बोर्डी (डहाणू)

| ?बोर्डी महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | डहाणू |
| जिल्हा | पालघर जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
बोर्डी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
[संपादन]बोर्डी हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेले छोटे गाव आहे. गावाला समुद्र किनारा आहे. येथील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल या शाळेची स्थापना १९२० साली झाली होती.
या गावातील प्रमुख व्यवसाय शेती, वाडी, व्यापार, कुंभारकाम, बुरडकाम, मासेमारी, इ. आहेत. येथे दर शनिवारी आठवडा बाजार भरतो. २०१२ पासून येथे दरवर्षी चिकू उत्सव भरतो.
बोर्डी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला भारतातील पहिली चिकू वायनरी "हिल झील वाईन्स" उभारलेली आहे.चिकू फळासोबत आंबा, अननस, कमरक,स्ट्रॉबेरी, दालचिनी, मध ह्यापासून सुद्धा वाईनचे उत्पादन घेतले जाते.चिकू फळाला भौगोलिक मानाकंन प्राप्त झालेले आहे.ही वायनरी प्रियांंका सावे ह्या महिलेने श्रीकांत सावे आणि नागेश सावे ह्यांच्या सहकार्याने उभारली आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]लोकजीवन
[संपादन]प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- ताराबाई मोडक
- भालचंद्र हरी पाटील
- आचार्य भिसे
- चित्रे गुरुजी
- सावे गुरुजी
- डॉ. हरिश्चंद्र पाटील
- डॉ.जयंतराव पाटील
- मोहन बारी
- अनुताई वाघ
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]हे गाव सागरी पर्यटन, चिकू लागवड, चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण अश्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.गावाची ओळख बालवाडी आणि अंगणवाडी ची जननी म्हणून आहे.बोर्डी गावात पालघर जिल्ह्यातील सर्वात प्रथम चिकू महोत्सव आयोजित केला गेला. सन २०१३ पासून बोर्डी येथील मैदानात करोनाचे एक वर्ष वगळता सलगपणे १० वर्षे चिकू महोत्सव आयोजित केला जात आहे. ह्यावर्षी शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ ते रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ चिकू महोत्सवाचे आयोजन केले आहे.[२]
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
संदर्भ
[संपादन]महाराष्ट्र टाईम्स ०९/०६/२०२०.