मृणालिनी गडकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मृणालिनी गडकरी (जन्म : १२ जानेवारी १९४९; मृत्यू: पुणे, २७ आॅक्टोबर २०१८) ह्या बंगाली साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देणाऱ्या अनुवादिका लेखिका होत्या. जर्मन भाषा घेऊन पदवी प्राप्त केल्यानंतर गडकरी यांनी मराठी विषयात एम.ए. केले. ‘कविवर्य बा. भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील निसर्ग : एक तौलनिक अभ्यास ’ या विषयावर शोधनिबंध सादर करून त्यांनी एम.फिल. केले .रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि समकालीन मराठी कविता ’ हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता. पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन सेंटर’ यांच्या सहकार्याने इंग्रजी बायबलचा आधुनिक मराठीत अनुवाद करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. विविध नियतकालिकांत त्यांचे लेखन व अनुवादित साहित्य प्रकाशित झाले आहे

मृणालिनी गडकरी यांचे साहित्य[संपादन]

  • अज्ञात विवेकानंद (अनुवादित, मूळ बंगाली लेखक -शंकर)
  • आनंदमठ (माहितीपर)
  • आमार मेयेबेला (माझं कुंवारपण) अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
  • आलो आंधारि (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - बेबी हालदार)
  • क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता (भगिनी निवेदिता यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त मृणालिनी गडकरी लिहिलेले 'क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता' हे अखेरचे पुस्तक. [१]).
  • काबुलीवाला आणि इतर कथा (अनुवादित, मूळ बंगाली लेखक -रवींद्रनाथ टागोर)
  • काबुलीवाल्याची बंगाली बायको (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - सुस्मिता बॅनर्जी)
  • गांधर्वी (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
  • गोसावी बागेतील भूत (अनुवादित बालसाहित्य, मूळ बंगाली लेखक - शीर्षेंदु मुखोपाध्याय)
  • तीन सांगातिणी (अनुवादित, मूळ बंगाली लेखक -रवींद्रनाथ टागोर)
  • देवदास (अनुवादित, मूळ बंगाली लेखक -शरच्चंद्र चट्टोपाध्याय)
  • नष्ट मेयेर नष्ट गद्य (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
  • निर्बाचित कलाम (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
  • निर्बाचित कविता (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
  • पोस्टमास्तर आणि इतर कथा (अनुवादित, मूळ बंगाली लेखक -रवींद्रनाथ टागोर)
  • फेरा (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
  • मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही! (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ओशो)

पुरस्कार[संपादन]

  • निर्बाचित कलाम या पुस्तकाला ‘मातृ –पितृ पुरस्कार’
  • आमार मेयेबेला’ या पुस्तकाला डॉ. सुभाष भेंडे पुरस्कार
  • देवदास या कादंबरीच्या अनुवादासाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार
  • पश्चिम बंगाल सरकारमान्य शरद समितीचा शरद पुरस्कार, १९६०
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी . ए. कुलकर्णी पुरस्कार २०११
  1. ^ क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता, प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस, १९४१ सदाशिव पेठ पुणे ३०