Jump to content

टेंभी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?टेंभी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .६०५ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
९०२ (२०११)
• १,४९१/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१५०१
• +०२५२५
• एमएच४८

टेंभी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला नवापूर मार्गाने गेल्यावर नांदगाव मार्गावर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ८.४ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवा उष्ण असते.


शेकाट्या/शेकोट्या/शेकाटया हा स्थलांतरित पक्षी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात माकुणसार, केळवे, माहीम, खारेकुरण,टेंभी येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे.[१]

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६० कुटुंबे राहतात. एकूण ९०२ लोकसंख्येपैकी ४८९ पुरुष तर ४१३ महिला आहेत. गावाची साक्षरता ८९.७४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९३.७५ आहे तर स्त्री साक्षरता ८४.९१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ८३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.२० टक्के आहे.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसर रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

वेंगणी,कुरगाव, दांडी, उच्छेळी, नवापूर, पामटेंभी, कोळवडे, कुंभवळी, गुंदाळी, आलेवाडी, नांदगाव तर्फे तारापूर ही जवळपासची गावे आहेत.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक १ आगस्ट २०२३