, 1348.
  • ^ δ: Gurudev translates as "divine mentor".[]
  • ^ ε: Tagore was born at No. 6 Dwarkanath Tagore Lane, Jorasanko—the address of the main mansion (the Jorasanko Thakurbari) inhabited by the Jorasanko branch of the Tagore clan, which had earlier suffered an acrimonious split. Jorasanko was located in the Bengali section of Calcutta, near Chitpur Road.[]
  • ^ ζ: Etymology of "Visva-Bharati": from the Sanskrit term for "world" or "universe" and the name of a Rigveda goddess ("Bharati") associated with Saraswati, the Hindu patron goddess of learning.[] "Visva-Bharati" also translates as "India in the World".
  • ^ η: Tagore was mired in several notable controversies, including his dealings with Indian nationalists Subhas Chandra Bose[] and Rash Behari Bose,[] his expressions of admiration for Soviet-style Communism,[][] and papers confiscated from Indian nationalists in New York allegedly implicating Tagore in a plot to use German funds to overthrow the British Raj.[] The latter allegation caused Tagore's book sales and popularity among the U.S. public to plummet.[] Lastly, his relations with and ambivalent opinion of Italian dictator Benito Mussolini revolted many, causing Romain Rolland (a close friend of Tagore's) to state that "[h]e is abdicating his role as moral guide of the independent spirits of Europe and India".[]