एडवण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?एडवण
महाराष्ट्र • भारत
गुणक: 19°36′15″N 72°50′02″E / 19.6042°N 72.8338°E / 19.6042; 72.8338
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .०१९९२४ चौ. किमी
जवळचे शहर सफाळे
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
३,१८८ (२०११)
• १,६०,००८/किमी
भाषा मराठी
सरपंच करुणा तरे
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८
बोलीभाषा:वाडवळी, मांगेली, भंडारी

गुणक: 19°36′15″N 72°50′02″E / 19.6042°N 72.8338°E / 19.6042; 72.8338

एडवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेस माकुणसार दातिवरे मार्गाने गेल्यावर भादवे गावानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव १८ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. रब्बी हंगामात भाजीपाला, फुलभाज्या, फळभाज्यांचे पीक घेतले जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७३४ कुटुंबे राहतात. एकूण ३१८८ लोकसंख्येपैकी १५८१ पुरुष तर १६०७ महिला आहेत. गावाची साक्षरता ८५.५६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९४.२१ आहे तर स्त्री साक्षरता ७७.०१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २७२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ८.५३ टक्के आहे. मुख्यतः वाडवळ, मांगेले, भंडारी समाजातील लोक येथे राहतात.भातशेती, मासेमारी यांबरोबर दुधाचा व्यवसायही केला जातो.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा, इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठरावीक वेळी उपलब्ध होतात. सफाळेवरून दिवसभर अॉटोरिक्शासुद्धा मिळतात.

जवळपासची गावे[संपादन]

भादवे, करवाळे,पेणांद, सरतोडी, मांडे,डोंगरे,विराथन बुद्रुक, दारशेत, दहीवले, घाटीम, कांदरवन ही जवळपासची गावे आहेत.

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc