Jump to content

विक्रमगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?विक्रमगड

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर विक्रमगड
जिल्हा पालघर जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
आरटीओ कोड

• एमएच/४८ /०४

विक्रमगड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]

हे गाव वारली चित्रकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वारली चित्रकार कृष्णा भुसारे ह्यांना सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्या हस्ते त्यांच्या उत्कृष्ट चित्रांबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती भवन संग्रहालयामार्फत संकला फाउंडेशनच्या सहकार्याने दिनांक २१ ते २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत कला शिबीर आयोजित केले होते. त्यासाठी १५ आदिवासी चित्रकारांना आमंत्रण दिले होते.कृष्णा भुसारे ह्यांनी काढलेल्या चित्रांना राष्ट्रपती भवन संग्रहालयात स्थान देण्यात आले आहे. []

नागरी सुविधा

[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून तालुक्यातील प्रत्येक गावात जाण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

[संपादन]

पोटखळ, कवळे, माळे, आपटी खुर्द, काशिवळी तर्फे आलोंडे, रुईघर, बोपदारी, वावर, बेहडगाव, दाहुळ, दाभेरी ही जवळपासची गावे आहेत.विक्रमगड ग्रामपंचायतीमध्ये संगमनगर, विक्रमगड, आणि यशवंतनगर ही गावे येतात.

संदर्भ

[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/

  1. महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार,७ नोव्हेंबर २०२४