Jump to content

मांगेला कोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मांगेला कोळी ही कोळ्यांची एक पोटजात आहे. या समाजाची बोलीभाषा मांगेली ही आजही पारंपरिक पद्धतीनेच बोलली जाते.

मूळ व इतिहास[संपादन]

ज्येष्ठ अभ्यासक पंढरीनाथ तामोरे यांनी खालील संशोधन केले आहे.

या समाजाचा इतिहास पाहता वि.का. राजवाडे यांच्या 'महिकावतीची बखर' या ग्रंथातील पृष्ठ ७९ वर स्तंभ ६ मध्ये तांडेला जातीला 'मांगेला' हे दुसरे नाव आहे असे नमूद केले आहे.

नाशिक येथील एक तीर्थोपाध्ये अन्नाजी चंद्रात्रे यांच्या वहीवरून असे दिसून येते की, ही जात आपला संबंध निर्देश 'मांगेले-तांडेले' असा दुहेरी करते. नुसता 'मांगेले' किंवा नुसता 'तांडेले' असा एकेरी करत नाही. तांडा म्हणजे नावांचा (होडी) किंवा नावेतील खलाश्यांचा समूह. तांड्यांचा जो पुढारी तो 'तांडेल.' 'तांडेल-तांडेला' हा व्यवसायवाचक शब्द आहे. तंडक (समूह, ओळ) + इर: (प्रेरक, चालवणारा) = तंडेकर (तांड्याचा चालक). तंडेकर = तांडेल (नावांचा किंवा नाविकांचा पुढारी) 'मांगेल' हा शब्द 'मांग + इल' अशा दोन शब्दांचा समास आहे. पैकी 'मांग' हा शब्द 'मातंग' या शब्दाचा अपभ्रंश समजणे येथे युक्त नाही.

'मांगेला' या संयुक्त शब्दातील 'मांग' या शब्दाचे मूळ अन्यत्र शोधले पाहिजे. मूळ शोधण्यास ज्याअर्थी प्रयास पडतात, त्याअर्थी मांगेल लोक कोकणात फार प्राचीन काळी आलेले आहेत असे मानावे लागते.

नाशिक येथील चंद्रात्रे यांच्याजवळील तिसऱ्या नंबरच्या वहीच्या ५२-५३ पानांवर मांगेल्यांचे जे लेख आहेत, त्यातील ५वी नोंद येणेप्रमाणे..

'कृष्ण पी. माधव आ. बिलु पं. जानू भा. रामचंद्रचे बाबू सा. चु. झांबुचे शिनिवार सा. लथुमाव जानूचे भीमी माता- बुधीबाई. शिनिवारची मा. तीरमखी-शिनिवारची स्त्री गंगाबाई सा. शिनिवारची बहीण दोवारकाबाई सा जात मांगेले- तांडेले आ. पालघर गा. घीवली, ता. माहीम.'

मांगेले लोक नाग तसेच महाराष्ट्रीय लोकांहून निराळ्या वंशाचे, बहुशः आंध्रातील तेलगू, द्रविड शाखेचे लोक मूलत: असावेत. आंध्रादी देशात असताना तेथे वसाहत करून राहिलेल्या, वैदिक भाषा बोलणाऱ्या आर्यांचा पगडा त्यांजवर बसून वैदिक व्यक्तिनामे उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

नंतर आंध्र प्रदेशातून ते कोकण किनाऱ्यावर आले. सप्तगोदावरी प्रदेशात ते मुळात मच्छिमारीचा व्यवसाय करत असावेत आणि कोकण किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी तो धंदा तेथेही चालू केला असावा. इ. स.पूर्व नऊशेपासून इ. सनोत्तर चारशेपर्यंत- म्हणजे पाणिनीय काळाच्या व बौद्धकालाच्या ऱ्हासापर्यंतच्या काळात मांगेले कोकणात शिरले.

मांगेला समाजाच्या आख्यायिके नुसार, त्यांचे मूळ पांडवांची आजी सरस्वती म्हणजे मत्स्यगंधा असून त्यांचे गोत्र कश्यप आहे. वर्ण संस्थेची जाणीव असूनही, ते वर्णसंस्थेत स्वतःचे स्थान निश्चित करू शकत नाही. परंतु ते स्वतःला क्षत्रियापेक्षा श्रेष्ठ परंतु ब्राह्मणापेक्षा खालच्या वर्णाचे समजतात. ब्राह्मण त्यांच्या घरी जेवतो. विशेष म्हणजे ह्या समाजामध्ये लग्नात नवरी नवरदेवाच्या घरी लग्नाच्या फेऱ्या घ्यायला जाते. कारण मांगेला कोळी समाजात हुंडा ही पद्धत अस्तित्वात नाही.

मांगेला समाजाची भाषा[संपादन]

या समाजाची बोलीभाषा मांगेली ही आहे. आपल्या बोलीभाषेबरोबरच हे लोक मराठीगुजराती भाषा बोलतात. महाराष्ट्रात राहणारे मराठीगुजराथमध्ये राहणारे गुजराती भाषेचा वापर करतात.हा समाज भारतात " इतर मागास प्रवर्ग " मध्ये मोडतो. आणि महाराष्ट्रात " विशेष मागास प्रवर्ग " म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र सरकारकडून ह्या लोकांना APPENDIX III Rule २ (a) (१०) मांगेला, सरकारी योजनेत २% अनुदान आहे, आणि जाती त्याहून कैक पटीने आहेत. मांगेला समाज हा जरी आंध्र प्रदेशातून आला असला तरी त्यांच्या भाषेत आर्य वर्णाचे उच्चारण आहे त्याचबरोबर जास्त मराठी भाषेचे ज्ञान लपलेले आहे. फक्त मांगेली आणि आगरी भाषेत मराठी समजण्याइतकी भाषा आहे. उदा.

मराठी मांगेली इतर
मी मीन मी
मला मना माना
तुम्ही - आम्ही तू मीन - आमीन तुमि - आमी
जेव्हा - तेव्हा जवा - तवा -
कधी - कुठे कवा - कया -
कळीचा माणूस कळीया माणूस कळी माणूस
सांगितलेल हान्गीतलता -
जाणे आहे जा याय जा याय गा
मराठी मांगेली
आजोबा आज्यो
आजी आजी
वडील बाप
आई आय
भाऊ भा (दादो)
बहीण भहिन (बन)
मुलगा पोर (होकरा)
मुलगी पोयरी (होकरो)
आत्या फुय
आत्यानजी फुयो
मावशी मावशी
मावशांजी मावशो
काका काको
काकी काकी
मामा मामो
मामी मामी
सासू हाउ
सासरे हरो
सून ओव
जावई जावय
मेहुणा हारो
मेहुणी हारी

मांगेला समाजाची गावे[संपादन]

मांगेला समाज हा मुख्यत्वे वायव्य महाराष्ट्र, (मुंबई - पालघर, ठाणे) व दक्षिण गुजरातमघ्ये वास्तव्य करून आहे. त्यांची वस्ती खालील गावांत आढळून येते:

कुलाबा कफ-परेड खार-दांडा माहीम शिवडी गिरगाव, मुंबई     जुहुतारा वर्सोवा गोराई उत्तन डोंगरी किल्ला बंदर
वसई रानगाव कळंब नालासोपारा नवापूर (वटार) अर्नाळा अर्नाळा किल्ला बोळींज विरार नारिंगी नारिंगी
 आगाशी || टेंभी ||[नाळा ]] ||
दातिवरे कोरे एडवण उसरणी केळवा दादरपाडा केळवे माहीम टेंभी वडराई शिरगाव सातपाटी
खारेकुरण मुरबे आलेवाडी नांदगाव नवापूर उच्छेळी दांडी घीवली कांबोडे पोफरण तारापूर
चिंचणी चिंचणी बोभाटा चिंचणी दांडेपाडा वरोर गुंगवाडा धाकटी डहाणू डहाणू (किल्ला) विक्रमगड तलासरी जव्हार नरपड
चिखला घोलवड बोर्डी दाहेरी उमरगाव नारगोर झाई मारोली फणसा कलई कच्छीगाम
घोलवड मोटी दमण नानी दमण देवका मांगेलवाडा (दमण) उदवाडा परडी उमरसाडी (मांगेलवाडा) बलसाड सूरवाडा सुरत अहमदाबाद
कापड बाजार (माहीम, मुंबई) सफाळे वैतरणा दिव ठाणे पाचू बंदर वेढी मांडवी मनोर तांदूळ वाडी

आडनावे[संपादन]

मांगेला तांडेल आरेकर वाडीकर निजाई दांडेकर वझे हंबीरे निजप धनु
दवणे आक्रे तामोरे मेहेर धानमेहेर माहीमकर विन्दे चौधरी प्रभू मर्दे
पागधरे वैद्य नाईक केणी किणी राउत धानमेहेर धर्ममेहेर घरत चामरे
मेहेर | निजाई | किणी | गोवारी |कोळी | म्हात्रे | धनु |

सण[संपादन]

मांगेला समाजात हौशीने सणांना महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सामान्य सणांसारखे सण साजरे केले जातात. होळीमध्ये पंधरा दिवस आधी त्यांच्याकडे लहान भेंडीचे झाड ( पारस भेंडी ) किंवा खारफुटी ( त्या भाषेत टीवरट झाड) लावून दर दिवशी होळ्या जाळल्या जातात. ह्या पंधरा दिवसाच्या होळींना " भेंडारे " म्हणतात.मग शेवटच्या दिवशी मोठी होळी म्हणून सुपारीचे झाडाला देवीसारखे सजवून ती जाळली जाते.

समाजाची संस्था[संपादन]

अखिल भारतीय मांगेला समाज परिषद

प्रसिद्ध व्यक्तित्व[संपादन]

१.पुष्पा पागधरे ( गायिका )

२.विक्रांत केणी (भारतीय दिव्यांगक्रिकेट संघ

             कर्णधार)

3. माया आक्रे ( भारतीय कबड्डी संघ कर्णधार, अर्जुन पुरस्कार, छत्रपती पुरस्कार विजेती )

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]