Jump to content

अनुदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनुदान हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकास माल किंवा सेवा देण्यासाठीची सोय असते. अनुदान सामन्यतः अनुदान हे सरकारतर्फे दिले जाते परंतु उत्पादक स्वतः किंवा तिऱ्हाइत संस्थाही अशी मदत पुरवू शकतात.

उदाहरणे[संपादन]

१) खतांच्या किमती कमी होऊन सामान्य शेतकऱ्यांना खते परवडावी.

२) सरकारच्या प्राधान्यक्रमावर असणारे उपक्रम लोकप्रिय व्हावेत म्हणून. उदा. शौचालय बांधणी, शेतातील तळ्यांची बांधणी, वृक्षारोपण इत्यादी.

३) विशिष्ट उत्पादनाची किंमत फार वाढून त्याची मागणी घटू नये या साठी अनुदान देऊन किंमत कमी ठेवली जाते. उदा. विविध रोगांवरील लस

४) बँकाची कर्जे स्वस्तात उपलब्ध व्हावी म्हणून. उदा. अल्पभूधारक शेतकरी, निर्यातक्षम उद्योग, ठिबक सिंचन योजनेसाठी असणारी कर्जे इत्यादी.

५) आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनाची किंमत कमी होऊन माल खपावा यासाठी सरकार अनुदान देऊ शकते.

प्रकार[संपादन]

  • प्रत्यक्ष अनुदान - मदत करणारी संस्था लाभार्थीला खरेदी साठी रोख रक्कम देते.
  • अप्रत्यक्ष अनुदान -मदत करणारी संस्था परस्पर उत्पादकाला विक्री किंमत आणि लावलेली किंमत यांतील फरक अदा करते. खताच्या कारखान्याला सरकारी मदत मिळून अथवा कर्जावरील व्याजाचा बोजा सरकारने सहन करून लाभार्थीला स्वस्तात उत्पादने मिळणे. या मध्ये लाभार्थीला त्याच्या खात्यात काही पैसे जमा होत नाही पण सरकारच्या धोरणांचा आणि अनुदानाचा लाभ तर होतो.